Photo Credit- Social Media तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजारीच ड्रग्ज तस्कर
तुळजापूर: मागील काही दिवसांपासून तुळजापूरमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणं मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. त्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून या प्रकरणात पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारीच्या कारवायाही केल्या. या ड्रग्ज प्रकरणाला राजकीय संदर्भही जोडले गेले होते. हे सर्व सुरू असतानाच आता तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजारीच ड्रग्ज तस्करीत संल्ग्न असल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बहुतांश पुजारी ड्रग पेडलर असल्याची माहिती काही सूत्रांकडून मिळाली आहे.
मंदिर प्रशासनाच्या पुजारी मंडळाने संबंधित आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली असून, सर्व पुजाऱ्यांना दोषी ठरवून बदनामी करू नये, असे आवाहन केले आहे. कारण त्यातील काही आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेमध्ये सहभागी नव्हते, असा दावाही पुजारी मंडळाकडून करण्यात आला आबहे. सध्या या प्रकरणात एकूण ३५ जण आरोपी आहेत, त्यापैकी २१ अजूनही फरार आहेत. त्यात १३ पुजाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, मंदिरातील नियमित पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, अशी स्पष्ट भूमिका पुजारी मंडळाकडून मांडण्यात आली आहे.
Pune Sassoon Hospital : ‘ससून’ची सुधारणा अन् सुरक्षेसाठी मोठा निर्णय! रुग्णालयात आता पोलीस चौकी
तुळजापूरमधील ड्रग्ज तस्करी प्रकरणाला काही दिवसांपूर्वी राजकीय संदर्भ प्राप्त झाला होता. या प्रकरणातील काही आरोपींसोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघेही या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, त्यांच्यासोबत खासदार निंबाळकर यांचे फोटो समोर आल्याने चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ३५ आरोपींची नावे पुढे आली असून, त्यापैकी २१ आरोपी अजूनही फरार आहेत. त्यामुळे या फरार आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. पुजाऱ्यांची नावे सार्वजनिक होताच गाव आणि मंदिर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणातील काही आरोपींसोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. तुळजापूर उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे दोघेही ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी असून, त्यांच्या सोबत खासदार निंबाळकर यांचे फोटो सार्वजनिक झाले आहेत.
या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची राजकीय घडामोडींत भूमिका असल्याचं स्पष्ट होत आहे. विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याचे संबंध भाजप पक्षाशी असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच चंद्रकांत उर्फ बापू कने, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष, हेही भाजपशी संलग्न असून, त्यांनी मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारासाठी प्रचार केला होता. विनोद उर्फ पिटू गंगणे, हे माजी नगराध्यक्षांचे पती असून त्यांचाही भाजपशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे.