Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Local Body Election: “… ही तर जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई”; MP ओम राजेंची भाजपवर टीका

सोमनाथ गुरव यांनी केवळ आपल्याच प्रभागातील नव्हे, तर शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांच्या समस्येला आपली स्वतःची समस्या समजून न्याय मिळवून दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 24, 2025 | 09:03 PM
Local Body Election: "... ही तर जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई"; MP ओम राजेंची भाजपवर टीका

Local Body Election: "... ही तर जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई"; MP ओम राजेंची भाजपवर टीका

Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर
2 डिसेंबरला मतदान तर 3 तारखेला लागणार निकाल
धाराशिव नगरपालिकेची निवडणूक होणार रंगतदार

धाराशिव: २ डिसेंबर ही मतदानाची तारीख जसजशी जवळ येते आहे, तसतसे नगरपालिकेच्या निवडणुकीत रंग भरू लागले असून शिवसेना (उबाठा) काँग्रेस आघाडीने सोमवारी (२४ नोव्हेंबर) संयुक्तरित्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी जाहीरपणे झडू लागल्या असून एकमेकांवर टिकांचा भडिमार केला जात आहे. आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर ओम राजेंनी भाजपावर जोरदार प्रहार केले असून धाराशिव नगरपालिकेची निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे. यामुळे शिवसेनेच्या नगरध्यक्षपदाच्या उमेदवार संगीता सोमनाथ गुरव आघाडीच्या सर्व उमेदवारांसह भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.

शहरातील धारसुरमर्दिनी मंदिरात देवींना नारळ वाढवून, हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहेमतुल्ला अलै यांच्या दर्ग्यात चादर चढवून, शहरातील सर्व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आघाडीच्या, प्रचाराला अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार कैलास घाडगे पाटील, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील, विश्वास शिंदे, मकरंद राजेनिंबाळकर आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मागील दहा वर्षांच्या काळात नगरसेवक म्हणून कार्यरत असताना आणि प्रशासकीय काळात सोमनाथ गुरव यांनी केवळ आपल्याच प्रभागातील नव्हे, तर शहरातील प्रत्येक भागातील नागरिकांच्या समस्येला आपली स्वतःची समस्या समजून न्याय मिळवून दिला आहे. शहरातील नागरी समस्या असा ग्रुप काढून त्यातून शहरातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी निस्वार्थपणे केले आहे. आता त्यांच्या सहचारिणी नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या (उबाठा) उमेदवार म्हणून जनतेला आशीर्वाद मागत आहेत. सोमनाथ गुरव यांचे मागील काम पाहून जनता निश्चितच या मध्यमवर्गीय सर्वसामान्य घरातील महिलेस नागराध्यक्षपदी विराजमान करतील असा विश्वास त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

मशाल चिन्ह असलेले सेनेचे भगवे आणि हाताचा पंजा चिन्ह असलेले काँग्रेसचे तिरंगी गमछे गळ्यात घालून, भगवे आणि तिरंगी झेंडे फडकवत घोषणांच्या गजरात, हलगी, ढोल आणि तशा आदी वाद्यांच्या गदारोळात शहरातील मुख्य रस्त्यावरून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना व काँग्रेस पक्षाचे नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार सहभागी होते. रॅलीत लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Web Title: Mpomraje nimbalkar criticizes to bjp maharashtra dharashiv local body election 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 09:03 PM

Topics:  

  • BJP
  • Dharashiv Police
  • Mp Omraje Nimbalkar

संबंधित बातम्या

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले
1

Jayant Patil: “भाजपची अवस्था ‘पिंजरा’मधील मास्तरासारखी”; जयंत पाटील यांची जहरी टीका, एमआयएम-काँग्रेस युतीवरून भाजपला झाडले

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला
2

Uddhav Thackeray on BJP: ‘अरे आमची पोरं कशाला पळवता…’, नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली, फडणवीसांवर घणाघाती हल्ला

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल
3

Navi Mumbai Election : “आमची लढाई “नाईक जनता पार्टी” विरोधात” ; नरेश म्हस्केंचा गणेश नाईकांवर हल्लाबोल

BJP अन् RPI च्या उमेदवारांचा गृहभेटीवर भर; भाजपला मतदान करण्याचे केले आवाहन
4

BJP अन् RPI च्या उमेदवारांचा गृहभेटीवर भर; भाजपला मतदान करण्याचे केले आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.