शरद पवार यांना धक्का, आणखी एका बडा नेत्याने साथ सोडली, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार! (फोटो सौजन्य-X)
Nana Mahale Will Joins Ajit Pawar NCP in Marathi: शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुसंख्य खासदार आणि आमदार हे अजित पवार यांच्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यानंतर काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी पवार गटाला मोठी गळती लागल्याचे पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यानी शिवसेना शिंदे गट, भाजपाच्या दिशेने वाटचाल केली. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक नेतेही बाहेर पडताना दिसले. याचदरम्यान आता अजित पवार पुन्हा एकदा शरद पवार यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातील अनेक नेते राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षात जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक नाना महाले यांनी पवारांची साथ सोडली आहे. त्यांनी आता पुन्हा एकदा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. माजी नगरसेवक आणि मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक नाना महाले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. यांच्या या निर्णयामुळे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मंगळवारी महाले यांनी त्यांच्या विविध समर्थकांसह पुन्हा एकदा हातात घड्याळ बांधले.
नाना महाले यांच्या प्रवेशानंतर त्यांच्या समर्थकांनी “घड्याळ तेच वेळ नवी” अशा घोषणा देत त्यांच्या प्रवेशाचे स्वागत केले. महाले हे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. त्यांचे बंधू देखील तीन वेळा नगरसेवक होचे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश झाला असून मात्र महाले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यासाठीच महाले यांनी पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाच्या कामकाजात सहभागी होणार आहोत. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार असून आपण पक्षाकडे कोणतीही मागणी केलेली नाही, असे सांगितले.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार हिरामण खोसकर आणि अधीन नेत्यांच्या उपस्थितीत ते मुंबई कार्यालयात दाखल झाले. शहराध्यक्ष रंजन ठाकरे उपस्थित होते.
माजी नगरसेवक महाले यांच्यासमवेत मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, अक्षय परदेशी, राहुल कमानकर, ज्ञानेश्वर महाजन, सुनील घुगे, सुनील अहिरे, राजेंद्र पवार, अरुण निकम यांचे विविध पदाधिकारी आणि नेत्यांचाही यावेळी प्रवेश झाला.