Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आधी पक्ष सांभाळा मग पतंगबाजी करा…’, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची संजय राऊतांवर टीका

शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणीदरम्यान खासदार नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर निशाणा साधला. निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांनी राऊतांनी पक्षाची चिंता करण्याऐवजी स्वतःचा गट सांभाळावा, असा टोला लगावला.

  • By विवेक
Updated On: Aug 06, 2026 | 05:46 PM
naresh mhaske on sanjay raut

naresh mhaske on sanjay raut

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवरुन शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठा खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला. न्यायालयातील सुनावणीवर राऊत यांनी नेहमीप्रमाणे पतंगबाजी केली. न्यायाधीशांनी जणू काही त्यांच्या कानात निर्णय सांगितलाय, अशा अर्विभावात राऊत पतंगबाजी करत आहेत, अशी खरमरीत टीका खासदार म्हस्के यांनी केली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खासदार म्हस्के म्हणाले की, शिवसेना हा एकसंध पक्ष असून पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, असे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले होते. त्यावरुनच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले होते. त्याचा राऊत यांनी अभ्यास करावा. सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे विचार आणि तत्व आपण विसरलात, असे खडे बोल खासदार म्हस्के यांनी राऊत यांना सुनावले. आज न्यायालयाचे कौतुक करायचे आणि निर्णय विरोधात गेला की न्यायमूर्ती आणि न्यायालयाच्या नावाने खडे फोडायचे, हा उद्योग राऊत करतात. त्यामुळे राऊतांच्या पतंगबाजीला काही अर्थ नाही, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रशांत किशोरांची एन्ट्री? सुनेत्रा पवार, पार्थ पवारांची भेट, नव्या रणनीतीची चर्चा

बाळासाहेबांचे विचार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर आमचा विश्वास आहे. उबाठा गटातील शिल्लक माणसे थांबवण्यासाठी राऊत बेताल विधाने करत आहेत. आधी उबाठा गट सांभाळा मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने टाहो फोडा, असा टोला खासदार म्हस्के यांनी राऊतांना लगावला. उबाठा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी राऊतांनी केलेली आहे. इतरांना विलीनीकरणाचे सल्ले देणारा उबाठा गटाला कदाचित एमआयएम किंवा समाजवादी पक्षात विलीन व्हावे लागेल, अशी बोचरी टीका खासदार म्हस्के यांनी केली. शिवसेनेची काळजी करण्यापेक्षा राऊतांनी उबाठा गटातील शिल्लक आमदार, खासदार, नगरसेवक पक्षात कसे राहतील, याची काळजी करावी, असे खासदार म्हस्के म्हणाले. पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी राऊत वेळ पडल्यास काँग्रेसमध्येही प्रवेश करतील, अशी टीका खासदार म्हस्के यांनी केली.

Sanjay Raut PC Delhi: फुटीर गट लवकरच भाजपमध्ये विलीन होणार; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Web Title: Naresh mhaske slams sanjay raut over shiv sena supreme court hearing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Naresh Mhaske
  • sanjay raut
  • shivsena
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल
1

Sushma Andhare : ‘शेतकरी उपाशी मरतोय, नेते काजू-बदामावर ताव मारतायत,’ सुषमा अंधारेंचा सरकारवर हल्लाबोल

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….
2

Sanjay Raut : संजय राऊत यांनी लिहले आयुक्तांना पत्र ? घडलेल्या घटने मागे राजकीय पाठबळ ….

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
3

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’
4

Disha Salian Case : सतीश सालियान वकिलांसह मातोश्रीवर, वरुण सरदेसाईंचा पलटवार; ‘पुरावे असतील तर द्या’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.