Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi High Court On Jantar Mantar: ‘जंतर मंतर येथील आंदोलनस्थळ बंदच का करत नाही?’ उच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

केंद्र सरकारची भूमिका दिल्लीमध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन होऊ नये अशी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर न्यायमूर्ती महाजन यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय पोलिसांनी घ्यायचा आहे. जर शहराच्या आत आंदोलन सहन करणे शक्य नसेल, तर त्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली जावी.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 07, 2026 | 04:33 PM
Delhi High Court On Jantar Mantar:

Delhi High Court On Jantar Mantar:

Follow Us
Follow Us:
  • दिल्ली पोलिसांकडे जुलैपासून अर्ज प्रलंबित असून परवानगी नाकारलेलीही नाही आणि मंजूरही केलेली नाही
  • जंतर-मंतरबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या जुन्या आदेशांच्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेतला जात आहे
  • मध्य दिल्लीतील आंदोलनस्थळ बंद करून नागरिकांना दिलासा देण्यावर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा
 Delhi high  Court on Janatar Manatar News: ” दिल्ली सारख्या शहराच्या मध्यवर्ती भागात वारंवार होणाऱ्या आंदोलनांमुळे जनजीवन विस्कळीत होत असेल, तर जंतर-मंतर हा आंदोलनांसाठीचा परिसरच बंद करण्याचा विचार सरकार का करत नाही,” असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला केला आहे. जंतर-मंतर येथे होणाऱ्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने दिल्ली सरकारला विचारणा केली आहे.

बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती अमित महाजन यांच्या खंडपीठासमोर यासंदर्भात सुनावणी पार पडली.” शहराच्या मध्यभागी होणाऱ्या आंदोलनांमुळे संपूर्ण शहराला अनावश्यकपणे त्रास होत असेल तर, तुम्ही हा परिसर बंद का करत नाही? माझ्या मते शहरात अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत. मात्र, हा सरकारचा निर्णय आहे. शहराला विनाकारण वेठीस का धरले जावे?” असा सवाल त्यांनी केला.

‘आता नवीन वाहने खरेदी करू नका, सरकार डिझेलमध्येही इथेनॉल टाकणार’; माजी मुख्यमंत्र्यांचे मोठं विधान

नेमक्या कोणत्या याचिकेवर सुनावणी?

अखिल भारतीय दलित ख्रिश्चन अधिकार संरक्षण समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने ही टिप्पणी केली. जंतर-मंतरवर आंदोलन करण्यासाठी परवानगी मागणाऱ्या समितीच्या अर्जावर दिल्ली पोलिसांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील संजय घोष यांनी बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, पोलिसांनी अर्ज अद्याप मंजूरही केलेला नाही आणि नाकारलेलाही नाही. “आमच्या आंदोलनात जास्तीत जास्त 75 लोक सहभागी होतील. दिल्ली पोलिसांकडे जुलैपासून आमचा अर्ज प्रलंबित आहे,” असे घोष यांनी सांगितले.

‘सरकार हा परिसर बंद का करू शकत नाही?’

जंतर-मंतर परिसर बंद करण्याचा विचार सरकार का करू शकत नाही, असा सवाल न्यायालयाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (ASG) चेतन शर्मा यांच्याकडे उपस्थित केला. त्यावर, ” सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात याच मुद्द्यावर विचार सुरू असून जंतर-मंतरला अधिकृत आंदोलनस्थळ म्हणून कायम ठेवता येईल का, याबाबत सर्वोच्च न्यायालय विचार करत असल्याचे, चेतन शर्मा यांनी स्पष्ट केले. पण, न्यायमूर्ती महाजन यांनी, “माझ्या मते असे होऊ नये,” असे मत व्यक्त केले.

देशातील अनेक भागांत हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा; केरळ, कर्नाटकात पुढील 3 दिवस…

‘दिल्लीमध्ये आंदोलनालाच परवानगी नाही का?’

यानंतर संजय घोष यांनी , केंद्र सरकारची भूमिका दिल्लीमध्ये कोणत्याही प्रकारचे आंदोलन होऊ नये अशी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर न्यायमूर्ती महाजन यांनी सांगितले की, याबाबतचा निर्णय पोलिसांनी घ्यायचा आहे. जर शहराच्या आत आंदोलन सहन करणे शक्य नसेल, तर त्याबाबत स्पष्ट भूमिका घेतली जावी.

घोष यांनी त्यावर म्हटले की, “मग त्यांना स्पष्टपणे सांगू द्या की दिल्लीत कोणतेही लोकशाहीवादी आणि शांततापूर्ण आंदोलन होणार नाही. आम्ही ते स्वीकारू.” मात्र न्यायमूर्ती महाजन यांनी स्पष्ट केले की, आपण आंदोलन लोकशाहीवादी आहे की अलोकशाहीवादी, याबाबत बोलत नाही. ‘शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार आहे, पण शहराला वेठीस धरले जाऊ नये.

15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था

ASG चेतन शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले की, परिसरात सध्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 144 अंतर्गत निर्बंध लागू आहेत. तसेच 15 ऑगस्ट जवळ आल्याने सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत. 75 लोक कधी 75 हजार होतील, हे आम्हाला माहीत नाही,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

यावर न्यायमूर्ती महाजन यांनी पुन्हा आपली वैयक्तिक भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “जर तुम्ही मला वैयक्तिकरित्या विचारले, तर माझा दृष्टिकोन वेगळा आहे. संपूर्ण शहराची वाहतूक आणि व्यवस्था विस्कळीत होत असेल, रुग्णवाहिकेला जाण्याची गरज असेल किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण होत असेल, तर शहरात अशी परिस्थिती का निर्माण व्हावी?”

 

 

 

 

Web Title: National news delhi high court asks center why not close jantar mantar for protests

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • delhi high court
  • Delhi news
  • Jantar Mantar
  • national news

संबंधित बातम्या

Ajit Doval IIT Roorkee Speech:आमची टिम चिनी सैन्याच्या ताब्यात सापडली…”; IIT रुरकीत NSA अजित डोवालांनी सांगितला तो प्रसंग
1

Ajit Doval IIT Roorkee Speech:आमची टिम चिनी सैन्याच्या ताब्यात सापडली…”; IIT रुरकीत NSA अजित डोवालांनी सांगितला तो प्रसंग

Fertility Rate In India: नसबंदीचे नियम बदलणार?पंतप्रधान सल्लागार परिषदेची मोठी शिफारस!
2

Fertility Rate In India: नसबंदीचे नियम बदलणार?पंतप्रधान सल्लागार परिषदेची मोठी शिफारस!

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज
3

High Court Recruitment 2026: ग्रॅज्युएट्ससाठी मोठी संधी! दिल्ली हायकोर्टात ‘या’ पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Rahul Gandhi On UPI Charges: UPI वर गुपचूप शुल्क लादण्याची तयारी; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप!
4

Rahul Gandhi On UPI Charges: UPI वर गुपचूप शुल्क लादण्याची तयारी; राहुल गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.