Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर ‘इंडिया’चा आक्रमक पवित्रा

Parliament Monsoon Session: आम आदमी पक्षाचे (आप) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ई-२० पेट्रोलच्या अनिवार्य अंमलबजावणीमुळे निर्माण झालेला जनक्षोभ आणि ग्राहक हक्कांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी करत नियम २६७ अंतर्गत नोटीस दाखल केली आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 05, 2026 | 12:04 PM
Parliament Monsoon Session August 2026,

Parliament Monsoon Session August 2026,

Follow Us
Follow Us:
  • आम आदमी पक्षाचे (AAP) राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ई-२० पेट्रोलच्या सक्तीमुळे होणारे नुकसान आणि ग्राहकांच्या हक्कांवर चर्चा करण्यासाठी नोटीस
  • विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राम मंदिर गैरव्यवहारावर अमित शाह यांनी सभागृहात येऊन भूमिका स्पष्ट करावी, यावर विरोधी पक्ष ठाम.
  • विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज वारंवार तहकूब
INDIA Alliance Protest Against Amit Shah: संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सरकार आणि विरोधी पक्षांमधील सुरू असलेला संघर्ष बुधवारीही कायम आहे. अयोध्येतील राम मंदिरातील प्रसादाच्या कथित चोरीवरून आणि दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाईवरून विरोधी पक्षाने सरकारला कोंडीत पकडण्यास सुरूवात केली आहे. आज सकाळीदेखील संसदेसमोर विरोधी इंडिया आघाडीने केंद्रीय मंत्री अमित शांहाच्या विरोधात घोषणाबाजी केली. अमित शहा गेल्या काही दिवसांपासून संसदेत का येत नाहीयेत, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जप्रकरणी उत्तर देण्यासाठी अमित शाहांना संसदेत यावं लागेल, असा इशाराही विरोधी पक्षांकडून देण्यात आला.

विरोधी खासदारांचा गांधी पुतळ्यापासून मकरद्वारपर्यंत मोर्चा

यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी आणि इतर विरोधी खासदारांसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात सीजेपी आंदोलकांवरील पोलीस कारवाई, अयोध्या राम मंदिरातील प्रसादाची चोरी आणि इतर मुद्द्यांवरून निषेध करण्यासाठी २० जुलै रोजी प्रेरणा स्थळ येथील गांधी पुतळ्यापासून मकरद्वारपर्यंत मोर्चा काढण्यात आला.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; आता त्यांच्याविरोधात खटलाच चालणार

दरम्यान, काँग्रेसने सोशल मीडिया अकाऊंटवरूनही अमित शहांसह केंद्रातील भाजप सरकारवर प्रश्नांचा मारा केला आहे. “तुम्ही मुलांवर पेलेट गन वापरण्याचे आदेश का दिले?, मुलांवर एके-४७ ने गोळ्या का झाडण्यात आल्या? पावसाळी अधिवेशन १३ दिवसांपासून सुरू आहे—अमित शाह सभागृहात का येत नाहीत? एवढी भीती का?” असे प्रश्न विचारून काँग्रेसने अमित शहांवर हल्लाबोल केला आहे.

गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी संसदेत बोलताना अमित शांहांवर गंभीर आरोपही केले होते. अमित शाहांच्या आदेशाने विद्यार्थ्यांना निर्दयी लाठीचार्ज करण्यात आला. त्यांच्याच आदेशाने विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला,असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांनी, २० जुलै रोजी दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्ज आणि बळाच्या वापरासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहीत काही गंभीर आरोप केले होते. “शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरक्षा दलांनी अंदाधुंद बळाचा वापर केला आणि यासाठी जबाबदारी निश्चित केली पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली होती.

तसेच,   विद्यार्थी एका निष्पक्ष आणि जबाबदार शिक्षण प्रणालीची मागणी करत होते, परंतु त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी त्यांच्यावर प्राणघातक शस्त्रे आणि अश्रुधुराचा वापर करण्यात आला. या कारवाईत शेकडो विद्यार्थी जखमी झाले आणि महिला आंदोलकांनाही कथितरित्या वाईट वागणूक देण्यात आली. असा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार; आता त्यांच्याविरोधात खटलाच चालणार

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात पेलेट गनच्या वापरावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर प्रसारित होणारे व्हिडिओ गंभीर दुखापती दर्शवतात. त्यांनी १९ वर्षीय विद्यार्थी साहिल लोछाबचा उल्लेख केला असून, तो गंभीर जखमी झाला असून त्याच्या एका डोळ्याची दृष्टी जाण्याचा धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एका जखमी पत्रकाराचाही उल्लेख केला होता.

राहुल गांधींनी गृहमंत्री अमित शाह यांना दोन थेट प्रश्न विचारले. पहिला, त्यांनी विद्यार्थ्यांविरुद्ध पेलेट गनसह प्राणघातक बळाचा वापर करण्यास परवानगी दिली होती का? नसेल तर, कोणी दिली होती? दुसरा, आंदोलनादरम्यान साध्या वेशात विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण करणारे लोक पोलीस होते की स्वयंसेवक, आणि त्यांना कोणाच्या आदेशाने तैनात करण्यात आले होते?  अे अनेक सवालही राहुल गांधी यांनी उपस्थित केले होते.

 

 

 

Web Title: National news parliament monsoon session india alliance protest against amit shah ram mandir cjp protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Amit Shah
  • INDIA Alliance
  • national news
  • Parliament Monsoon Session
  • Priyanka Gandhi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका
1

Modi Mimicry : मोदींच्या मिमिक्रीमुळे रंगला राजकीय वाद! ‘इंदूरचा कार्यक्रम बालिशपणाचा’ म्हणत प्रफुल्ल पटेलांची राहुल गांधींवर टीका

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
2

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
3

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Ajit Doval IIT Roorkee Speech:आमची टिम चिनी सैन्याच्या ताब्यात सापडली…”; IIT रुरकीत NSA अजित डोवालांनी सांगितला तो प्रसंग
4

Ajit Doval IIT Roorkee Speech:आमची टिम चिनी सैन्याच्या ताब्यात सापडली…”; IIT रुरकीत NSA अजित डोवालांनी सांगितला तो प्रसंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.