Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena Symbol Disqualification Hearing: आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? न्यायमूर्तींचा महत्त्वाचा प्रश्न

आमदार अपात्रता आणि निवडणूक आयोगासमोरील पक्षचिन्हाचा वाद या दोन समांतर प्रक्रिया होत्या. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाची वैधता ठरवताना केवळ विधिमंडळातील बहुमताचा निकष लावणे योग्य आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 20, 2026 | 11:54 AM
Supreme Court Shiv Sena Hearing, Kapil Sibal Arguments Supreme Court

Supreme Court Shiv Sena Hearing, Kapil Sibal Arguments Supreme Court

Follow Us
Follow Us:
  • सरन्यायाधीश सूर्यकांत, न्या. बागची व न्या. मोहना यांच्यासमोर सुनावणी पार पडली
  • विधिमंडळ पक्षाचे बहुमत म्हणजे मूळ राजकीय पक्ष नव्हे; अध्यक्षांचा निकाल बेकायदेशीर
  • विधानसभा अध्यक्षांच्या जागी येऊन न्यायालय स्वतः आमदारांना अपात्र करू शकते का?
Supreme Court News: शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह ठाकरे गटाचेच असल्याचा जोरदार युक्तिवाद केला. त्याचबरोबर विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह फुटीर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही ठाकरे गटाने लावून धरला आहे.

मागील विधानसभा विसर्जित झाल्यानंतरही तत्कालीन आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेता येतो का, हा महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न सुनावणीदरम्यान उपस्थित झाला. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील अॅड. देवदत्त कामत यांनी आमदार अपात्रतेची कारवाई का होणे आवश्यक आहे, याबाबत न्यायालयात युक्तिवाद केला.

Maharashtra Politics: भाजप-राष्ट्रवादीला धक्का! संजय निंबाळकर आणि रामेश्वर शेटेंची ठाकरे गटात एन्ट्री; धाराशिवच्या राजकारणात खळबळ

अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरल्यास कोर्ट काय करू शकते?

सुनावणीदरम्यान न्यायमूर्तींनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले. विधानसभा अध्यक्षांचा आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय बेकायदेशीर ठरल्यास सर्वोच्च न्यायालय स्वतः आमदारांना अपात्र ठरवू शकते का, असा प्रश्न न्यायालयाकडून उपस्थित केला. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांनी, “आम्ही आज शिंदे यांना अपात्र ठरवू शकतो का? आम्ही विधानसभा अध्यक्षांची भूमिका घेऊन त्यांना अपात्र ठरवू शकतो का?”, असा सवाल केला.

यावर अॅड. देवदत्त कामत म्हणाले की, विशेष अनुमती याचिका (SLP) दाखल करण्यात आली, त्या वेळी हा वाद अस्तित्वात होता. विधानसभा अध्यक्षांचा निर्णय कायद्याच्या मूलभूत तत्त्वांना छेद देणारा किंवा गंभीर स्वरूपाचा असल्यास त्याचे न्यायिक पुनरावलोकन करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला.

अपात्रतेच्या निर्णयाचा पक्षचिन्हाच्या वादावर परिणाम

अॅड. कामत म्हणाले की, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आणि शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा वाद हे एकमेकांशी संबंधित असल्याचेही ठाकरे गटाने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. जर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांचा आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय चुकीचा ठरवला, तर त्याचा थेट परिणाम पक्षचिन्हाच्या वादावर होऊ शकतो. यासाठी त्यांनी ‘सुभाष देसाई’ प्रकरणातील घटनापीठाच्या निर्णयाचा दाखला दिला.

आमदार अपात्रता आणि निवडणूक आयोगासमोरील पक्षचिन्हाचा वाद या दोन समांतर प्रक्रिया होत्या. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाची वैधता ठरवताना केवळ विधिमंडळातील बहुमताचा निकष लावणे योग्य आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निष्कर्ष पक्षचिन्हाच्या वादातही महत्त्वाचा ठरू शकतो.

Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्रात ‘धर्मस्वातंत्र्य कायदा’ लागू; फसवून धर्मांतर केल्यास ७ वर्षांचा तुरुंगवास

‘Ex Post Facto Recognition’चा दाखला

आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी केलेल्या निरीक्षणांचा दाखला देताना अॅड. कामत यांनी ‘Ex Post Facto Recognition’ या संकल्पनेचा उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या घटनेनंतर तिची कायदेशीर स्थिती मागील कालावधीपासून निश्चित केली जाऊ शकते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिल्यास संबंधित आमदारांच्या अपात्रतेचा परिणाम त्या घटनेच्या कालावधीपासून लागू होऊ शकतो, असा दावा कामत यांनी केला.

शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवादाची शक्यता

दरम्यान, ठाकरे गटाच्यावतीने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर अॅड. देवदत्त कामत यांचा युक्तिवाद सुरू आहे. त्यानंतर शिंदे गटाच्या वकिलांकडून या मुद्द्यावर आपली बाजू मांडली जाण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीत आमदार अपात्रतेबाबत होणाऱ्या निर्णयाचा शिवसेना पक्षावरील दावा आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर काय परिणाम होतो, हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Web Title: National newssupreme court hearing on shiv sena symbol and eknath shinde mla disqualification

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • kapil sibal
  • Supreme Court of India
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Eknath Shinde: शेतापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत महाराष्ट्राचा वस्त्रोद्योग; ‘फार्म टू फॉरेन’ उपक्रमाला चालना
1

Eknath Shinde: शेतापासून जागतिक बाजारपेठेपर्यंत महाराष्ट्राचा वस्त्रोद्योग; ‘फार्म टू फॉरेन’ उपक्रमाला चालना

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी
2

Shiv Sena Symbol Case : ‘शिवसेना ठाकरेंची, शिंदेंची होऊ शकत नाही’; धनुष्यबाण गोठवण्याची कपिल सिब्बलांची सुप्रीम कोर्टात मागणी

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल; ‘बिनबुडाचे आरोप’, विधानसभा अध्यक्षांचा पलटवार
3

शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून राहुल नार्वेकर विरुद्ध कपिल सिब्बल; ‘बिनबुडाचे आरोप’, विधानसभा अध्यक्षांचा पलटवार

शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ
4

शिवसेना फुटीप्रकरणी उद्या पुन्हा होणार सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादाने शिंदे गटात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.