
चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत: सांगितलय की, माझी सून मराठा आहे. माझी बायको कुणबी आहे. त्यांच्या घरात सगळे सोयरे घुसले असतील. फक्त बावनकुळे यांच्याच नाही तर अनेक मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसल्या आहेत. म्हणजे ओबीसी नेत्यांच्या मंत्र्यांची सुंदर मुले दिसली की, या मराठ्यांच्या मुली ओबीसी मंत्र्यांच्या घरात घुसतात. मग जर हे मंत्री मराठ्यांच्या मुलीचे ऐकून ओबीसींचं वाटोळे करणार असतील तर त्यांनी आम्हाला ओबीसींची गरज नाही असं समोर येऊन सांगावे.” असंही वाघमारे यांनी म्हटलं आहे.
वाघमारे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी त्यांच्याविरोधात महिला आक्रमक झाल्या आहेत. अनेक महिला रस्त्यावर उतरल्या असून वाघमारेंच्या तोंडाला काळे फासणार असल्याचा इशाराही अनेकांनी दिला आहे. शिवसेना नेत्या रेखा कोंडे म्हणाल्या की,” हा फक्त मराठा नाही तर सर्व महिला वर्गाच्या सन्मानाचा विषय आहे. कोणत्याही समाजातील स्रीयांचा अपमान करणे हा खूप मोठा गुन्हा आहे. मराठा समाजातीलच मुलीच ओबीसी मुलांसोबत लग्न करतात असे नाही तर कित्येक ओबीसी समाजातील मुलीदेखील मराठी मुलांसोबत लग्न करतात.”
जातीय राजकारणासाठी तुम्ही महिलांना टार्गेट करत असाल आणि स्वत:ला महात्मा फुलेंचा वारसा चालवतो असे म्हणत असाल तर ते आधी बंद करा. कारण तुम्ही खोट्या आणि तकलादु विचारांवर जगणारे नालायक लोक आहात. नवनाथ वाघमारेंनी तातडीने मराठा समाजातील महिलांची माफी मागावी, तुम्ही तुमच्या राजकारणासाठी नेत्यांच्या घरातील महिलांना टार्गेट करत आहात, यावरून तुमची राजकीय, सामाजिक पातळी किती खालावली आहे हे दिसते. अशा शब्दांत रेखा कोंडेंनी वाघमारेंना प्रत्युत्तर दिले आहे.