Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिजोरीच्या चाव्यांवरुन रंगलं राजकारण! जोरदार राजकीय वादंगानंतर अजित पवारांचा यु-टर्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थखात्याचा उल्लेख करत तिजोरीची चावी असल्याचे सांगितले होते. यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर अजित पवार यांनी सावरासावर केली.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 30, 2025 | 05:51 PM
NCP DCM Ajit Pawar take u turn from statement of tijorichya chavya maharashtra local body elections

NCP DCM Ajit Pawar take u turn from statement of tijorichya chavya maharashtra local body elections

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार यांनी निधीतून मतांची मागणी केली होती
  • तिजोरीच्या चाव्यांच्या वक्तव्यावरुन वाद
  • अजित पवारांनी घेतले आपल्या वक्तव्यावरुन यु – टर्न
Ajit Pawar : पुणे : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Elections) निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून येत्या 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. अनेक नेत्यांनी एकमेकांची पोलखोल केली असून वादविवाद झाले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका भाषणामध्ये मत द्या निधी देतो अशा आशयाचे वक्तव्य करुन तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे असल्याचे सूचक वक्तव्य केले. यावरुन जोरदार राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या वक्तव्यापासून यु-टर्न घेतला आहे.

प्रचारसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीचा उल्लेख केला होता. अजित पवार म्हणाले होते की, तुम्ही राष्ट्र‌वादीच्या उमेदवारांना मतदान करा, तुमच्या भागाला निधी कमी पडू देणार नाही. तुमच्या हातात मत आहे, तर माझ्या हातात निधी आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याऱ्यांनीही म्हटले होत की, “अजित पवारांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मतदान केल्यास निधी मिळेल, असे समर्थन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते करत होते. यामुळे भाजप नेत्यांनी देखील चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.

हिवाळी अधिवेशनापूर्वी सोनिया आणि राहुल गांधीविरोधात गुन्हा दाखल? नव्या राजकीय वादाची ठिणगी

यावरुन जोरदार राजकीय वाद निर्माण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावरासावर केली आहे. अजित पवार यांनी आपले वक्तव्य हे ओघाओघात असल्याचे म्हणत विषय संपवण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवार म्हणाले की, “उद्या या ठिकाणी मुख्यमंत्री आले तर ते देखील त्याची भूमिका मांडतील. तुम्ही सर्व विचार करा. मी परवा कुठेतरी बोलताना म्हणालो की तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. पण तो बोलण्याचा भाग होता. शेवटी जनता जनार्धन सर्व काही असतात लगेच बाकीच्यांनी सांगितले की चावी तुच्याकडे आहे, पण तिजोरी आमच्या खोलीमध्ये आहे. अरे पण कोणात्याही खोलीत तिजोरी असूद्या, काय करायचंय? राज्याच्या जनतेची तिजोरी आहे. माझ्या बापाची पण नाही आणि इतरांच्याही बापाची नाही, ही गोष्ट खरी आहे”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अनेक मंडळी येतात अन् गप्पा मारतात, आश्वासने देणाऱ्यांना आता…; रवींद्र चव्हाणांची शिवतारेंवर सडकून टीका

पुढे अजित पवार म्हणाले की, ठमी बोलता बोलता ओघात बोलून गेलो. त्यानंतर लगेच मीडिया आणि बातम्या, पण माझ्याकडे जो काही अधिकार आहे तो आहेच आणि माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत, हे देखील मी मान्य करतो. माझ्याकडे जो अधिकार आहे, त्या आधारावर विकासाला मदत करणं हे माझे कर्तव्य आहे’, असं अजित पवार म्हणाले आहेत. यामुळे अजित पवार यांनी आपल्या निधीच्या आणि अर्थखात्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन माघार घेतली असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

Web Title: Ncp dcm ajit pawar take u turn from statement of tijorichya chavya maharashtra local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 05:51 PM

Topics:  

  • ajit pawar
  • devendra fadnavis
  • political news

संबंधित बातम्या

PMC Exit Polls 2026: पुणे ‘दादा’मुक्त होणार? ‘पुण्यनगरीत पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज
1

PMC Exit Polls 2026: पुणे ‘दादा’मुक्त होणार? ‘पुण्यनगरीत पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा अंदाज

Thane Election :  निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला
2

Thane Election : निवडणूक यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा दबाव; जितेंद्र आव्हाडांचा महायुतीला टोला

BMC Election 2026 : “मतदानासाठी वापरण्यात आलेली शाई पुसली जाते…”, निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं…
3

BMC Election 2026 : “मतदानासाठी वापरण्यात आलेली शाई पुसली जाते…”, निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं…

जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच हालचालींना वेग; अध्यक्षपद खुले असल्याने मातब्बर रिंगणात उतरण्याचे संकेत
4

जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच हालचालींना वेग; अध्यक्षपद खुले असल्याने मातब्बर रिंगणात उतरण्याचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.