Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“आम्ही काय करायचं आणि काय नाही तुम्ही आम्हाला शिकवू नका,” राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांमध्ये वाद

आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील बडे नेते आणि आमदार अशी ओळख असलेले विजयसिंह पंडित आणि संदीप क्षीरसागर यांच्यात वाद उफाळून आला आहे.

  • By विवेक
Updated On: May 13, 2026 | 03:43 PM
Sandip Kshirsagar, Vijaysingh Pandit, NCP, Ajit Pawar,

Sandip Kshirsagar, Vijaysingh Pandit, NCP, Ajit Pawar,

Follow Us
Follow Us:
  • विजयसिंह पंडित आणि संदीप क्षीरसागर यांच्यात वाद
  • मतदारसंघातील कामासंदर्भात होत असलेल्या बैठकीचे आमंत्रण न दिल्याने हक्कभंग दाखल करणार
  • विलीनीकरणाबाबत योग्य तो निर्णय मोठे साहेब आणि त्यांचे कुटुंबीय करतील
Beed: राज्यातील राजकीय वातावरणात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्या करतच असतात. परंतु, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यातील बडे नेते आणि आमदार अशी ओळख असलेले विजयसिंह पंडित आणि संदीप क्षीरसागर यांच्यात वाद उफाळून आला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कलह होत असल्याचे वारंवार दिसत आले आहे. अश्यातच आता बीड मधील राष्ट्रवादीच्या दोन दिग्गज नेत्यांमध्ये आता वाद उफाळून आला आहे.

आमदार विजयसिंह पंडित यांनी बीडमध्ये घेतलेल्या बैठकीनंतर हा वाद उफाळून आला. आमदार संदीप क्षीरसागर यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहीत आपल्या मतदारसंघातील कामासंदर्भात होत असलेल्या बैठकीचे आमंत्रण न दिल्याने हक्कभंग दाखल करण्याचे नमूद केले आहे. यावेळी पंडित यांच्यावर आरॊप करत क्षीरसागर म्हणाले, “आमदार विजयसिंह पंडित यांचं बिडवरती खूप प्रेम उतू चाललं आहे, असं दाखवतात. मात्र बीड मधले उद्योग गेवराईला नेट आहेत. बीड MIDC, रेशीम उद्योग यांसारखे उद्योग गेवराईला नेत आहेत,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, “अजितदादा हयात असताना मांजरसुभ्याचा पण सर्वे करा असं मी म्हंटल होत. बॅकवॉटर योजनेसाठी सर्वच स्तरावर आम्ही पाठपुरावा केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अजितदादांना दोनदा सभा घ्याव्या लागल्या. नगरपालिका निवडणुकीत जे काही केलं आहे ते अजितदादांनी केलं आजही. विकास काम असो कि भावनेचा विषय आम्ही अर्ध्या रस्त्यातून, चौकातून पळून जात नाही,” अश्या शब्दात त्यांनी विजयसिंह पंडित यांच्यावर आगपाखड केली.

Maharashtra Politics: राज्यातील सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर येणार? फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक

“हे बिडवरती प्रेम दाखवतात आणि सगळं गेवराईला घेऊन जातात. आम्ही काय करायचं आणि काय नाही हे तुम्ही आम्हाला शिकवू नका. या मतदारसंघाने आम्हाला दोनदा आमदार केले आहे. त्यामुळे आम्हाला शहाणपणा शिकवू नका. आम्ही रोज रस्त्यावर फिरून काम करत आहोंत,” असं क्षीरसागर म्हणाले.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र अजित पवारांच्या दुर्दवी मृत्यूनंतर याबाबत काही निष्पन्न झाले नाही. अश्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी त्यांनी ‘शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतली असल्याचे सांगितले. याबाबत संदीप क्षीरसागर यांना विचारले असता ते म्हणाले. “याबाबत मला काही माहिती नाही. मात्र अजितदादा हयात असताना त्यांच्यासोबत शेवटची भेट झाली असता ते म्हणाले होते कि आपण एकत्र येणार आहोत. पण त्यावर एवढं काही राजकारण सुरु आहे त्यामुळॆ त्यावर मी काही बोलणार नाही. योग्य तो निर्णय मोठे साहेब आणि त्यांचे कुटुंबीय करतील,” असे ते म्हणाले.

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Web Title: Ncp leader sandip kshirsagar slams vijayasingh pandit over beed politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Beed
  • NCP Sharad Pawar

संबंधित बातम्या

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…
1

शरद पवार गटाच्या खासदारांची प्रधानमंत्री मोदींसोबत २० मिनिटे चर्चा; अमोल कोल्हेंनी भेटीचा सगळा तपशीलच सांगितला…

‘पवारांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार?’; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, डीलिमिटेशनवरही सवाल
2

‘पवारांचे खासदार मोदींना भेटून काय दिवे लावणार?’; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, डीलिमिटेशनवरही सवाल

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला
3

भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याचे धाडस दाखवत असतील, तर…; रोहित पवारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टोला

सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार सोमवारी प्रधानमंत्री मोदींची घेणार भेट; नेमकी काय चर्चा होणार?
4

सुप्रिया सुळेंसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 खासदार सोमवारी प्रधानमंत्री मोदींची घेणार भेट; नेमकी काय चर्चा होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.