Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवण्याचे अधिकार फक्त या तीन नेत्यांकडेच; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजणार आहे. त्यासाठी महायुतीसह महाविकास आघाडीचे नेते तयारीला लागले आहेत. जेष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून संबोधित केले.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 29, 2024 | 12:27 PM
ncp leader sharad pawar press conference in baramati

ncp leader sharad pawar press conference in baramati

Follow Us
Close
Follow Us:

बारामती : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. यंदाची निवडणूकीमध्ये दोन महत्त्वाच्या युती आमने सामने असणार आहे. शरद पवार गट, ठाकरे गट आणि कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांनी गोविंदबागेमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले की, “यंदाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण आहे.  लोकसभेमध्ये वेगळं चित्रं होतं. प्रधानमंत्री सांगत होते 400 च्या वर जागा येतील. पाच वर्षपूर्वी जी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादी चार आणि काँग्रेसचा एक आला होता. आता राष्ट्रवादीने ज्या 10 जागा लढल्या त्यातील 8 जागा निवडून आल्या आहेत. लोकांचे मत कार्यकर्त्यांशी मताशी संबंधित होते म्हणून आपल्याला यश मिळाले.  नेते आणि नागरिक यांचे मत वेगळे होते. बारामतीत अनेक नेत्यांनी भाषणं केली आम्ही जागा जिंकणार असे सांगत होते. पण लोकांनी आणि तुम्ही ठवरले होते. 1 लाख 58 हजार मतांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली. काही लोक अशी असतात की आभाळकडे बघून पाऊस पडेल का नाही. पण आता कळायला लागले की पाऊस पडेल त्यामुळे गर्दी वाढली आहे,” असा टोला शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण देत लगावला आहे.

हे देखील वाचा : आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचं…; अमृता फडणवीसांनी साधला शरद पवार व उद्धव ठाकरेंवर निशाणा

पुढे आगामी विधानसभा निवडणूकीबाबत शरद पवार यांनी त्यांचे मत व्यक्त केले. शरद पवार म्हणाले की, “विधानसभेबाबत लोकांमध्ये खात्री झाली की या निवडणुकीत काही झालं तरी जिंकायचं आहे. आत्ताच्या निवडणूकीमध्येही चांगले निकाल लागतील यात शंका नाही. ही निवडणूक 3 लोकं एकत्र येऊन लढणार आहेत. निवडणूक आयोग तारीख ठरवेल. पुढच्या 8 ते 10 दिवसात हे काम संपले पाहिजे. महाविकास आघाडीमध्ये उमेदवार ठरवण्यासाठी एक कमिटी स्थापन केली जाईल. यामध्ये संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांचा समावेश असेल. या तिन्ही नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. इच्छुक उमेदवाराला विचारायचे नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय वाटत विचारले जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल. प्रत्येक तालुक्यात सर्व्हे केला जाणार आहे,” असे शरद पवार यांनी जाहीर केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी महाराष्ट्रामध्ये येऊन गेले आहेत. त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा अंदाज घेतला आहेत. यानंतर आता शरद पवार म्हणाले आहेत की, “माझा अंदाज आहे की 6 ते 10 च्या दरम्यान निवडणूक आयोग तारखा जाहीर करतील. 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान मतदान होईल असा अंदाज आहे. पुढच्या काही दिवसांत जागेचा निर्णय होईल. आपल्या जिल्ह्यात उमेदवारांची संख्या फार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अस्वस्थता निर्माण झाली आहे आणि लोकांच्यात चर्चा सुरू झाली आहे. आघाडी म्हटल्यावर काही निर्णय घ्यावे लागतात. चर्चा करून जागा सोडली जाईल. नुसती सोडली जाणार नाही तर त्याचा प्रचार करून निवडूनही आणावे लागणार आहे,” अशी जाणीव शरद पवार यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना करुन दिली आहे.

Web Title: Ncp leader sharad pawar said about mahavikas aaghadi vidhansabha elections 2024 prepration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • baramati
  • Uddhav Thackeray
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: निवडणूक होताच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता साथ सोडणार
1

Maharashtra Politics: निवडणूक होताच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता साथ सोडणार

Shivsena & MNS seat sharing:  ठाकरे गट-मनसेची जागावाटपाची चर्चा पूर्ण; दादर, शिवडी, भांडूप, विक्रोळी प्रभागांवरील वाद मिटले
2

Shivsena & MNS seat sharing: ठाकरे गट-मनसेची जागावाटपाची चर्चा पूर्ण; दादर, शिवडी, भांडूप, विक्रोळी प्रभागांवरील वाद मिटले

Thackeray Brother Alliance Announcement: उद्धव-राज एकत्र येणार; उद्या होणार ठाकरे-मनसे’च्या युतीची घोषणा?
3

Thackeray Brother Alliance Announcement: उद्धव-राज एकत्र येणार; उद्या होणार ठाकरे-मनसे’च्या युतीची घोषणा?

‘कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा होणार’; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान
4

‘कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा होणार’; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.