Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Politics: ‘आम्ही कष्ट केले आणि आमचीच नावे नाहीत?’; राष्ट्रवादीत पटेल-तटकरेंच्या नाराजीनाट्याने खळबळ

NCP Politics: गुवाहाटी येथे सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. यावेळी तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या यादीत आपली नावे नसल्याबद्दल विचारणा केल्याचे सांगितले जात आहे

  • By anuradha sagar
Updated On: May 13, 2026 | 04:44 PM
NCP Internal Dispute, Sunetra Pawar vs Sunil Tatkare, Praful Patel Disappointed, NCP National Executive List,

NCP Internal Dispute, Sunetra Pawar vs Sunil Tatkare, Praful Patel Disappointed, NCP National Executive List,

Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांची नावे नसल्याने पक्षात अंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.
  • तटकरे आणि पटेल यांनी “पक्ष वाढवण्यासाठी आम्ही कष्ट केले, पण आम्हाला न विचारता ही यादी कोणी बनवली?” असा थेट सवाल सुनेत्रा पवारांना विचारत आपली नाराजी व्यक्त केली.
  • सुनेत्रा पवार यांनी ही तांत्रिक आणि टायपिंगची चूक असल्याचे स्पष्टीकरण दिले असले तरी, ज्येष्ठ नेत्यांमधील नाराजी अद्याप कायम असल्याचे सूत्रांकडून समजते.
NCP Politics: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पक्षात मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांची नावे नसल्याने  पक्षातंतर्गत वादाला तोंड फुटले आहे.

या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना सुनेत्रा पवार यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे स्पष्टीकरणही दिले होते. मात्र, या संपूर्ण प्रकारावरून सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:  शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!

मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथे सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. यावेळी तटकरे आणि पटेल यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या यादीत आपली नावे नसल्याबद्दल विचारणा केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींना वेग आला असून, पुढील काही दिवसांत पक्षातील भूमिका आणि निर्णयांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी ‘ही यादी कोणी बनवली,’ आपल्याला न विचारता यादी बनविली, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, ‘ पक्ष वाढवण्यासाठी आम्ही कष्ट केले, पण आमचीच नावे यादीत नाहीत, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांच्यासमोर नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तटकरे, भुजबळांच्या नाराजीनंतर सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री उशिरा यादीत तांत्रिक चूक झाली, अशा आशयाचे ट्विटही केले. पण त्यानंतरही दोन्ही नेत्यांची नाराजी कायम आहे, असे सुत्रांकडून सांगितले जात आहे.

Maharashtra Politics: राज्यातील सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर येणार? फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक

राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षातील या नाराजी नाट्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीदेखील खळबळजनक दावा केला आहे. सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे २२ आमदार भाजपमधून लढणार असून, याबाबत त्यांनी निर्णयदेखील घेतल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे. तसेच, यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचेही काही लोक सामील आहे. सर्वजण मिळून 40 जण आहेत, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या संघर्षाची चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Ncp politics sunil tatkare praful patel disappointed ncp national executive list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • NCP Politics
  • praful patel
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड बैठकीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी घडामोड
1

अखेर भरत गोगावलेंना लॉटरी? बंद दाराआड बैठकीनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत मोठी घडामोड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.