Jitendra Awhad and Prashant Jagtap after Shiv Sena Thackeray group exited Mahavikas Aghadi
पुणे : राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या घडामोडी होत आहेत. राज्यामध्ये महाविकास आघाडी तुटली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे नेत्यांमध्ये नाराजीनाट्य सुरु आहे. तसेच मविआच्या मित्रपक्षांनी पराभवाला इतर दोन पक्ष जबाबदार असल्याची टीका केली आहे. यानंतर आता ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा नारा देत महाविकास आघाडीतून बाहेर पडले आहे. आगामी निवडणुकीमध्ये स्वबळावर लढण्याचे ठरवले आहे. यावर आता शरद पवार गटातील नेत्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रशांत जगताप यांनी ठाकरे गटाच्या या निर्णयावर संशय व्यक्त केला आहे. प्रशांत जगताप म्हणाले की, माझी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना या निमित्ताने एक सांगणे आहे की, निवडणूका जाहीर झाल्यानंतर अशा स्वरुपाच्या घोषणा होणे अपेक्षित आहे. मात्र त्या पूर्वीच अशा पद्धतीचे वक्तव्य करुन कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये याने सभ्रम निर्माण होतो. शरद पवार यांच्या नेतृत्वामध्ये आमचा पक्ष देखील स्थानिक स्वराज्य संघटनेच्या निवडणूका स्वबळावर लढू शकतो. पण शरद पवार यांची भूमिका एकत्रितपणे जाण्याची राहणार आहे. एकत्रितपणे ताकद मोठी राहणार आहे. ठाकरे गटाचा हा निर्णय असल्याचे, प्रशांत जगताप म्हणाले आहेत.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
शरद पवार गटाचे नेते व आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील ठाकरे गटाच्या स्वबळावरील निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जितेंद्र आव्हाड म्हणाले, “त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? पण विधानसभेच्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं, असं माझं मत आहे. त्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय. ग्राऊंडवर कार्यकर्त्यांचं मत काय आहे हे आम्हाला माहितेय. त्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं वाटत नाही. शेवटी बळंच कोणाला तरी घेऊन जाणं आम्हाला पटणारं नाही.” असे मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये बिघाड झाला आहे. निवडणुकीच्या आधी ठाकरे गट महाविकास आघाडीमधून बाहेर पडला असून स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाच वेळा भेट घेतली आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये मोठा बदल होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.