Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Not Reachable: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार? अजित पवार पुन्हा ‘नॉट रिचेबल’

अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये काही नियोजित बैठकां पार पडल्या. पण त्यानंतर मात्र अजित पवार अचानक बाहेर पडले. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आ

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 27, 2025 | 10:50 AM
Ajit Pawar Not Reachable: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार? अजित पवार पुन्हा ‘नॉट रिचेबल’
Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवार कोणालाही काहीही न सांगता अचानक रवाना
  • बारामती हॉस्टेलमध्ये नियोजित बैठक पार पडली
  • सुरक्षा रक्षकांचीही नजर चुकवून ते बाहेर पडल्याने एकच खळबळ
Ajit Pawar Not Reachable:  राज्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकीय वर्तुळात अंतर्गत घडामोडींना वेग आला आहे. अशातच शुक्रवारी युतीच्या चर्चा फिस्कटल्यानंतर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांनाच चक्रावून सोडले आहे. पुण्यातील बारामती हॉस्टेलमधून  अजित पवार (ajit pawar) कोणालाही काहीही न सांगता अचानक रवाना झाले. विशेष म्हणजे, त्यांनी कोणताही सरकारी ताफा किंवा पोलीस संरक्षण न घेता प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार नेमके कुठे गेले, याबाबत सध्या तर्कवितर्क सुरू असून,   चर्चांना उधाण आले आहे.

पुण्यात बारामती हॉस्टेलमध्ये नियोजित बैठक पार पडली. पण त्यानंतर अजित पवार कोणालाही काहीही न सांगता, पोलिसांचा सरकारी ताफा किंवा पोलिस संरक्षण न घेता अचानक एकटेच बाहेर पडले, त्यामुळे अजित पवार कुठे गेले, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहे. पोलिस संरक्षण, पोलिसांचा ताफा काहीही न घेता अजित पवार अचानक गायब झाल्याने ते नेमके कुठे गेले, का गेले, असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.

थायलंड-कंबोडियात पुन्हा संघर्षाची लाट! शांतताचर्चांदरम्यान सीमेवर थाई सैनिकांकडून सीमेवर जोरदार हवाई हल्ले

नेमकं काय घडलं?

पुण्यातील बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवार नियोजित बैठकांसाठी उपस्थित राहत आहेत. याचठिकाणी ते इच्छुकांच्या मुलाखती, बैठका, गाठीभेटी घेत आहेत. पण आज सकाळी बैठकीनंतर मात्र ते अचानक बाहेर पडले, त्यांच्यासोबत नेहमी असणारा पोलिसांचा फौजफाटा, पायलट कार आणि सुरक्षा रक्षकांचीही नजर चुकवून ते बाहेर पडल्याने एकच खळबळ उडाली होती.

दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी  शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी युती करणार असल्याची चर्चा सुरू होती. दोन्ही राष्ट्रवादींचे जागावाटपाचे सुत्रही जवळपास निश्चित झाले होते. पण घड्याळ की तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवायची, यावरून चर्चा फिस्कटली. ही चर्चा फिस्कटल्यानंतर अजित वार बारामती हॉस्टेलमधून तातडीने बाहेर पडले. चर्चा फिस्कटल्यानंतर अजित पवार एकटेच गेल्याने, त्यातच त्यांचा फोनही नॉट रिचेबल लागत आहे.

SA20 2025-26 : IPL 2026 च्या आधी रायन रिकल्टनचे शतक व्यर्थ…T20 सामन्यात केल्या 400 पेक्षा जास्त धावा!

दरम्यान, त्यानंतर काही वेळानंतर अजित पवारांची गाडी त्यांच्या जिजाई निवासस्थानी दिसून आली. पण अजित पवार निवासस्थानी आहेत, की दुसरीकडे कुठे, असाही प्रश्न आहे. अजित पवार चीडचीड करत एकटेच बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचा ताफा बोलावून घेतला होता.

अजित पवार हे त्यांच्या जिजाई निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे देखील जिजाई निवासस्थानी दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात जिजाई निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर अमोल कोल्हे जिजाई निवासस्थानातून बाहेर पडताना दिसले. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार आणि अमोल कोल्हे यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. या भेटीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Web Title: Ajit pawar not reachable ajit pawar is unreachable he suddenly disappeared after leaving his police escort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Nationalist Congress Party
  • NCP Politics

संबंधित बातम्या

Political News : पुण्यात काका-पुतण्या एकत्र नाहीच; दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य आघाडी चर्चेनंतर फिस्कटली
1

Political News : पुण्यात काका-पुतण्या एकत्र नाहीच; दोन्ही राष्ट्रवादीची संभाव्य आघाडी चर्चेनंतर फिस्कटली

प्रशांत जगतापांच्या पक्षबदलाची राज्यभर चर्चा, शरद पवारांचं नुकसान; काँग्रेससाठी फायदा?
2

प्रशांत जगतापांच्या पक्षबदलाची राज्यभर चर्चा, शरद पवारांचं नुकसान; काँग्रेससाठी फायदा?

Pune Politics: दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या; पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
3

Pune Politics: दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीच्या चर्चा फिस्कटल्या; पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Pune Politics : हडपसरची राजकीय गणिते आणि ‘संधी’चा शोध; पुण्याच्या राजकारणाचा घ्यावा बोध
4

Pune Politics : हडपसरची राजकीय गणिते आणि ‘संधी’चा शोध; पुण्याच्या राजकारणाचा घ्यावा बोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.