Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Split Rumors: रोहित पवारांनंतर काँग्रेस नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट; राष्ट्रवादीचे ४० नेते भाजपच्या वाटेवर?

NCP Split Rumors पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातील नाराजीच्या चर्चांमुळे आधीच संशयाचे वातावरण आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 18, 2026 | 08:31 PM
Rohit Pawar, Disha Salian Case CBI FIR, Aaditya Thackeray, Sushant Singh Rajput,

Rohit Pawar, Disha Salian Case CBI FIR, Aaditya Thackeray, Sushant Singh Rajput,

Follow Us
Follow Us:

 

NCP Split Rumors: राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) सध्या अंतर्गत कलह टोकाला पोहोचल्याची चिन्हे दिसत पक्षामध्ये काहीही सुरळीत सुरू नसल्याची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे माजी सरचिटणीस आनंद परांजपे यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे या चर्चेला उधाण आले असतानाच, आता काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोण चालवत आहे? शरद पवार, भाजप, सुनील तटकरे की प्रफुल्ल पटेल?” असा थेट सवाल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

रुपयाची घरसण होत असताना आता पंतप्रधानांची इज्जत घसरत नाही का? काँग्रेसचा संतप्त सवाल

४० नेते भाजपमध्ये जाणार?

आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील २४ आमदार भाजपमध्ये जातील, असा गौप्यस्फोट केला होता. त्यावर बोलताना अतुल लोंढे यांनी या दाव्याला दुजोरा दिला, मात्र आकडा आणखी मोठा असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. अतुल लोंढे म्हणाले की, “रोहित पवार यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. खरं तर रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीतील अशा ४० लोकांची नावे आहेत, जे भाजपमध्ये जाणार आहेत. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही, असे म्हटले होते. सत्तेत गेल्यावर हे लोक फुटणार असून राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडणार आहे.”

NEET पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम, भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटीचे आरोप

पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट, तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीवरून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यातील नाराजीच्या चर्चांमुळे आधीच संशयाचे वातावरण आहे. त्यातच लोंढेंच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मोदींच्या उपस्थितीवरून उद्धव ठाकरेंची पाठराखण

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेतील अत्यंत कमी उपस्थितीबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अतुल लोंढे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उदाहरण देत ठाकरेंची पाठराखण केली. “उद्धव ठाकरेंची उपस्थिती सभागृहात कमी होती हे खरे असले, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील उपस्थिती किती वेळा असते? मोदींची उपस्थिती अतिशय कमी आहे, ते फक्त टिंगलटवाळी करण्यासाठी संसदेत येतात. त्यांच्या तुलनेत उद्धव ठाकरेंची उपस्थिती नक्कीच जास्त आहे,” असा टोला लोंढे यांनी लगावला.

 

Web Title: Ncp split rumors congress claims 40 ncp leaders set to join bjp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • Atul Londhe
  • BJP
  • Congress
  • Nationalist Congress Party
  • rohit pawar
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
1

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
2

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र
3

१२ ऑक्टोबरपर्यंतची मुदत अपुरी, हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ द्या; सपकाळांचे निवडणूक आयुक्तांना पत्र

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.