Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra MLC Oath Ceremony: निलम गोऱ्हे, बच्चू कडूंसह १० जणांनी घेतली विधान परिषद सदस्यत्वाची शपथ

Maharashtra MLC Oath Ceremony-महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार होती.

  • By anuradha sagar
Updated On: May 14, 2026 | 01:18 PM
Maharashtra MLC Oath Ceremony:

Maharashtra MLC Oath Ceremony:

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या निलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे आणि झीशान सिद्दिकी यांच्यासह १० सदस्यांचा शपथविधी
  • विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली; या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती
  • शिवसेना शिंदे गटाच्या निलम गोऱ्हे यांनी सलग पाचव्यांदा विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेऊन नवा टप्पा गाठला आहे, त्या सध्या सभागृहाच्या उपसभापती म्हणूनही जबाबदारी
  MLC Oath Ceremony : राज्य विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ आणि पोटनिवडणुकीत विजयी उमेदवारांच्या शपथविधीला सुरुवात झाली आहे. यात सर्वात आधी शिवसेना शिंदे गटाच्या निलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांनीदेखील आज विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यांच्यासह ठाकरे गटाचे अंबादास दानवे, भाजपकडून प्रज्ञा सातव, प्रमोद जठार, झीशान सिद्दिकी, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे यांनीदेखील विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत.

राज्य विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे सर्व सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देणार आहेत. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील या शपथविधी सोहळण्याचा उपस्थित आहेत.

Bachchu Kadu: ‘प्रहार’ करता करता बच्चू कडूंच्या हाती ‘शिवबंधन’; विधान परिषदेसाठी उमेदवारी, पहिली प्रतिक्रिया समोर

निलम गोऱ्हे यांना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिवसेना-शिंदे गट) त्यांना विधान परिषदेसाठी सलग पाचव्यांदा उमेदवारी दिली आहे. त्या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून कार्यरत आहेत. शिवसेना पक्ष फुटीनंतर त्या उद्धव ठाकरे यांच्या गटातून एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्या होत्या.

शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० एप्रिल २०२६ रोजी डॉ. नीलम गोऱ्हे आणि ओमप्रकाश (बच्चू) कडू यांना उमेदवारी दिली होती. २ मे रोजी झालेल्या छाननी प्रक्रियेनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी (नऊ अधिक एक पोटनिवडणूक) २३ एप्रिल ते १३ मे असा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३० एप्रिल होती. त्यानंतर छाननीदरम्यान उर्वरित अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने ते बाद झाले. परिणामी नऊ उमेदवार आणि नऊ जागा अशी स्थिती निर्माण होऊन ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

Vidhan Parishad Election 2026: ठरलं तर! विधान परिषद निवडणूक होणार बिनविरोध, 9 जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ९ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार होती. या निवडणुकीसाठी १२ मे २०२६ रोजी मतदान होणार होते. मात्र, या १० जागांसाठी केवळ १० उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. त्यामुळे सर्व उमेदवारांची थेट निवड निश्चित झाली आहे.

या बिनविरोध निवडणुकीत भाजपचे ६ उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच शिवसेनेच्या २ उमेदवारांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा १ उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचा १ उमेदवाराचाही बिनविरोध विजय झाला आहे. या निवडणुकीमुळे विधान परिषदेत महायुतीचे संख्याबळ अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

 

Web Title: Nilam gorhe bachchu kadu sworn in maharashtra mlc oath

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 12:32 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Mumbai Politics

संबंधित बातम्या

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
1

जालन्याची नवी ओळख ‘सिल्क, सीड आणि स्टील’; ‘जालनाई’ ब्रँडचा शुभारंभ, मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात
2

‘महाराष्ट्रातील उद्योग बंद पडत आहेत, सरकारचे गुंतवणुकीचे दावे फोल’; हर्षवर्धन सपकाळांचा घणाघात

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
3

‘तुम्ही मराठ्यांचे वाटोळे केले, आता समाजाची ताकद लवकरच कळेल’; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त
4

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय; कृषी क्षेत्रात मोठा बदल, कृषी संचालक, सहसंचालकांसह चार नवीन अधिकारी होणार नियुक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.