Nitesh Rane PC: "सर्व धर्मांना नियम समान असावेत!"; विश्व हिंदू परिषदेच्या मागणीवर नितेश राणे आक्रमक
विश्व हिंदू परिषदेच्या पूजा मंडपांच्या परिसरात मांसाहारी पदार्थांची विक्री किंवा सेवन करू नये,या मागणी केली आहे. यावरून सोशल मीडियावर या विषयावरील चर्चा तीव्र झाली. याबाबत नितेश राणे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ‘ईदचा सण इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार साजरा केला जातो. मग हिंदू धर्माच्या सणांबाबतही त्याच प्रकारचे निकष का लावले जातात?’ गणेशोत्सव किंवा इतर हिंदू सणांच्या वेळी ध्वनिक्षेपक, मिरवणूक किंवा इतर बाबींवर सूचना दिल्या जातात; मात्र इतर धर्मांच्या सणांबाबतही समान भूमिका घेतली जाते का, असा नितेश राणेंनी केला आहे.
सनातन धर्माला लक्ष्य करून बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. सगळी आव्हाने फक्त हिंदूंनाच का? आम्हालाच का सल्ले दिले जातात?’ असा सवाल करत याबाबत स्पष्ट आणि समान भूमिका घेतली जावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर बाळासाहेब ठाकरे ठामपणे भूमिका मांडत असल्याचाही उल्लेख करण्यात आला.
सण-उत्सवांमधील डीजेच्या वापरावरूनही पत्रकार परिषदेत सरकारच्या भूमिकेचा संदर्भ देण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांस्कृतिक पद्धतीने सण साजरा करण्याचे आवाहन केले असून, डीजेमुळे नागरिकांना त्रास होत असेल तर त्यावर नियम लागू केले पाहिजेत, अशी भूमिका मांडण्यात आली.
हिंदु धर्मींयांच्या सणांना का बदनाम केलं जात आहे? मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमांनाही इतर समाजातील नागरिकांना परवानगी नाकारली जाते. तसचं दांडियाच्या कार्यक्रमात मुस्लिमांना परवानगी दिली जाऊ नये. जिहादी गरब्याच्या कार्यक्रमात जाण्यासाठी काहीही नाव सांगतो. डीजेचा त्रास सगळ्यांना होत असेल, तर हिंदू सणांसह ईदच्या मिरवणुकीतील डीजेलाही बंदी झालीच पाहिजे, ईदच्या मिरवणुका, रस्त्यावर होणारी नमाज आणि इतर धार्मिक कार्यक्रमांनाही समान नियम लागू झाले पाहिजेत, अशी भूमिका नितेश राणेंनी मांडली.’
Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुण
भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना समानतेचा अधिकार दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समानतेचा विचार मांडला आहे. त्यामुळे कायदा आणि नियम सर्व धर्मांसाठी समान असले पाहिजेत, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरही बोलताना नितेश राणे म्हणाले की, मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, सर्व जातींना समान न्याय देण्याची जबाबदारी महायुती सरकारची आहे. हिंदू समाजाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जातींचा विचार सरकार निश्चितपणे करेल, त्यामुळे मराठा आरक्षणासह विविध समाजांच्या मागण्यांवर सरकारने समतोल भूमिका घेण्याची गरज आहे.
दरम्यान, विरोधकांवर टीका करताना ‘सकाळी गुजराती समाजाबद्दल बोलायचे आणि संध्याकाळी त्याच समाजाच्या कार्यक्रमाला जायचे तुमच्या मालकाच्या मुलाला गुजराती समाजाच्या कार्यक्रमाला जाण्यापासून रोखा,’ अशा शब्दांत विरोधकांवर निशाणा साधण्यात आला.






