Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘2029 ला तिकीट नाही मिळालं तर अपक्ष लढेन’; ओमराजे निंबाळकरांचा सूचक इशारा, शिंदेंची वाढणार डोकेदुखी?

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी 2029 मध्ये लोकसभेचे तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 23, 2026 | 05:39 PM
Omraje Nimbalkar, Makarand Nimbalkar, Uddhav Thackeray, Eknath Shinde,

Omraje Nimbalkar, Makarand Nimbalkar, Uddhav Thackeray, Eknath Shinde,

Follow Us
Follow Us:
  • 2029 ला तिकीट न मिळाल्यास अपक्ष निवडणूक लढेन – ओमराजे निंबाळकर
  • महायुतीत आलो तरी धाराशिव जिल्ह्यातील संघर्ष कायम राहणार असल्याचा दावा
  • सहा खासदारांना उमेदवारी देण्याची ग्वाही शिंदेंनी दिल्यानंतरही निंबाळकरांच्या वक्तव्याने चर्चा
 

राज्याच्या राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत असून ठाकरेंच्या सेनेतून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांमुळे राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. या पक्षप्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या एका विधानाने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. 2029 मध्ये लोकसभेचे तिकीट मिळाले नाही तर अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भूमिकेबाबत बोलताना स्पष्ट केले की, महायुतीत सहभागी झालो असलो तरी धाराशिव जिल्ह्यातील राजकीय संघर्ष कायम राहणार आहे.

‘मांडीला मांडी लावून बसू शकत नाही’

यावेळी निंबाळकर म्हणाले की, “राज्यात काय होईल हे मला माहीत नाही. मात्र जिल्ह्यात मी मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. राणा पाटलांचे एकही मत मला नको. माझ्या खासदार निधीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 2019 ते 2024 या कालावधीतील निधीचा हिशोब तपासला पाहिजे. माझ्या कार्यकाळातील एकही रुपया शिल्लक राहिलेला नाही.”

खासदारानंतर आता आमदारांचं ‘ऑपरेशन टायगर’? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला चार आमदारांची दांडी

त्यांनी खासदार निधीच्या वापराबाबतही स्पष्टीकरण देत विकासकामांसाठी निधीचा पूर्ण वापर केल्याचा दावा केला. ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीबाबत त्यांनी घेतलेली भूमिका.

‘न्याय मिळाला नाही तर पुढची भूमिका दिसेल’

“मला न्याय हवा होता म्हणून मी राजकारणात आलो. जर न्याय मिळाला नाही तर माझी पुढची भूमिका सर्वांना दिसेल. 2029 मध्ये जागा मिळाली नाही तर मी अपक्ष निवडणूक लढेन,” असे त्यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर या विषयावर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत. दरम्यान, सहा खासदारांच्या शिवसेना प्रवेशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व खासदारांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळेल, अशी ग्वाही दिली होती.

‘सहाचे सहा खासदार धनुष्यबाणावरच लढतील’

पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना शिंदे म्हणाले होते, “सहाचे सहा खासदार शिवसेनेच्या तिकीटावर आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढतील. ते पुन्हा निवडूनही येतील.”

‘मराठीची चिरफाड केली’; राहुल नार्वेकरांवर राज ठाकरेंचा हल्लाबोल, विधानसभेतील शोकप्रस्तावावरून संताप

मात्र, पक्षप्रवेशानंतर अवघ्या एका दिवसात ओमराजे निंबाळकर यांनी तिकीट न मिळाल्यास अपक्ष लढण्याचा इशारा दिल्याने आगामी काळात महायुती आणि शिवसेनेतील अंतर्गत समीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Omraje nimbalkar independent election warning if no lok sabha ticket shiv sena shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 05:31 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mp Omraje Nimbalkar
  • shivsena

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता
4

उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंना कोर्टाचा दिलासा; Vasant Davkhare मानहानी प्रकरणाचा निकाल, 2009 च्या CD प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.