Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रश्न एक अन् उत्तरं तीन मंत्र्यांची; भर सभागृहात विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी

राज्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या शेख यांनी संस्थेने नियमानुसार टीईटी उत्तीर्ण शिक्षक नेमलेले नाहीत. तसेच शिक्षकांच्या बदल्या केल्या जात आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 11, 2025 | 11:53 AM
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजणार; 'हा' मुद्दा अद्याप प्रलंबितच

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप आज वाजणार; 'हा' मुद्दा अद्याप प्रलंबितच

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : मुंबईतील मालवणी येथील महापालिकेची शाळा खासगी संस्थेला चालवण्यात देण्याच्या प्रश्नावरून बुधवारी विधानसभेत कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. शेख यांना महापालिकेची शाळा ताब्यात घेण्याचा आणि याप्रकरणी मला धमकावण्यात आल्याचा आरोप लोढा यांनी केला. तर टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी शेख यांनी केली. या प्रश्नावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर लोढा आणि शेख यांच्यातील वादावादी शमली.

बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासात अस्लम शेख यांनी मुंबई महापालिका शाळांचे खासगीकरण करण्याच्या निर्णयाबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मुंबई महापालिकेच्या पीपीपी तत्वावर मालवणीमधील शाळा प्रयास या संस्थेला दिला. शाळा संस्थेला चालवायला दिली नाही तर संस्थेने फक्त नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक नेमले आहेत. त्यामुळे दहावीच्या निकालात सुधारणा झाल्याचा दावा केला.

राज्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या शेख यांनी संस्थेने नियमानुसार टीईटी उत्तीर्ण शिक्षक नेमलेले नाहीत. तसेच शिक्षकांच्या बदल्या केल्या जात असून, याप्रकरणी महापालिका आयुक्त किंवा प्रधान सचिवांच्या स्तरावर चौकशी करण्याची मागणी केली. ही चर्चा सुरू असताना मंत्री लोढा उभे राहिले आणि त्यांनी शेख यांना उद्देशून मालवणीची शाळा फझलानी ट्रस्टकडे ठेवण्यामागे हेतू काय आहे? असा सवाल केला. या ट्रस्टने परीक्षेच्या तोंडावर शाळा चालविण्यास नकार दिला. ही शाळा प्रयास संस्थेकडे आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या निकालात काय सुधारणा झाली हे बघा असे आव्हान देत लोढा यांनी शाळेत पालकांनी आंदोलन केले, तेव्हा आपण पालकमंत्री या नात्याने शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतल्याची माहिती दिली.

त्यावेळी शेख यांनी माझ्याशिवाय येथे कुणी येऊ शकत नाही. येथे सरकार चालणार नाही तर फक्त अस्लम शेख चालेल, अशी भाषा केल्याचे सांगत लोढा यांनी यासंदर्भात आपल्याकडे व्हिडिओ असल्याचा दावा केला. मालवणीत १०० एकर सरकारी जागेवर अतिक्रमण झाले असून येथील लोकसंख्या २० टक्क्यांवरून ३७ टक्क्यांवर गेल्याचा दावा करत शेख यांना लक्ष्य केले. शेख यांनी पुन्हा शिक्षकांच्या पात्रतेचा मुद्दा उपस्थित केले.

हेदेखील वाचा : Raj Thackeray in Thane Court : राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल; मला गुन्हा कबुल नाही…’ म्हणून स्पष्टच सांगितलं

Web Title: One question and three answers from ministers know what happened in legislative assembly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश
1

Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश

Ajit Pawar Plane Crash: शरद पवारांकडून घेतले राजकारणाचे धडे: अजित पवार कसे झाले महाराष्ट्राचे ‘दादा’
2

Ajit Pawar Plane Crash: शरद पवारांकडून घेतले राजकारणाचे धडे: अजित पवार कसे झाले महाराष्ट्राचे ‘दादा’

Ajit Pawar Plane Crash: बारामतीला जाणारे विमान कोणत्या कंपनीचे होते ; किती होती  किंमत?
3

Ajit Pawar Plane Crash: बारामतीला जाणारे विमान कोणत्या कंपनीचे होते ; किती होती किंमत?

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाती निधनाने राज्यभरात शोककळा; सर्वच क्षेत्रात हळहळ
4

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या अपघाती निधनाने राज्यभरात शोककळा; सर्वच क्षेत्रात हळहळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.