Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : नांदेडमध्ये RSS विरुद्ध खासदार; संघ पदाधिकाऱ्यांचे अनावृत पत्र व्हायरल

Nanded Political News : सहा माजी पदाधिकाऱ्यांनी राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांना उद्देशून लिहिलेले अनावृत्त पत्र सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2026 | 05:52 PM
Open Letter Written by RSS Functionaries to MP Dr. Ajit Gopchade Goes Viral Nanded Politics

Open Letter Written by RSS Functionaries to MP Dr. Ajit Gopchade Goes Viral Nanded Politics

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराशी संबंधित व परिवारातील वेगवेगळ्या आयामामध्ये काम करणाऱ्या सहा माजी पदाधिकाऱ्यांनी राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांना उद्देशून लिहिलेले अनावृत्त पत्र सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, यामुळे संघ (RSS) व भाजप कार्यकत्यांमध्ये वेगळीच चर्चा रंगली आहे.

संघाच्या कार्यकर्त्यांना आता भाजप नेत्यांकडून राजकीय लाभाच्या, सहकार्याच्या अपेक्षा असल्याचे यामधून अधोरेखित होत आहे. खासदार डॉ गोपछडे हे अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मी स्वयंसेवक असल्याचे सांगत असतात. या पत्रामध्ये खासदार गोपछडे यांच्यावर ग्रामीण भागातील संघ पदाधिकाऱ्यांच्या व कार्यकर्त्यांच्या समस्या, कामांकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

संघ परिवाराच्या पार्श्वभूमीवर तयार झालेले नेतृत्व महणून कार्यकर्त्यांच्या डॉ. गोपछडे व्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्या पूर्ण होत नसल्याची खंत पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष संवादातून असा अनुभव मांडला की, खासदार किंवा त्यांच्या प्रतिनिधींशी संपर्क साधणे कठीण झाले आहे.

हे देखील वाचा : श्रेयवादाचे राजकारण, भाजपात नाराजी; पक्ष संघटना कमकुवत अन् कार्यकर्ते निरुत्साही

फोन घेतला तरीही कामांची दखल घेत नाहीत

फोन घेतला तरीही कामांची दखल घेतली जात नाही, विशेषतः ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची कामे तहसील, ग्रामपंचायत, पोलिस स्टेशन, वीज खाते किंवा बँकांशी संबंधित असतात, मात्र ही साधी कामेही मार्गी लागत नसल्याने नाराजी वाढत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, हे पत्र लिहिणारे सर्वजण प्रामुख्याने शहरी भागातील रा.स्व. संघाचे माजी पदाधिकारी असल्याने, त्यांना ग्रामीण कार्यकत्यांच्या प्रश्नांची अचानक चिंता का वाटू लागली आहे, असा सवाल आहे. त्यामुळे या पत्रामागील नेमका उद्देश काय, याबाबतही विविध तर्कवितर्काना उधाण आले आहे. हे अनावृत्त पत्र माजी जिल्हा संघचालक दत्तात्रय देबडवार, माजी विभाग कार्यवाह लक्ष्मीकांत गंजेवार, माणिक भोसले, सनतकुमार महाजन, विश्व हिंदू परिषदचे प्रखंड प्रमुख कृष्णा देशमुख आणि भाजप महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा आरती पुरंदरे यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी सार्वजनिकरीत्या अशा प्रकारचे पत्र लिहितात, हे अपवादात्मक मानले जाते; कारण संघ परंपरेने अंतर्गत संवाद व संघटनात्मक शिस्त यावर भर देतो. त्यामुळे असे पत्र समोर येणे म्हणजे स्थानिक पातळीवरील नाराजी तीव्र झाल्याचे संकेत मानले जातात. भाजप खासदारांविरोधात थेट भूमिका घेणे हे दबाव निर्माण करून कार्यपद्धतीत बदल घडवण्याचा प्रयत्न असू शकतो.

हे देखील वाचा : साताऱ्यात महायुतीतच चुरस; जिल्हा परिषद राजकारण तापले

Web Title: Open letter written by rss functionaries to mp dr ajit gopchade goes viral nanded politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • nanded news
  • Nanded Politics
  • RSS
  • Rss Chief Mohan Bhagwat

संबंधित बातम्या

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा
1

Mohan Bhagwat: ‘भारताने कधीही महासत्ता…’, कॅनडात मोहन भागवत यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य; ‘तिसरा मार्ग’ दाखवणार जगाला दिशा

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध
2

Mohan Bhagwat: ‘RSS आमचे प्रतिनिधित्व करत नाही’, मोहन भागवतांच्या न्यूयॉर्कमधील कार्यक्रमाला 61 संघटनांचा विरोध; हिंदूंचाही निषेध

Rahul Gandhi PC Live: हल्दवानीत खर्गेंच्या रॅलीनंतर शुद्धीकरण; राहुल गांधींकडून भाजप-आरएसएसच्या मानसिकतेवर थेट हल्ला
3

Rahul Gandhi PC Live: हल्दवानीत खर्गेंच्या रॅलीनंतर शुद्धीकरण; राहुल गांधींकडून भाजप-आरएसएसच्या मानसिकतेवर थेट हल्ला

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य
4

RSS: मोहन भागवतांच्या ‘विश्व एकता’च्या महोत्सवावरून अमेरिकेत राजकीय रणकंदन; न्यूयॉर्कचे महापौर ममदानींचं ‘या’ विरोधात मोठं वक्तव्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.