
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक होते. त्यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. त्यानंतर भाजपला सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. पण मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी ऑपरेशन लोटस राबवत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सदस्य फोडले.
Satara ZP Budget 2026-27 : ४५ कोटींच्या बजेटला प्रशासकीय हिरवा कंदील; विकासकामांना मिळणार गती
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या मनीषा फडतरे आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे अशोकराव पाटील यांचा उमेदवारी दिली होती. दुसरीकडे भाजपने अध्यक्षपदासाठी कोरेगावच्या शिवसेनेच्या आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी आणि प्रिया शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठी राजू भोसले यांना उमेदवारी दिली होती. प्रिया शिंदे या भाजपच्या राज्य उपाध्यक्ष आहेत आणि त्या खटाव जिल्हा परिषद गटातून भाजपच्याच नेत्या आहेत.
६५ सदस्यीय सातारा जिल्हा परिषदेत भाजप २७ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तेचे समीकरण बदलले आहे. निवडणूकपूर्व आघाडी केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (२० जागा) आणि शिवसेना (१५ जागा) यांनी एकत्र येत ३५ जागांचे बळ एकवटले आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका सदस्याने राष्ट्रवादीसोबत गटनोंदणी केल्यामुळे या आघाडीचे एकूण संख्याबळ ३६ झाले आहे, जे बहुमताच्या आकड्यापेक्षा (३३) दोनने जास्त आहे.
Kavathe Mahankal: निसर्ग कोपला अन् कर्ज नडलं; मळणगावच्या कष्टकरी शेतकऱ्याचा विदारक अंत
निवडणूक काळात भाजप आणि विशेषतः मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मित्रपक्षांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई, मंत्री मकरंद पाटील आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भक्कम आघाडी तयार केली आहे. निकालानंतर या दोन्ही पक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवत जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवण्याचा निर्णय घेतला आहे.