Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑपरेशन टायगरला धक्का? ओमराजे-आष्टीकरांच्या घोषणेमुळे सहा खासदारांची सदस्यता धोक्यात

ओमराजे निंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी स्वतंत्रपणे भूमिका जाहीर केल्याने ठाकरे गटातील बंडखोर खासदारांच्या सदस्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑपरेशन टायगरला यामुळे मोठा धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 21, 2026 | 09:56 PM
ऑपरेशन टायगरला धक्का? ओमराजे-आष्टीकरांच्या घोषणेमुळे सहा खासदारांची सदस्यता धोक्यात

ऑपरेशन टायगरला धक्का? ओमराजे-आष्टीकरांच्या घोषणेमुळे सहा खासदारांची सदस्यता धोक्यात

Follow Us
Follow Us:
  • ओमराजे निंबाळकर आणि नागेश पाटील आष्टीकर यांनी केली स्वतंत्रपणे शिंदे गटात जाण्याची घोषणा
  • सहा खासदारांनी एकत्रित गट स्थापन केल्याचा दावा अद्याप नाही
  • ओमराजे आणि आष्टिकरांच्या घोषणेमुळे बंडखोर खासदारांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता 
 

शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या घडामोडींना वेग आला आहे. त्याआधी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनीही सत्ताधारी गटासोबत जाण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र या दोघांच्या स्वतंत्र घोषणांमुळेच आता उर्वरित बंडखोर खासदारांसमोर नवे कायदेशीर संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागेश पाटील आष्टीकर यांनी आपण कोणावरही नाराज नसल्याचे सांगत मतदारसंघाच्या विकासासाठी सत्तेची साथ आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. “लोकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. विकासकामांसाठी सत्तेत सहभागी होणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनीही शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केल्याने ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याची चर्चा सुरू झाली.

सहा खासदार होणार अपात्र ?

मात्र घटनात्मक आणि संसदीय नियमांच्या दृष्टीने या घडामोडींमध्ये एक महत्त्वाचा ट्विस्ट समोर आला आहे. तज्ज्ञांच्या मते, एखाद्या पक्षाच्या संसदीय गटातील दोन तृतीयांश सदस्यांनी एकत्रितपणे वेगळा गट स्थापन केल्यास त्यांना अपात्रतेपासून संरक्षण मिळू शकते. शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेत एकूण नऊ खासदार असल्याने किमान सहा खासदारांनी एकाचवेळी वेगळा गट स्थापन केल्याचे अधिकृतपणे जाहीर करणे आवश्यक होते. परंतु आष्टीकर आणि ओमराजे यांनी स्वतंत्रपणे भूमिका जाहीर केली. इतर खासदारांनी अद्याप अधिकृतरीत्या पक्ष सोडल्याचे किंवा स्वतंत्र गट स्थापन केल्याचे जाहीर केलेले नाही. तसेच लोकसभा अध्यक्षांकडेही अशा कोणत्याही गटाच्या मान्यतेबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

ओमराजे निंबाळकरांचा मोठा संकेत! “मी निर्णय घेणार, तुम्ही पाठिशी उभे राहा”; शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चांना उधाण

यामुळे ठाकरे गटाला या दोन्ही खासदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची संधी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. जर दोन तृतीयांश सदस्यांचा स्वतंत्र गट अधिकृतपणे अस्तित्वात नसल्याचे मानले गेले, तर वैयक्तिकरित्या पक्षत्याग केल्याचा मुद्दा पुढे येऊ शकतो. दरम्यान, उर्वरित खासदारांची भूमिका काय असेल आणि लोकसभा अध्यक्षांकडे कोणती प्रक्रिया पार पडते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’च्या पुढील वाटचालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर

हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर (Nagesh Patil Asthikar) यांनी थेट फेसबुक लाईव्हच्या (Facebook Live) माध्यमातून जनतेशी संवाद साधला. “मी दुसरीकडे कुठेही गेलो नाही, शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय! मी बाळासाहेबांची विचारधारा सोडलेली नाही,” असे स्पष्ट करत आष्टीकरांनी आपण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृतपणे सामील झाल्याचे जाहीर केले. मतदारसंघात रखडलेली विकासकामे आणि निधीची चणचण यामुळेच आपण सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी परखडपणे कबूल केले आहे.

Nagesh Patil Asthikar: ‘शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विचारधारा…’, नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर

बंडखोरीचे मुख्य कारण स्पष्ट करताना नागेश पाटील आष्टीकर भावुक झाले. ते म्हणाले, “आम्ही सर्व ६ खासदार १८ जून २०२६ पर्यंत कुठेही गेलो नव्हतो. मात्र, त्या दिवशी मेळाव्यात ज्या पद्धतीने आमच्यावर अविश्वास दाखवला गेला, भाषेचा अतिरेक झाला आणि बोचऱ्या शब्दांत टीका करण्यात आली, त्याने आमची मने दुखावली. तिथल्या वागणुकीमुळेच आता ‘उबाठा’ सेनेत थांबून काही उपयोग नाही, असा विचार सर्व सहकाऱ्यांनी केला.”

Web Title: Operation tiger twist omraje nimbalkar nagesh ashtikar mp membership risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 09:56 PM

Topics:  

  • Mp Omraje Nimbalkar
  • Operation Tiger
  • shivsena

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत
2

महायुतीत नवा ट्विस्ट! मुंबईत शिंदे गट मैदानात; पुण्यात भाजपच्या स्वबळाचे संकेत

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
3

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.