Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात राजकीय रणधुमाळी; महायुतीकडून बसवराज पाटील, महाविकास आघाडीचे महेश देशमुख मैदानात

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात यंदा थेट राजकीय लढत रंगणार आहे. महायुतीकडून बसवराज पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून महाविकास आघाडीकडून महेश देशमुख मैदानात उतरले आहेत. या थेट मुकाबल्यामुळे स्थानिक राजकारणात उत्सुकता वाढली असून मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 01, 2026 | 05:24 PM
उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात राजकीय रणधुमाळी; महायुतीकडून बसवराज पाटील, महाविकास आघाडीचे महेश देशमुख मैदानात

उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात राजकीय रणधुमाळी; महायुतीकडून बसवराज पाटील, महाविकास आघाडीचे महेश देशमुख मैदानात

Follow Us
Follow Us:
  • उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघात राजकीय रणधुमाळी
  • महायुतीकडून बसवराज पाटील
  • महाविकास आघाडीचे महेश देशमुख मैदानात
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीचे उमेदवार तथा माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरूमकर आणि महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांनी सोमवारी (३१ मे 2026) आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले.

महायुती आणि महाविकास आघाडीत होणार तुल्यबळ लढत, कोणत्या जागेवर महायुतीचा कोण उमेदवार लढणार? जाणून घ्या…

दोन्ही प्रमुख आघाड्यांचे उमेदवार रिंगणात उतरल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आता मतदारसंघात सरळ आणि प्रतिष्ठेची लढत होणार आहे. महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील मुरूमकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार विक्रम काळे, आमदार सुरेश धस, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्यासह महायुतीचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाला तिन्ही जिल्ह्यांतील महाविकास आघाडीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. उस्मानाबाद, लातूर आणि बीड या तीन जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींचे मतदान या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार असून, दोन्ही आघाड्यांनी विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीचा प्रचार अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महायुतीने बसवराज पाटील यांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील संघटनशक्ती आणि सत्तेचा फायदा मिळवण्याची रणनीती आखली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीने महेश देशमुख यांच्यावर विश्वास ठेवत विरोधी मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या निवडणुकीत पक्षनिष्ठेपेक्षा स्थानिक नेत्यांचे समीकरण, गटबाजी, अपक्ष सदस्यांचा पाठिंबा आणि क्रॉस व्होटिंगची शक्यता महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ही लढत सरळ दिसत असली तरी अंतर्गत राजकीय हालचालींमुळे निकालात मोठे ट्विस्ट पाहायला मिळू शकतात.

दोन्ही आघाड्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने प्रचार, मतदार संपर्क आणि स्थानिक नेत्यांच्या बैठका वाढण्याची शक्यता आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्य कोणत्या बाजूने कौल देतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Maharashtra politics : अहिल्यानगर विधान परिषदेत महाविकास आघाडीला धक्का! राणी लंके यांचा अर्जच नाही, काँग्रेसचे करण ससाणे रिंगणात

Web Title: Osmanabad latur beed local authority constituency direct fight basavaraj patil vs mahesh deshmukh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 05:24 PM

Topics:  

  • Latur
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल
1

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान
2

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान

Maharashtra Breaking News Today 2026:  दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!
3

Maharashtra Breaking News Today 2026: दिल्लीतील ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या मोर्चावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार!

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
4

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.