Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-US Trade Deal : Modi-Trump मैत्रीचा परिणाम? भारत-अमेरिका व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार

India-US Trade Deal Update : भारत आणि अमेरिकेतील व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्बत होईल. अमेरिकेच्या उप-सहाय्यक अधिकारी बेथनी पॉलोस मॉरिसन यांनी पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील चांगल्या संबंधामुळे व्यापार कराराला गती मिळाली असल्याचा दावा केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2026 | 11:56 AM
India-US Trade Deal

India-US Trade Deal

Follow Us
Follow Us:
  • Modi-Trump मैत्रीचा परिणाम?
  • भारतासोबत व्यापार करारावर लवकरच शिक्कामोर्तब होणार
  • अमेरिकेकडून मोठी अपडेट समोर
India-US Trade Deal News in Marathi : नवी दिल्ली/वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय व्यापार करार लवकरच पूर्ण होईल अशी माहिती समोर आली आहे. या कराराला अंतिम रुप देण्याच्या अत्यंत जवळ पोहोचलो असल्याचे अमेरिकेने सांगितले आहे. या कारारामुळे १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारतीय बाजारपेठे अमेरिकन व्यावसायिकांसाठी खुली होणार आहे. हा करार परस्पर फायदेशीर आणि समान तत्त्वावर आधारित आहे.

Nirav Modi Verdict : फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला लंडन कोर्टाचा दणका; कर्जप्रकरणी १०० कोटींची थकबाकी भरण्याचा आदेश

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उप-सहाय्यक अधिकारी बेथनी पॉलोस मॉरिसन यांनी भारतसोबतचा करार अंतिम टप्प्यात असल्याचा दावा केला. मंगळवारी (२३ जून) कॅपिटल हिल येथे फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीज च्या कार्यक्रमात याची माहिती दिली.

मोदी-ट्रम्प संबंधामुळे कराराला गती

त्यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चांगल्या संबंधामुळे करारा गती मिळाली आहे. दोन्ही देशांत फेब्रुवारी २०२६ मध्ये व्यापार करार पूर्ण करण्याचा निर्धार  करण्यात आला होता आणि आता या कराराच्या अत्यंत जवळ पोहोचलो आहोत असे बेथनी यांनी म्हटले.

बेथनी यांनी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि मोदी यांच्या समहतीनंतर दोन्ही देशांत वाटाघाटी चर्चा सुरु झाली होती. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये व्यापाराचा आढावा घेण्यात आला. यावरुन आम्ही कराराच्या अगदी शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत असे त्यांनी नमूद केले.

अमेरिकन वस्तूंसाठी खुली होणार भारतीय बाजारपेठ

त्यांनी सांगितले की, हा करार १.४ अब्ज लोकांची भारतीय बाजारपेठे अमेरिकन वस्तूंसाठी खुली करण्याच्या अटीवर करण्यात येणार आहे. दोन्ही देशांमध्ये २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत द्विपक्षीय व्यापार नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधींचा भारत दौरा

बेथनी यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रीर भारताच्या दौऱ्यावर आले आहे. सध्या त्यांची केंद्रीय वाणिज्य मंत्री व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत अंतिम व्यापार कराराबात चर्चा सुरु आहे. हा करार जागतिक व्यापार आणि आर्थिक दृष्टीकानोतून अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे अमेरिका-भारतातील तणालेले संबंध देखील पुन्हा रुळावर येतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

China-Bangladesh Relations : भारताला घेरण्याची नवी खेळी? बांगलादेशच्या ‘या’ हालचालीने वाढवली चिंता, तिस्ता प्रकल्पावर चीनचा डोळा?

Web Title: India us trade deal modi trump friendship america big update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • Donald Trump
  • India-US trade deal
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा
1

UNGA: ‘दहशतवादी देश मला प्रश्न विचारणार?’, पाकिस्तानी पत्रकाराला S. Jaishankar यांनी दाखवला आरसा

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
2

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला
3

Nepal Flood :जग तापतंय, संकट वाढतंय! UN मध्ये नेपाळच्या पंतप्रधानांनी हवामान न्यायाचा मुद्दा मांडला

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
4

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.