पुणे: पुणे महानगरपालिकेची आगामी निवडणूक ‘महायुती’च्या माध्यमातून लढवण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली आहे. पण, या घोषणेनंतर शिवसेनेलाच सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०१७ मध्ये झालेल्या पुणे महापालिका निवडणुकीत एकूण १६२ नगरसेवकांपैकी भाजपचे तब्बल ९७ नगरसेवक निवडून आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला ३९ जागा मिळाल्या, तर शिवसेनेचे केवळ १० नगरसेवक निवडून आले होते. पण तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत फूट झाल्यामुळे, आता महायुतीतील त्यांची ताकद लक्षणीयरीत्या घटली आहे.
यामुळे आगामी निवडणुकीत जागावाटप करताना भाजपचा वाटा सर्वाधिक राहणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसलाही दुसऱ्या क्रमांकाचा वाटा मिळेल. मात्र, शिवसेनेची स्थिती कमकुवत असल्याने त्यांना फारशा जागा मिळणार नाहीत, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.विशेष म्हणजे, शिवसेनेच्या मुळात केवळ १० नगरसेवकांपैकी महायुतीत आजमितीस फक्त एकच नगरसेवक असल्यामुळे, जागावाटपात शिवसेनेची वाटाघाटीची क्षमता फारशी प्रभावी ठरणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
मोठी बातमी! रूग्णांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश; केदारनाथमध्ये घडली दुर्दैवी घटना, पहा Video
या पार्श्वभूमीवर पुण्यातील शिवसेना गटात अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक स्तरावर पक्षाचे अस्तित्व आणि प्रतिनिधीत्व टिकवण्याचे मोठे आव्हान समोर असणार आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०२२ पूर्वीच्या परिस्थितीनुसार महानगरपालिका निवडणुका घेण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी पुणे महापालिका निवडणूक ‘महायुती’च्या तिकिटावर एकत्र लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अपवादात्मक परिस्थितीतच मित्रपक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील. अन्यथा ही निवडणूक संपूर्ण महायुती एकत्र लढणार आहे. तसेच प्रचारात एकमेकांवर टीका-टिप्पणी टाळली जाईल आणि सकारात्मक प्रचारावर भर दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेनंतर आता महायुतीतील जागावाटपाचे समीकरणाचीही चर्चा सुरू झाली आहे. मागील निवडणुकीतील निकाल पाहता, पुणे महानगरपालिकेत भाजपचा प्रभाव सर्वाधिक असून, त्यानुसार या वेळीही जागावाटपात भाजपचेच वर्चस्व राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
‘…म्हणून काँग्रेस शिवसेनेसोबत’; प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी सांगितलं खरं कारण
महायुतीमध्ये भाजपसोबत शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे दोन प्रमुख घटक पक्ष असून, त्यांना किती जागा मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे ९७ नगरसेवक, राष्ट्रवादीचे ३९ आणि शिवसेनेचे केवळ १० नगरसेवक निवडून आले होते. यामध्ये महायुतीमध्ये आज केवळ एक शिवसेना नगरसेवक उरला असून, त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या जागा मर्यादित असण्याची शक्यता अधिक आहे. त्यातच महायुतीतील तिन्ही पक्ष खरचं एकत्र निवडणूक लढवतील का, की जागावाटपावर एकमत न झाल्यास काही पक्ष स्वतंत्रपणे आपली ताकद आजमावतील असेही प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत.