केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश (फोटो- @Dubeyjilive)
डेहराडून: केदारनाथमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. आज सकाळच्या सुमारास हे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. लॅंडींग करत असताना ही घटना घडली. या हेलिकॉप्टरमध्ये एक डॉक्टर आणि तीन प्रवासी प्रवास करत होते. या घटनेत मात्र 4 ही जण सुरक्षित आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टर हे रूग्णांना घेऊन एम्स मध्ये जात होते.
केदारनाथ में बड़ा हादसा होने से बचा,
दो चिकित्सकों को केदारनाथ ले जा रहा हेलीकॉप्टर क्रैश होते बचा,एयर एम्बुलेंस में तकनीकी खराबी आने से इमरजेंसी लैंडिंग करनी पड़ी, यह एयर एम्बुलेंस AIIMS ऋषिकेश की है pic.twitter.com/kSRjWDMgax— Abhishek Dwivedi /अभिषेक द्विवेदी 🇮🇳 (@Dubeyjilive) May 17, 2025
एम्स ऋषिकेशचे हेलिकॉप्टरला केदारनाथ क्रॅश लॅंडींग करायला लागले. हेलिकॉप्टरच्या मागील भागात अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ही घटना घडली आहे. हेलिकॉप्टरमध्ये एक डॉक्टर, एक पायलट आणि आणि एक रूग्णालायचा सदस्य प्रवास करत होते. मात्र या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तीनही प्रवासी सुखरूप आहेत.
गढवाल कमिशनर विनय पांडे यांनी सांगितले की, हेलिकॉप्टर योग्य रीतीने लँड झाले आहे. त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अचानक हेलिकॉप्टर लँड करण्यामागे तांत्रिक बिघाड हे कारण असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी घटना टळली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास उड्डाण केले. मात्र नियोजित ठिकाणी लँड करण्याआधीच हेलिकॉप्टरला क्रॅश लॅंडींग करावे लागले. पायलटच्या हुशारीने मोठा प्रसंग टळला असे, रुद्रप्रयागचे जिल्हा पर्यटन अधिकारी संदीप कुमार यांनी सांगितले.
कडेकोट बंदोबस्तामध्ये केदारनाथ धामचे दरवाजे उघडले
केदारनाथ धाम यात्रेला सुरुवात झाली आहे. यामुळे भाविकांमध्ये एकच उत्साह आहे. मात्र नुकत्याच पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये एक प्रकारे भीती देखील निर्माण होण्याची शक्यता होती. याच पार्श्वभूमीवर केदारनाथमध्ये कटेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र केदारनाथमध्ये पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. यामुळे दहशतवादी हल्ल्यांना एकप्रकारे भारतीयांनी चपराक लगावली आहे.
पहलगाम हल्ल्याबाबत अपडेट जाणून घेण्यासाठी क्लिक करा
हिवाळ्यामध्ये केदारनाथमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बर्फवृष्टी होत असते. यामुळे मंदिर परिसरामध्ये बर्फाचा अक्षरशः खच पडलेला असतो. यामुळे केदारनाथ धाम हे सहा महिन्यांसाठी बंद असते. यानंतर मंदिर सुरु होते. भाविकांसाठी आता मंदिरे खुले करण्यात आले आहे. त्यापूर्वी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट आणि आरास करण्यात आली. याचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
बाबा केदारनाथ यांचा पंचमुख चलविग्रह उत्सव पालखी सोहळा देखील पार पडला आहे. गुरुवारी (दि.01) दुपारी ही पालखी भगवान केदारनाथाच्या जयघोषामध्ये केदारनाथमध्ये दाखल झाली होती. भोलेनाथांच्या दर्शनासाठी १५ हजार भाविक केदारनाथमध्ये दाखल झाले होते. यासाठी गुरुवारी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. ‘हर हर महादेव, बम बम भोले’च्या जयघोषात केदारथाम दुमदुमून गेलं. यानिमित्त केदारनाथ मंदिर 108 क्विटल फुलांनी सजवण्यात आले आहे.