Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

Maharashtra Politics: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका होण्याआधी राज्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार अशी एक चर्चा रंगू लागली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2025 | 07:50 PM
Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
Follow Us
Follow Us:

1. उद्धव ठाकरे व राज ठाकरेंच्या पॅनेलचा पराभव
2. बेस्ट निवडणुकीत दारुण पराभव
3. प्रसाद लाड, शशांक राव यांचे पॅनल विजयी

Thackeray Brothers: राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुका होण्याआधी राज्यात उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या पक्षांची युती होणार अशी एक चर्चा रंगू लागली होती. दरम्यान मुंबईतील प्रतिष्ठित बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक २०२५ मध्ये ठाकरे बंधूंना दारुण पराभव स्वीकारावा लागला होता. दरम्यान त्यांच्याविरोधात प्रसाद लाड व शशांक राव यांचे पॅनल विजयी झाले आहे. विजय होताच भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना डिवचले आहे.

जागा दाखवली…. pic.twitter.com/waPJMkMuL9 — Prasad Lad (@PrasadLadInd) August 19, 2025

राजय्त लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणार आहे. ठाकरे बंधू मराठी भाषेशी संबंधित निर्माण झालेल्या वादावर ठाकरे बंधू अनेक वर्षांनी एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी लिटमस टेस्ट असल्याचे म्हटले जात होते. मात्र पहिल्याच परीक्षेत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आहे. दरम्यान ठाकरे बंधू एकत्रित आल्याने काही फरक पडणार नाही असे महायुतीने सांगितले होते. त्यामुळे आता राज ठाकरे व उद्धव ठाकरे युतीसंदर्भात काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

मनसे आणि युबीटी (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उत्कर्ष नावाचे पॅनल या निवडणुकीत उभे केले होते. याद्वारे त्यांनी २१ उमेदवार उभे केले होते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने १८, राज ठाकरे यांच्या पक्षाने २ तर एक उमेदवार अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती संघाचा होता. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना युबीटी आणि राज ठाकरे यांच्या मनसे यांच्यातील युतीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, उद्धव गटाने असेही म्हटले आहे की, दोन्ही भाऊ येत्या महानगरपालिका (BMC)निवडणुकीत एकत्र लढतील.मात्र अद्याप दोन्ही बाजूंनी कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही.

दरम्यान मराठी भाषेवर जो वाद निर्माण झाला होता, त्यानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे जवळपास 18 ते 19 वर्षांनी एकत्रित आल्याचे पाहयला मिळाले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही नेत्यांनी लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र यावे अशी मागणी केली जात होती. दरम्यान ‘बेस्ट’ निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे पॅनल उभे केले होते. मात्र त्यांचा या निवडणुकीत सपशेल पराभव झाला आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही बंधु एकत्रित येणार का हे पहावे लागणार आहे.

Web Title: Mahayuti prasad lad criticizes to raj and uddhav thackeray best election results local body election maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • Local Body Election 2025
  • Maharashtra Politics
  • Mahayuti
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा
1

ध्वजारोहणाचा मान मिळाला, आता पालकमंत्रीपद कधी? भरत गोगावलेंचा मोठा दावा

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
2

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका
3

‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच’; निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंची टीका

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद
4

Shivsena Name Symbol Hearing: निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे शिंदे मुख्यमंत्री; सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांचा कडाडून युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.