Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : देगलूरमध्ये राजकीय उलथापालथ; अजितदादांच्या अकाली निधनामुळे कार्यकर्ते निराधार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांंच्या अकाली निधनानंतर तालुक्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वावर अवलंबून असलेले कार्यकर्ते सध्या निराधार झाल्याचे चित्र आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 24, 2026 | 04:08 PM
Political dispute in Deglur party in disarray after Ajit Pawar death political news

Political dispute in Deglur party in disarray after Ajit Pawar death political news

Follow Us
Follow Us:

प्रा. निवृत्ती भागवत : देगलूर : देगलूर तालुक्यात सध्या राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक घडामोडींमुळे विविध प्रश्न ऐरणीवर आले आहेत. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांंच्या अकाली निधनानंतर तालुक्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वावर अवलंबून असलेले कार्यकर्ते सध्या निराधार झाल्याचे चित्र आहे. अनेक कार्यकर्ते नव्या राजकीय आधाराच्या शोधात असून, त्यामुळे स्थानिक राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. शिवसेना शिंदे गटाने या परिस्थितीचा फायदा घेत मोर्चेबांधणी सुरू केली असून, काही कार्यकत्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे.

हे देखील वाचा : मराठा आरक्षण लाठीमार ते सातारा राडा! कोण आहेत आयपीएस तुषार दोशी?

दरम्यान, देगलूरमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेली बौद्ध धम्म परिषद उत्साहात पार पडली. भदंत करूनानंद महाघेरो यांच्या हस्ते उ‌द्घाटन झालेल्या या परिषदेत बौद्ध तत्त्वज्ञान, समता आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे. रमजान इंदही तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईदगाह मैदानावर नमाज अदा करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत बंधुभावाचा संदेश दिला. घराघरांत शिरखुम्यांसह पारंपरिक पदाथांची मेजवानी रंगली. याचबरोबर, तालुक्यात गुटखा विक्री पुन्हा वाढत असल्याचे प्रशासनाच्या कारवाया दिखाव्यापुरत्याच मर्यादित राहत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. काही ठिकाणी पोलीस व आरोपी यांच्यातील सैल संबंधांच्या चर्चेमुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत आला आहे.

हे देखील वाचा : सातारा प्रकरण टाकणार महायुतीत मिठाचा खडा? मध्यरात्री DCM शिंदेंनी गाठले वर्षा निवासस्थान

पाऊस, वीज, गॅस; तिहेरी संकट

कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाईची मागणी होत आहे. नैसर्गिक आपत्तींनीही तालुक्याला फटका बसला आहे. अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वीज कोसळून एका युवतीचा मृत्यू झाला, तसेच काही पशुधनाचाही बळी गेला. सुडगी येथे लोम्बकळणाऱ्या विजेच्या तारेमुळे एका सालगड्याचा मृत्यू झाल्याने वीज वितरण कंपनीच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संतप्त नागरिकांनी संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच, खाडीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. प्रत्यक्ष पुरवठा सुरळीत असतानाही कृत्रिम तुटवडा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत, देगलूर तालुक्यात राजकीय अनिश्चितता, प्रशासनावरील प्रश्नचिन्हे आणि नैसर्गिक संकटे यामुळे परिस्थिती गुंतागुंतीची बनली असून, तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Web Title: Political dispute in deglur party in disarray after ajit pawar death political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 04:08 PM

Topics:  

  • ajit pawar
  • nanded news
  • NCP Politics

संबंधित बातम्या

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा
1

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत; अनेक मंडळांकडून यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त
2

सणासुदीत भेसळीवर FDA ची करडी नजर! 6 आस्थापनांमधून तब्बल 675 किलो अन्नसाठा जप्त

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार
3

नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! १२ सराईत गुन्हेगारांना केले तीन जिल्ह्यांतून हद्दपार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.