Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राजकारणात पुन्हा मोठा भूकंप? ठाकरे गटाचे ५ खासदार मुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना उधाण

Maharashtra Politics: बार्शीटाकळी नगरपंचायतीतील अनेक नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Jun 15, 2026 | 05:43 PM
Shiv Sena UBT MPs skipping Matoshree meeting

Shiv Sena UBT MPs skipping Matoshree meeting

Follow Us
Follow Us:
  • राज्यात पुन्हा एकदा पक्षांतर आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू
  • ठाकरेंच्या बैठकीला काही खासदारांनी पाठ फिरवली
  • अकोट नगरपालिकेतील १५ हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात
Maharashtra Politics:  राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा भुकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर पुन्हा एकदा पक्षांतर आणि फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. पश्चिम बंगालमधील राजकीय घडामोडींनंतर आता महाराष्ट्रात पुन्हा राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः उद्धव ठाकरेंची शिवसेना यावेळी केंद्रस्थानी असल्याची चर्चा आहे.

उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी रविवारी (14 जून) पक्षाच्या खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीला काही खासदारांनी पाठ फिरवली. तर काहींनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. त्यामुळे ठाकरे गट फुटणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. पण बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी पक्षात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा करत सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकार घेणार ‘सरसकट’ कर्जमाफीचा निर्णय ? मुख्यमंत्री फडणवीसांसोबत होणार शिष्टमंडळाची बैठक

ठाकरे गटात कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा खासदार संजय राऊत करत असले तरी दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीनंतर ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.ठाकरे गटातील काही खासदार लोकसभा अध्यक्षांची भेट घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच काल मातोश्रीवरील बैठकीला पक्षाचे पाच खासदार अनुपस्थित राहिल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे.

दुसरीकडे विदर्भातील अकोला जिल्ह्यातील

बार्शी-टाकळी नगरपंचायत आणि अकोट नगरपालिकेतील १५ हून अधिक नगरसेवक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुर आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तसेच काही अपक्ष नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करणार आहेत. अशी माहिती समोर येत आहे.

‘दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा, स्वतःचे कार्यकर्ते मोठे करा,’ शर्मिला ठाकरेंचा पक्षफोडीवरून भाजप, आरएसएस वर निशाणा

मिळालेल्या माहितीनुसार, बार्शीटाकळी नगरपंचायतीतील अनेक नगरसेवक मुंबईकडे रवाना झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत.

स्थानिक राजकारणात नवी समीकरणे?

बार्शीटाकळी आणि अकोटमधील संभाव्य पक्षांतरामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून संघटनात्मक बळकटीसाठी हालचाली सुरू असून, या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आता मुंबईतील बैठकीनंतर नेमके किती नगरसेवक शिंदेसेनेत प्रवेश करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 

 

Web Title: Political tremors in maharashtra uddhav thackerays mps skinned matoshree meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Political Crisis
  • NCP Politics
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा
1

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!
2

लंडनमध्ये विराट कोहली थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; क्रिकेटपासून महाराष्ट्राच्या विकासापर्यंत रंगली खास चर्चा!

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर
3

Uday Samant : ‘गटबाजी सोडा, संघटना मजबूत करा; ही शेवटची संधी!’ उदय सामंतांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना घरचा आहेर

Eknath Shinde: लंडनच्या ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंची इंग्रजीमध्ये दमदार गर्जना; ‘स्टेट्समनशिप पुरस्कारा’ने झाला सन्मान
4

Eknath Shinde: लंडनच्या ब्रिटिश संसदेत एकनाथ शिंदेंची इंग्रजीमध्ये दमदार गर्जना; ‘स्टेट्समनशिप पुरस्कारा’ने झाला सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.