
Politics underway in Jalna for the local body elections and preparations by aspirants
Local Body Elections : पैठण : राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. याच पार्श्वभूमीवर जोरदार राजकारण रंगले असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर पैठण येथे महायुती तसेच महाविकास आघाडीमधील गोंधळ शिगेला पोहोचला आहे. तर काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून येत असल्याने यंदाची नगपपालिका निवडणूक चांगलीच रंगणार आहे.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत जातीय समिकरणे महत्त्वाची ठरणार असल्याचे चित्र आहे. पैठण शहरात एका बाजूला शिंदे गट आणि भाजप “सत्ता राखण्याच्या मिशनवर आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि ठाकरे गट ‘एकजूट’चा नारा देत असले तरी, आतल्या गोट्यात उमेदवारीपासून मतदारसंघ वाटपापर्यंत मतभेदांचे वारे जोरात वाहत आहेत. शिंदे गटाचे खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे पुन्हा एकदा नगरपरिषद आपल्याकडे ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार संजय वाघचौरे, माजी मंत्री अनिल पटेल, आणि माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे या तिघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. या तिघांच्या गोटातच युतीविना लहण्याच्या चर्चेने आघाडी-युतीच्या गणितात मोठा तिढा निर्माण केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मतदारांची फाटाफुट कुणाच्या पथ्यावर?
सन २०१६ मध्ये झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत सूरज लोळगे हे भाजप पक्षाच्या तिकिटावरून जनतेतून निवडून आले आणि नगराध्यक्षपद पटकावले. त्या वेळी काँग्रेसने १०. शिवसेनेने ७, भाजपने ५, तर १ जागा अपक्षाने जिंकली होती.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सूरज लोळगे यांनी शिवसेनेचे राजू परदेशी यांचा तब्बल ३,५०० मतंनी पराभव केला होता. मात्र यंदा परिस्थिती पूर्ण बदलली आहे पक्षीय समीकरणे, चेहरे आणि जातीय तोल या तिन्ही गोष्टीनी निवडणूक प्रचंड दुरशीवी बनवली आहे. शिंदे गटाचे खासदार भुमरे यांनी संघटनशक्तीच्या जोरावर सत्ता राज्याची तयारी केली आहे, तर वाघचौरे-पटेल-गोर्ड तिकडी बदल गया आहे या घोषणेवर जनतेत उतरणार आहे. दरम्यान, काँग्रेस आणि ठाकरे गट सततचा त्यांचा गतीमान प्रचार विरोधकांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे चित्र आहे. भाजप-शिद गटातील शांतता मात्र रणनीतिक आहे का अंतर्गत मतभेदांची सोतक, यावर राजकीय वर्तुळात चर्वेचा ऊहापोह सुरू आहे.
पैठणमध्ये दलीत मुस्लिम मतदार परंपरेने काँग्रेस-राष्ट्रवादीकडे झुकलेले असले तरी, नव्या पिढीत स्वतंत्र नेतृत्याची मागणी जोर चरतेय. ओबीसी मतदार है निगांयक भूमिकेत आहेत हे मत भाजप-शिंदे गटाकडे झुकले तर सत्तेचा किल्ला पुन्हा त्यांच्या हातात, अन्यथा विरोधकांना संधी असे एकंदर चित्र स्फट झाले आहे. मराठा व दलित मतदारांमध्ये गटबाजी असल्याने मतदानाची छूट कोणाच्या पारक्रवात पड़ते हेच निकाल ठरवणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारपण
या वेळी नगराध्यक्षपद महिला सर्वसाधारण वर्गासाठी राखीव असल्याने पैठणमध्ये उमेदवारांची चर्चा रंगली आहे. यात प्रमुख चर्चेत असलेली सत्रांमध्ये भाजपकडून मोहिनीक लोळगे शिंदे गट (शिवसेना) विद्या भूषण कावसनकर, वैशाली ईश्वर परदेशी, राष्ट्रवादी। पवार गट) कोमल जितू परदेशी, ठाकरे गटाकडून राखी राजू परदेशी, अपर्णा गोड, काँग्रेसकडून सुदैवी योगेश जोशी यांची नावे जवळपास निश्चित मानले जात आहे आघाडी युतीचे अंतिम गणित ठरल्यावरच उमेदावरांची अधिकृत घोषणा होणार आहे.
खासदार भुमरे यांचा आशीर्वाद कोणाला?
खासदार भुमरे यांच्या आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठणच्या राजकारणात सत्तारूड शिंदे गटात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार संदीपान भुमरे, आ. विलस भूमरे यांच्या आशीर्वादाने कोणाच्या पारड्यात वजन ढणार, बाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे शिवसेनेकडून भूषण कावसनकर यांच्या पत्नी विद्या भूषण कावसनकर तसेच माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी यांची सून वैशाली परदेशी यांचे उमेदवारीसाठी नाव जवळपास निश्चित मानली जात आहेत. दोघीही प्रभावशाली कुटुंबांमधून असून, भुमरे पिता-पुत्र यांच्या नजीकच्या वर्तुळातील म्हणून ओळखल्या जातात.