Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘देवेंद्र फडणवीस एका व्यक्तीमुळे नाही, जनतेच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झाले’; मनोज जरांगेंना प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांना भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे समर्थन करत त्यांनी समाजात तेढ निर्माण करणारी भाषा टाळण्याचे आवाहन केले.

  • By विवेक
Updated On: Aug 06, 2026 | 06:14 PM
bjp leader pravin darekar

bjp leader pravin darekar

Follow Us
Follow Us:
  • मनोज जरांगे यांच्या आरोपांना प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर
  • ‘फडणवीस एका व्यक्तीमुळे नव्हे, जनतेच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झाले.’
  • मराठा आरक्षणावर चर्चेसाठी सरकार आजही तयार असल्याचा दावा
 

मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस, मराठा आरक्षण आणि जात पडताळणी प्रक्रियेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करत जरांगेंना संयमाने बोलण्याचा सल्ला दिला.

जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावरून आणि कुणबी प्रमाणपत्रावरून पुन्हा एकदा तोफ डागली असून त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर ?

प्रवीण दरेकर म्हणाले की, “प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहून वक्तव्य करणे आवश्यक आहे. जात पडताळणी प्रक्रियेत एखादे प्रमाणपत्र वैध किंवा अवैध ठरवण्याचा निर्णय सक्षम प्राधिकरण घेत असते. त्यामुळे कोणत्याही राजकीय दबावामुळे किंवा सरकारच्या इच्छेमुळे प्रमाणपत्र मंजूर अथवा रद्द होऊ शकत नाही. जर एखाद्याला निर्णय चुकीचा वाटत असेल, तर त्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे,” असे त्यांनी सांगितले.

‘आधी पक्ष सांभाळा मग पतंगबाजी करा…’, शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची संजय राऊतांवर टीका

मराठा आरक्षणाबाबत बोलताना दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाच्या हितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचा दावा केला. “मराठा समाजाला ओबीसींसारख्या विविध सवलती देण्याचे निर्णय सरकारने घेतले असून, समाजाच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, या विषयावर राजकीय भूमिका घेण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे, ” असे त्यांनी स्पष्ट केले.

बावनकुळेंच्या नार्को टेस्ट मागणीवर मोठे विधान

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नार्को टेस्टची मागणी आणि सरकारवर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, समाजात तेढ निर्माण करण्यापेक्षा सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम होणे गरजेचे आहे. “वाईट करायला फारशी अक्कल लागत नाही; पण चांगले काम करण्यासाठी दूरदृष्टी आणि समज आवश्यक असते,” असे म्हणत त्यांनी विकासाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.

एकनाथ शिंदे यांच्याबाबतच्या टीकेवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत “माझ्यामुळे मुख्यमंत्री झाले” अशा प्रकारची विधाने करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस हे राज्यातील विविध समाजघटकांच्या पाठिंब्यामुळे मुख्यमंत्री झाले असून, कोणत्याही एका व्यक्तीमुळे त्यांना हे स्थान मिळालेले नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

‘सरकारचा हस्तक्षेप नाही’; मनोज जरांगे यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

फडणवीस महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासामुळे घडले

मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या इशाऱ्याबाबत बोलताना दरेकर यांनी उपरोधिक भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय नेतृत्व त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, महायुतीच्या पाठिंब्याने आणि महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासामुळे घडले आहे. त्यामुळे अहंकाराची भाषा टाळून विषयापुरतेच बोलावे, असा सल्लाही त्यांनी जरांगे यांना दिला.

दरम्यान, मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि कुणबी प्रमाणपत्रांबाबतचे वाद अद्याप कायम असून, या विषयावर सरकार आणि आंदोलक यांच्यातील संवाद पुढील काळात कोणते वळण घेतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pravin darekar reaction on manoj jarange maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Manoj Jarange Patil
  • Maratha Reservation
  • MLA Pravin Darekar

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात
1

Devendra Fadnavis on Rahul Gandhi : ‘राहुल गांधींनी पक्ष सोडून स्टँडअप कॉमेडियन व्हावं’; मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
2

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
3

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा
4

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.