Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रियांका चतुर्वेदी ठाकरेंची शिवसेना सोडणार?; ‘ते’ समर्थन ठरतंय चर्चेचं कारण…

गेल्या १२ वर्षांपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून संसदेत वर्चस्व राखणाऱ्या भाजपप्रणित आघाडीला शुक्रवारी मोठा धक्का बसला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 19, 2026 | 03:35 PM
प्रियांका चतुर्वेदी ठाकरे सेना सोडणार

प्रियांका चतुर्वेदी ठाकरे सेना सोडणार

Follow Us
Follow Us:

मुंबई : मोदी सरकारच्या महिला आरक्षणासाठी मतदारसंघ पुनरर्चनेच्या मांडलेल्या १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकाचे प्रियांका चतुर्वेदी यांनी समर्थन केले. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा याला ठाम विरोध होता. तरीही याचे समर्थन चतुर्वेदी यांनी केले. त्यामुळेच आता त्या उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपुष्टात आला होता. पुन्हा राज्यसभेत जाण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. परंतु शरद पवार हे महाविकास आघाडीकडून राज्यसभेत गेल्याने चतुर्वेदी यांना संधी मिळू शकली नाही. त्यानंतर चतुर्वेदी भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे चतुर्वेदी या ठाकरेंची साथ सोडणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या १२ वर्षांपासून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या माध्यमातून संसदेत वर्चस्व राखणाऱ्या भाजपप्रणित आघाडीला शुक्रवारी मोठा धक्का बसला. महिला आरक्षणाशी संबंधित संविधानातील १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेत मंजुरी मिळू शकली नाही. या विधेयकासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यक होते. मात्र, बाजूने २९८ आणि विरोधात २३० मते पडल्याने विधेयक नामंजूर झाले.

वेगळी भूमिका घेतली

या घडामोडीनंतर उबाठा शिवसेनेमध्ये अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले आहेत. पक्षाच्या माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी विधेयक फेटाळल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त करत पक्षाच्या भूमिकेपासून वेगळी भूमिका घेतली. ठाकरे गटाच्या खासदारांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले असताना, चतुर्वेदी यांनी मात्र या विधेयकाचे समर्थन केले आणि ते मंजूर न होणे हा भारतीय लोकशाहीसाठी दुःखाचा दिवस असल्याचे म्हटले.

युद्धावरून सरकारला केले होते लक्ष्य

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीवर भाष्य करताना, प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी म्हटले की, ही बैठक बोलावण्यात विलंब झाला आहे. ही बैठक बोलावून सरकारला (Central Goverment) आता नक्की काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Web Title: Priyanka chaturvedi to leave thackerays shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Priyanka Chaturvedi
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले
1

Disha Salian Case : ‘फालतू चारित्र्यहनन बस्स झालं!’ दिशा सालियन प्रकरणावर उद्धव ठाकरे संतापले

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
2

Shivsena Symbol Supreme Court Hearing: ठाकरे-शिंदे वादाचा अंतिम टप्पा; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.