Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Thackeray : मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा; चतु:शृंगी पोलिसांचा तपास सुरू

Amit Thackeray : पुण्यातील गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विनापरवानगी प्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह २० ते २५ जणांविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 31, 2026 | 07:20 PM
मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा

मोदींचा फोटो हटवल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा

Follow Us
Follow Us:
  • अमित ठाकरेंसह २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल
  • गणेशखिंडच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोदींचा फोटो हटवल्याचा आरोप
  • चतु:शृंगी पोलिसांकडून प्रकरणाचा पुढील तपास सुरू
 

Amit Thackeray : शासकीय तंत्रनिकेतन, गणेशखिंड येथील कार्यालयात विनापरवानगी प्रवेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटविल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्यासह २० ते २५ पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्त्यांविरोधात चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शासकीय तंत्रनिकेतनचे कर्मचारी डॉ. राजेंद्र काशीराम पाटील (वय ४२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोमवारी (३१ ऑगस्ट) दुपारी साडेबारा ते १.१५ वाजण्याच्या सुमारास गणेशखिंड येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये हा प्रकार घडला.

फिर्यादीनुसार, अमित ठाकरे व त्यांच्यासोबत असलेले २० ते २५ पदाधिकारी, विद्यार्थी व कार्यकर्ते विनापरवानगी संस्थेच्या आवारात जमले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांच्या कार्यालयात विनापरवानगी प्रवेश केला. कार्यालयात असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो काढून घेऊन घोषणाबाजी करीत गोंधळ घातल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कार्यालयातील कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

Amit Thackeray: पुण्यात अमित ठाकरेंच्या दौऱ्यात राड्याची ठिणगी? सरकारी महाविद्यालयातून मोदींचा फोटो हटवला, VIDEO व्हायरल

या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यासह संबंधितांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक छाया चोरकर यांच्याकडे तपास सोपविण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

नेमके प्रकरण काय?

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याची सुरुवातच एका वेगळ्या वादामुळे चर्चेत आली आहे. विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अमित ठाकरे आज (31 ऑगस्ट 2026) शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयात पोहोचले. मात्र, प्राचार्यांच्या कार्यालयातील नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून यावेळी नवा वाद निर्माण झाला.

मी सरकारचा भाग नाही, मी आमदार अन्…; सुधीर मुनगंटीवारांच्या विधानाने भाजपमध्ये खळबळ

शिवाजीनगर येथील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोच्या शेजारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले होते. ते पाहिल्यानंतर अमित ठाकरे यांनी, शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाजूला नरेंद्र मोदी यांचा फोटो कशासाठी लावण्यात आला आहे? असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर लगेच उपस्थित मनसे कार्यकर्त्यांनी नरेंद्र मोदी यांचा फोटो त्या ठिकाणाहून खाली उतरवले. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.

Web Title: Pune news amit thackeray case pm modi photo removed government polytechnic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • amit thackeray
  • MNS
  • PM Narendra Modi
  • pune news
  • Pune Police

संबंधित बातम्या

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकची ओवैसींची भूमिका चर्चेत!
1

Owaisi on Elon Musk : मोदींवर बोलणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींनी सुनावलं! स्टारलिंकची ओवैसींची भूमिका चर्चेत!

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय
2

Cricket: पुण्यात स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीगचा थरार! अवधुत विभुते क्रिकेट ॲकॅडमीचा शानदार विजय

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा
3

Baramati News : रेवती सुळे, जय पवार यांच्यावर नवी जबाबदारी; विद्या प्रतिष्ठानमध्ये महत्त्वाची घोषणा

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
4

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.