Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moshi Garbage Disaster: मोशी दुर्घटनेची केंद्र सरकारकडून चौकशी करा! श्रीरंग बारणेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी

या दुर्घटनेत किंवा प्रकल्पातील कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेस जबाबदार असलेल्या अधिकारी, संबंधित संस्था व कंपनीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. याशिवाय, पंतप्रधान कार्यालयाला चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तींवरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 01, 2026 | 04:45 PM
Srirang Barne PM Modi Letter, Moshi Garbage Depot Accident PCMC,

Srirang Barne PM Modi Letter, Moshi Garbage Depot Accident PCMC,

Follow Us
Follow Us:

Moshi Garbage Disaster:  मोशी येथील कचरा डेपोतील कचऱ्याचा डोंगर वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या अनधिकृत तीन मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत नऊ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हा प्रकल्प उभारताना महापालिकेने चुकीची कागदपत्रे सादर करून पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडून सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले आहे. त्यात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपो येथे अँटोनी लारा रेन्यूएबल कंपनीच्या माध्यमातून १४ मेगावॅट क्षमतेचा वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प उभारला आहे.

Ajit Doval Lokmanya Tilak Award Pune: अजित डोवाल यांना राष्ट्रीय लोकमान्य टिळक पुरस्कार; अमित शहा यांच्या हस्ते पुण्यात गौरव

हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन, स्वच्छ पर्यावरण आणि ऊर्जा निर्मिती या उद्देशाने उभारण्यात आला आहे. १ ऑगस्ट २०२३ रोजी आपल्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाच्या कार्यालयीन इमारतीचा पहिला व दुसरा मजला बेकायदेशीररीत्या बांधण्यात आला होता.

 

यंत्रणांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह

महापालिकेने चुकीची कागदपत्रे सादर करून पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केल्याची शक्यता आहे. जर हे सत्य असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब असून तिची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.८ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसादरम्यान प्रकल्प परिसरात साठवून ठेवलेला कचऱ्याचा डोंगर घसरल्यामुळे इमारत कोसळली.

या भीषण दुर्घटनेत ९ कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रथमदर्शनी ही घटना सुरक्षा मानकांचे पालन, देखभाल व्यवस्था तसेच संबंधित अधिकारी व यंत्रणांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय, निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी.

PCMC DP Plan Hearing: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या डीपी प्लॅनवरील ५६ हजार हरकतींवर ‘या’ तारखेपासून सुनावणी

कंपनीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई

तसेच, या दुर्घटनेत किंवा प्रकल्पातील कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेस जबाबदार असलेल्या अधिकारी, संबंधित संस्था व कंपनीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी. याशिवाय, पंतप्रधान कार्यालयाला चुकीची अथवा दिशाभूल करणारी माहिती देणाऱ्या व्यक्तींवरही योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. यासोबतच, देशभरात सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर कार्यरत असलेल्या सर्व वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पांच्या सुरक्षा मानकांची, संरचनात्मक गुणवत्तेची आणि कार्यपद्धतीची व्यापक तपासणी करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळता येईल, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे.

Web Title: Pune news mp srirang barne demands high level inquiry in moshi garbage depot tragedy pm modi letter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • Pimpri Chinchwad
  • Pune Politics
  • shivsena
  • Shrirang Barne

संबंधित बातम्या

PCMC DP Plan News: थेरगावमध्ये रिंगरोड तर मोशीत आरक्षणांना तीव्र विरोध; आकुर्डीत DP आराखड्यावर सुनावणीचा धडाका
1

PCMC DP Plan News: थेरगावमध्ये रिंगरोड तर मोशीत आरक्षणांना तीव्र विरोध; आकुर्डीत DP आराखड्यावर सुनावणीचा धडाका

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?
3

PCMC Politics: पिंपरी-चिंचवड पालिकेत ‘तारीख पे तारीख’; महापौरांनी सभा १५ ऑक्टोबरपर्यंत का केली तहकूब?

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद
4

Shivsena Symbol Case : शिंदे गटाचा मोठा दावा; ‘विजयी आमदारांच्या मतांपैकी ७६% मते आमच्याकडे’, सुप्रीम कोर्टात वकिलाचा युक्तिवाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.