Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purvesh Sarnaik : “राऊत मंद झाले…, संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा…”, पूर्वेश सरनाईकांचा हल्लाबोल

युवकांचा अवमान करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करत युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी खासदार संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलन छेडण्यात येईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 15, 2026 | 03:19 PM
"राऊत मंद झाले..., संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा...", पूर्वेश सरनाईकांचा हल्लाबोल

"राऊत मंद झाले..., संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा...", पूर्वेश सरनाईकांचा हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • युवकांचा अवमान सहन करणार नाही, संजय राऊत माफी मागा
  • युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचा इशारा
  • देशातील युवक सुसंस्कृत, राऊतच मंद झालेत
ठाणे : देशातील युवकांचा अवमान करणाऱ्या उबाठा खासदार संजय राऊत यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवा सेनेकडून शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल, असा इशारा युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांनी आज दिला. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सरनाईक म्हणाले की, राऊत यांना चर्चेत राहण्यासाठी अशा प्रकारे वाईट बोलण्याची सवय आहे. राऊतच मंद झाले असून भरकटले आहेत, अशी टीका सरनाईक यांनी केली. राऊत यांनी तरुणांबद्दल केलेल्या एक्स पोस्टची सरनाईक यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ते पुढे म्हणाले की राऊतांनी त्यांच्याच पक्षातील युवा नेत्यावरचा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र आणि देशातील युवकांवर खापर फोडले असावे, असा टोला सरनाईक यांनी यावेळी लगावला.

Breaking News: Devendra Fadnavis यांची साताऱ्यात मोठी घोषणा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशातील युवा पुढे जात आहे. देश विकास पथावर आहे, मात्र विकासावर टीका करणे हा राऊत यांना रोग लागला आहे. राऊत यांनी युवकांचा केलेला अवमान खपवून घेणार नाही. त्यांनी कॅमेऱ्यासमोर माफी मागितलीच पाहिजे, अन्यथा त्यांच्या विरोधात राज्यभरात युवा सेना शिवसेना स्टाईल आंदोलन करेल, असा इशारा सरनाईक यांनी यावेळी दिला.

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील तरुण पुढे जात आहेत आणि येणाऱ्या काळात राज्यासाठी चांगले काम करतील, असा विश्वास सरनाईक यांनी यावेळी व्यक्त केला. देशात युवकांना उज्ज्वल भविष्य आहे. राऊतांकडून युवकांना भरकटवण्याचे काम होत आहे मात्र त्याला इथला युवक बळी पडणार नाही, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. देशातील आणि महाराष्ट्रातील युवा सुसंस्कृत असून नेपाळसारखे भारतात युवकांकडून आंदोलन होणार नाही, असे सरनाईक म्हणाले.

“गडकरी मुख्यमंत्री असते तर…” प्रणिती शिंदे यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा

Web Title: Purvesh sarnaik warning to sanjay raut over youth comment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • sanjay raut
  • shivsena

संबंधित बातम्या

सचिन अहिर यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार? ॲड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केली कायदेशीर बाजू
1

सचिन अहिर यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार? ॲड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केली कायदेशीर बाजू

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
2

‘ज्यांनी आयुष्यात कधी दगड उचलला नाही, ते आम्हाला शिकवतात’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! सचिन अहिर यांनाच उमेदवारी देण्यामागे काय आहे रणनीती?
3

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी! सचिन अहिर यांनाच उमेदवारी देण्यामागे काय आहे रणनीती?

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार
4

‘सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक’; शिंदे गटात प्रवेशानंतर सचिन अहिर यांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरे गटावर केला पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.