Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NEET Paper leak Case: धर्मेंद्र प्रधान यांना त्वरित पदावरून हटवा, NEET पेपरफुटीवरून राहुल गांधी यांची मागणी

काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

  • By विवेक
Updated On: May 16, 2026 | 07:44 PM
Rahul Gandhi

Rahul Gandhi

Follow Us
Follow Us:
  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी
  • NEET परीक्षेसाठी २२ लाख विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले, पण पेपरफुटीमुळे सगळं उद्ध्वस्त झालं
  • राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडियो पोस्ट करत व्यक्त केला संताप
NEET पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. भविष्यातील डॉक्टर्स बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे यामुळे आतोनात नुकसान झाले आहे. सीबीआयची या प्रकरणात कसून चौकशी सुरु असून अनेकांना अटक करण्यात आली आहे. अश्यातच आता काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
NEET के 22 लाख बच्चों के साथ धोखा हुआ है। पर मोदी जी एक शब्द भी नहीं बोल रहे। धर्मेंद्र प्रधान जी को अभी हटाइए, या जवाबदेही ख़ुद लीजिए। Modi ji, SACK Dharmendra Pradhan ji NOW. pic.twitter.com/6FRMMa8AI8 — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 16, 2026

देशभरातील ३ मे रोजी वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा पेपर देशभरात घेण्यात येणार होता. मात्र परीक्षेपूर्वी पेपर फुटल्याने एनटीएने ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला. यामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुल गांधी यांनी यावरून सोशल मीडियावर व्हिडियो पोस्ट करत संताप व्यक्त केला. “NEET परीक्षेसाठी २२ लाख विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले, पण पेपरफुटीमुळे सगळं उद्ध्वस्त झालं. नरेंद्र मोदीजी, धर्मेंद प्रधान यांना तात्काळ पदावरून हटवा आणि उत्तरदायी राहा,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

“तर मी राजीनामा द्यायला तयार,” मराठा आरक्षणावरून राधाकृष्ण् विखे पाटील यांचे मोठे विधान

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडियोत राहुल गांधी म्हणाले, “NEET परीक्षेसाठी २२ लाख विद्यार्थ्यानी २ वर्षे कठोर मेहनत घेतली. त्यांची मेहनत वाया गेली आहे. संपूर्ण देशाला माहित आहे कि परीक्षेच्या दोन दिवस आधी व्हॉट्सअँपवर प्रश्नपत्रिका वाटल्या जात होत्या. भारताचे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात कि माझे यात काही देणेघेणे नाही. कमिटीच्या शिफारशींना त्यांनी केराची टोपली दाखवली. विरोधी पक्षातील लोक हे कमिटीत बसले आहेत, याची काहीच गरज नाही असे ते म्हणाले. तुम्ही भारताचे जे मूळ आहे, त्याला क्षतिग्रस्त केले आहे. आरएसएस, भाजप, विद्यापीठांमध्ये बसवलेले यांचे लोक म्हणजेच कुलगुरू, प्राध्यापक यांच्यात पैसे कमावण्यासाठी बनवलेले हे एक मोठे जाळे आहे. आणि या जाळ्याने भारताच्या शिक्षण व्यवस्थेला संपवले आहे. संपूर्ण देशाला माहित आहे कि जर तुम्हाला कुलगुरू बनायचे असेल तर तुम्हाला अनुभव अथवा विषयातील ज्ञान याची कसलीच गरज नसून जर तुम्ही आरएसएसशी संबंधित असाल तर तुम्ही कुलगुरू बनू शकता. यामुळेच या देशात ८० वेळा पेपरफुटी झाली आहे. आणि २ कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे. प्रधानमंत्र्यांनी त्वरित आदेश द्यायला हवा कि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अथवा त्यांना पदावरून हटवावे. आणि जे आरोपी आहेत त्यांना तुरुंगात टाकण्यात यावे,” असे ते यावेळी म्हणाले.

“जसे मोदींचे एपस्टीनशी संबंध तसेच महाराष्ट्र भाजपचे खरातशी संबंध,” सुजात आंबेडकरांची जहरी टीका

Web Title: Rahul gandhi demands resignation of dharmendra pradhan over neet paper leak case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 07:24 PM

Topics:  

  • Dharmendra Pradhan
  • narendra modi
  • neet paper leak
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला
1

Harshvardhan Sapkal : ‘राहुल गांधींच्या टीकेचा फडणवीसांनी धसका घेतला?’ हर्षवर्धन सपकाळांचा जोरदार टोला

CM Devendra Fadnavis  : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
2

CM Devendra Fadnavis : कोणतीच वोट चोरी नाही, त्यांचा मेंदू चोरीला गेलाय; मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींना टोला

Election Commission Controversy : निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या बडतर्फीसाठी होणार राज्यभर आंदोलन
3

Election Commission Controversy : निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसचा एल्गार; ज्ञानेश कुमारांच्या बडतर्फीसाठी होणार राज्यभर आंदोलन

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4

Election Commission Controversy : ‘राहुल गांधींचं राजकीय ज्ञान कमी,”व्होट चोरी’च्या आरोपांवर भाजपचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.