Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“महागाई मानव मोदी” यांचा देशावर पुन्हा हल्ला…” वाढत्या इंधन दरवाढीवरून राहुल गांधी आक्रमक

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली असून नोंदी यानाचा उल्लेख "महागाई मानव मोदी" असा केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 25, 2026 | 04:23 PM
Rahul Gandhi slams PM Narendra Modi over Petrol Diesel hike and called him Inflation Man, Rahul Gandhi slams PM Narendra Modi, Petrol Diesel hike,

Rahul Gandhi slams PM Narendra Modi over Petrol Diesel hike and called him Inflation Man, Rahul Gandhi slams PM Narendra Modi, Petrol Diesel hike,

Follow Us
Close
Follow Us:

देशभरातल्या वाढत्या इंधन दरांमुळे सध्या नागरिकांमधे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज (सोमवार २५ मे) पुन्हा एकदा इंधन दरात वाढ झाली असून गेल्या फहा दिवसांत पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ झाली असल्याने राज्यात सध्या बिकट परिस्थिती निर्माण झाला आहे. विशेषतः ग्रामीण भागात नागरिक पेट्रोल पंपावर मोठी गर्दी करताना दिसत असून नागरिकांनी पेट्रोल – डिझेल घेण्यासाठी हातात कॅन बाटल्या घेऊनं गर्दी केली आहे. यावरुनच आता काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली असून नोंदी यानाचा उल्लेख “महागाई मानव मोदी” असा केला आहे. यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि आरएसएस या संघटनेवर देशाचे गद्दार म्हणून टीका केली होती. त्यावरून देशभरात भाजप नेत्यांनी रान उठवत राहुल गांधींना लक्ष केले होते. आता पुन्हा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष करत “महागाई मानव मोदी” म्हणून संबोधले आहे. आता यावरून सत्ताधारी नेते काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे देशातील नागरिक इंधन तुटवडा आणि दरवाढीच्या संकटात असताना सत्ताधारी आणि विरोधकी एकमेकांवर चिखलफेक करत असल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले राहुल गांधी ?

आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ताशेरे ओढले. ते यावेळी म्हणाले, “महागाई मानव मोदी” पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. ते पेट्रोल आणि डिझेलच्या किमती टप्प्याटप्प्याने वाढवतात. जेणेकरून तुमचे खिसे कोणालाही न कळू देता रिकामे करता येतील. मी अनेक महिन्यांपासून एका आर्थिक वादळाचे भाकीत करत होतो. पण मोदी नेहमीप्रमाणे निवडणुकांमध्ये व्यस्त होते आणि निवडणुका संपताच त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८ रुपयांची वाढ केली. आणि ही दरवाढ अशीच सुरू राहणार आहे. “महागाई मानव मोदी” चे एकच काम आहे – निवडणुकीच्या काळात आश्वासने देणे आणि बाकीच्या वेळी जनतेच्या खिशावर हल्ला करणे,” अश्या शब्दांत त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत.

महंगाई मानव मोदी का फिर से हमला। पेट्रोल-डीज़ल के दाम किश्तों में बढ़ाते हैं – ताकि चुपके-चुपके आपकी जेब कटती रहे। मैं महीनों से आर्थिक तूफान आने की बात कह रहा था। पर मोदी जी तब हमेशा की तरह चुनाव में व्यस्त थे – और चुनाव खत्म होते ही पेट्रोल-डीजल ₹8 महंगा कर दिया। और, ये… — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 25, 2026  

 

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा घणाघात

पंतप्रधान नरेंद्र मोफी यांच्यावर टीका करत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, “मोदी सरकारने देशावर संकट आणले आहे. यूपीए सरकारच्या काळातही कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या होत्या, पण सरकारने अनुदान देऊन तेलाच्या किमती वाढू न देता जनतेला दिलासा दिला होता. मोदी सरकार जनतेच्या पैशांची लूट करत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज वाढवल्या जात आहेत. बेरोजगारी आणि महागाई वाढत असून, लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करणेही अवघड जात आहे. सत्य हे आहे की मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था कमजोर होत आहे आणि सरकारला ती सांभाळता येत नाही. या लोकांना काँग्रेसला शिव्या देण्याशिवाय दुसरे काहीही काम नाही. नरेंद्र मोदींकडे देश चालवण्याची कोणतीही दूरदृष्टी नाही; त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडून शिकले पाहिजे, ज्यांनी कठीण काळात देशाची अर्थव्यवस्था स्थिर केली,” अश्या शब्दांत त्यांनी आगपाखड केली आहे.

देश में मोदी सरकार मुसीबत लेकर आई है। UPA सरकार में भी एक समय ऐसा आया था, जब कच्चा तेल महंगा हो गया था, लेकिन सरकार ने सब्सिडी देकर तेल की कीमतें नहीं बढ़ने दीं- जनता को राहत दी। वहीं, मोदी सरकार जनता से खूब पैसा लूट रही है। हर दिन पेट्रोल-डीजल के दाम बढ़ाए जा रहे हैं।… pic.twitter.com/NNPLHCeqxn — Congress (@INCIndia) May 25, 2026

उदय सामंत यांची पत्नी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या रिंगणात, राजकीय नेत्यांचे गंभीर आरोप

Web Title: Rahul gandhi slams pm narendra modi over petrol diesel hike and called him inflation man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 04:23 PM

Topics:  

  • Diesel Petrol Price
  • narendra modi
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Petrol-Diesel Price Hike: कधी थांबणार? पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, 10 दिवसांत 7 रुपयांपेक्षा अधिक वाढ
1

Petrol-Diesel Price Hike: कधी थांबणार? पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढल्या, 10 दिवसांत 7 रुपयांपेक्षा अधिक वाढ

Karnataka River Accident : कर्नाटकच्या भटकळमध्ये भीषण दुर्घटना! शिंपले गोळा करताना 11 जणांचा नदीत बुडून मृत्यू
2

Karnataka River Accident : कर्नाटकच्या भटकळमध्ये भीषण दुर्घटना! शिंपले गोळा करताना 11 जणांचा नदीत बुडून मृत्यू

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित
3

‘I Love Modi…’ : दिल्लीतील कार्यक्रमात Donald Trump यांचा थेट व्हिडिओ कॉल; स्वत:ला केलं PM मोदींचा मोठा फॅन घोषित

“नरेंद्र मोदी हे पुढील वर्षापर्यंत पदत्याग करतील,” राहुल गांधी यांचा मोठा दावा
4

“नरेंद्र मोदी हे पुढील वर्षापर्यंत पदत्याग करतील,” राहुल गांधी यांचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.