उदय सामंत यांची पत्नी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या रिंगणात, राजकीय नेत्यांचे गंभीर आरोप
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उबाठा पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, तसेच काँग्रेस आमदार विक्रय वडेट्टीवार यांनी यावरून मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणावरून भाष्य करत, “भाजपकडून दमदाटी केली जातेय याचे उत्तम उदाहरण म्हणजे हि निवडणूक आहे,” अश्या शब्दांत टीका केली आहे. सुषमा अंधारे यांनी यावरून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केली. त्या यावेळी म्हणाल्या, “मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली. विजय पाटकर यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्याला सुद्धा अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळते जे अतिशय गंभीर आहे. नेते अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे पण नेते अभिनेत्यांचे हक्काचे कलाक्षेत्र ही बळकावत असतील तर मात्र दुर्दैवी आहे!”
काँग्रेस नेते विक्रय वडेट्टीवार यांनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधत ते यावेळी म्हणाले, “एका मंत्र्याची बायको चित्रपट महामंडळाची निवडणूक लढतेय. मंत्र्यांचा ओएसडी फोन करून धमकावत असेल तर मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी,” असे ते म्हणाले. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून भाष्य केले असून, “कलाक्षेत्रातील लोकांचा आवाज दाबला जात असेल तर आम्ही त्या विरोधात रस्त्यावर उतरू,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गोमातेच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य सरकारचा बुलडोझर; कठोर कारवाईचे आदेश
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आणि दमदाटी होत असल्याचा गंभीर आरोप अभिनेते विजय पाटकर यांनी केला आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील एका मंत्र्यांचा आणि त्याच्या ओएसडीचा त्यांच्यावर दबाव असल्याचा तसेच त्यांना निवडणुकीसाठी अर्जदेखील भरून दिला नाही असा आरोप त्यांनी केला आहे.
याबाबत बोलताना विजय पाटकर म्हणाले, “मागील ४० वर्ष आम्ही इंडस्ट्रीत आहोत. आम्ही कधी राजकारण्यांकडे येतो का? त्यांनी कशाला इकडे यायला हवं? नीलम शिर्के अध्यक्षा होत असतील तर होउदे. पहिल्यांदा अध्यक्ष होईल. ती माझी मैत्रीण आहे. मी पॅनल उभा करेल म्हणून माझा उमेदवारी अर्ज भरू दिला गेला नाही,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.






