Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

राज ठाकरे म्हणाले, 'आम्हाला कुठला राग नाही की तुम्ही सत्तेवर बसला आहे. मात्र, कशाप्रकारे बसले हे महत्वाचं आहे. आम्हाला कुठला राग नाही की तुम्ही सत्तेवर बसला आहात. मात्र, कशाप्रकारे बसले आहे हे महत्वाचं आहे. लोकांना ठरवू द्या कोणाला कुठे बसवायचं.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 04, 2026 | 01:21 PM
'यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं'; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

'यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं'; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

Follow Us
Follow Us:

मुंबई : देशभरातून मतदारयादीतील विशेष सखोल पुनर्निरीक्षण प्रक्रियेला (SIR) विरोध केला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबईत विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राज ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. ‘यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही, एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं’, असे ते म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. यामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, अनिल परब, अमित ठाकरे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील, खासदार संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेते उपस्थित आहेत.

राज ठाकरे म्हणाले, ‘आम्हाला कुठला राग नाही की तुम्ही सत्तेवर बसला आहे. मात्र, कशाप्रकारे बसले हे महत्वाचं आहे. आम्हाला कुठला राग नाही की तुम्ही सत्तेवर बसला आहात. मात्र, कशाप्रकारे बसले आहे हे महत्वाचं आहे. लोकांना ठरवू द्या कोणाला कुठे बसवायचं. जनतेने किती बोलावं, किती ही आंदोलन करु दे, आम्हाला जे करायचं ते करु. यांच्यामध्ये कोणतीही भिती नाही. एकाच उद्योगपतीला सर्व देऊन टाकायचं. काँग्रेस काळात अनेक मोठे उद्योगपती मोठे झाले. एकच नाही. न्यायालय, मीडिया ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, दुसरा कोणी सत्तेवर येईल त्याने यापेक्षा जास्त गोष्टी केल्या तर तुम्ही कुठे जाल. सत्तेवर यायचं आणि वरवंटा फिरवायचा हे कसं चालेल? अशा शब्दांत राज ठाकरेंनी टीका केली.

…हा कोणता विजय?

2024 ची निवडणूक संपूर्ण बहुमत, पण महाराष्ट्रात जल्लोष नाही, हा कोणता विजय? 2024 ची निवडणूक संपूर्ण बहुमत पण महाराष्ट्रात जल्लोष नाही, लोकांमध्ये उत्साह नाही, जल्लोष नाही. संपूर्ण सनाटा हा कोणता विजय? लोकसभेच्या निवडणुकीपासून ते 2024 च्या विधानसभेपर्यंत 40 ते 60 लाख मतदार वाढवले, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात

देशभरातून विरोध होत असतानाच आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी मुंबईत विराट गर्जना आहे. या मोर्चाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात

Web Title: Raj thackeray criticized on government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात
1

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मुंबईत आज विराट मोर्चा; ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू मैदानात

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…
2

Maharashtra Legislative Council Election : महायुतीचा फॉर्म्युला ठरला; भाजपला 3 तर मित्रपक्षांना…

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार
3

Maharashtra Live breaking News in Marathi: आवाज घुमणार! कॉकरोच जनता पार्टीचा आज शिवार्जी पार्कात एल्गार

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा
4

Mira Bhayandar News: ‘मीरा-भाईंदर जैनांची नगरी’ वक्तव्यावरून मनसे आक्रमक, सचिन पोपळेंचा नरेंद्र मेहतांवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.