Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील विकासावरून राज ठाकरे आक्रमक; ‘आमच्या जमिनी, पाणी-वीजेवर बाहेरचे पोसले जाणार असतील तर…’

रायगड दौऱ्यात राज ठाकरे यांनी कोकणातील विकासकामांवरून सरकारला घेरलं. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामासह ‘तिसरी मुंबई’ प्रकल्प आणि जमिनींच्या व्यवहारांवरून त्यांनी गंभीर सवाल उपस्थित केले.

  • By विवेक
Updated On: Aug 09, 2026 | 03:41 PM
Raj Thackeray

Raj Thackeray

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-गोवा महामार्गतील राजकीय हस्तक्षेपामुळे काम रखडल्याचा राज ठाकरेंचा दावा
  • तिसरी मुंबई प्रकल्पावरून निशाणा, स्थानिक तरुणांना प्रकल्पाची माहिती आणि भविष्यातील संधींबाबत प्रश्न
  • विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या जमिनी जाणार असतील तर त्याचा फायदा कोणाला, असा सवाल
 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड दौऱ्यात कोकणातील विकासकामांवरून सरकारवर जोरदार टीका केली. माणगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग, प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ प्रकल्प आणि कोकणातील जमिनींच्या व्यवहारांवरून सरकारला सवाल केले. विकासाला आपला विरोध नसल्याचं स्पष्ट करताना, स्थानिकांच्या हिताला प्राधान्य नसेल तर असा विकास नको, अशी भूमिका त्यांनी मांडली.

मुंबई-गोवा महामार्ग रखडल्यावरून सवाल

मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं आहे. यामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वी कंत्राटदार कामाला कंटाळून निघून गेल्यामुळे महामार्गाचं काम रखडल्याचं सांगितलं होतं. मात्र, कंत्राटदार नेमके का कंटाळले, याचाही विचार झाला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

गेल्या 15 वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग लवकरच सुरू होणार असल्याचं सांगितलं जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. महामार्गाचं काम पूर्ण न झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना होणाऱ्या वाहतूक कोंडीचाही त्यांनी उल्लेख केला.

सुप्रिया सुळेंची पंतप्रधान मोदींशी भेट; राजकीय चर्चांना संजय राऊतांनी दिलं स्पष्टीकरण, ‘कोणीही महाविकास आघाडी…’

‘स्थानिकांच्या हिताशिवाय विकासाचा उपयोग काय?’

“आमच्या जमिनी, आमचं पाणी, आमची वीज यावर बाहेरचे पोसले जाणार असतील तर या विकासाचा काय उपयोग?” असा थेट सवाल राज ठाकरे यांनी केला. सरकारने सर्वप्रथम आपल्या नागरिकांचं हित पाहणं ही त्यांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे स्थानिकांच्या हितापेक्षा राजकीय पदांवरील वादांना महत्त्व देणं योग्य नसल्याचंही ते म्हणाले.

‘तिसऱ्या मुंबई’वरूनही राज ठाकरेंचा सवाल

कोकणात प्रस्तावित ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांना पुरेशी माहिती आहे का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. या प्रकल्पामुळे परिसरात मोठे बदल होणार असतील तर स्थानिक तरुण-तरुणींना त्यासाठी आधीपासून तयार केलं जात आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

बाहेरच्या लोकांना महाराष्ट्रात भविष्यात कुठे काय होणार याची माहिती मिळते आणि त्यानुसार ते तयारी करतात; मात्र स्थानिक तरुणांना याची माहिती नसते, असा दावा त्यांनी केला.

‘जमीन विकली तर तुमचं अस्तित्व संपतं’

जमीन हा कोकणातील स्थानिकांच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा आधार असल्याचं सांगत राज ठाकरे यांनी जमीन विक्रीबाबत सावध केलं. विकासकामं कुठे होणार आहेत याची माहिती काही लोकप्रतिनिधींना आधीच मिळते आणि त्यानंतर जमिनींचे व्यवहार होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मोठी बातमी ! संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता; राघव चड्ढांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

यावेळी त्यांनी सुनील तटकरे आणि इतर स्थानिक नेत्यांचा उल्लेख करत जमिनींच्या व्यवहारांवर गंभीर आरोप केले. “कुठे विकास होणार हे आमदारांना आधीच माहीत असतं,” असा दावा करत काही लोकप्रतिनिधी आधी स्वस्तात जमिनी घेतात आणि नंतर त्या मोठ्या उद्योगपतींना विकतात, असा आरोप त्यांनी केला.

राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे कोकणातील विकास प्रकल्प, जमीन व्यवहार आणि ‘तिसरी मुंबई’चा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्यांच्या आरोपांवर संबंधित नेते आणि सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागलं आहे.

Web Title: Raj thackeray konkan development third mumbai mumbai goa highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 03:41 PM

Topics:  

  • Kokan News
  • Kokan Politics
  • MNS
  • Mumbai Goa Express Way
  • raj thackeray

संबंधित बातम्या

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
1

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा
3

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट
4

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.