Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

Washim Drought News: वाशिम जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून, आठ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 25, 2026 | 07:14 PM
Washim Drought News

Washim Drought News

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळाच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर
  • वाशिममध्ये मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
  • सरकारला ८ दिवसांचा अल्टिमेटम
वाशिम: जिल्ह्यात गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. सोयाबीन, तूर, कापूस यासह विविध पिकांवर पावसाअभावी प्रतिकूल परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने वाशिम जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शासनाने ८ दिवसात ठोस निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मनसेने दिला.

Washim: लाखोंचा ऐवज लंपास, एलसीबीच्या कारवाईत अट्टल घरफोड्या जेरबंद; घरफोडीचे दोन्ही गुन्हे उघडकीस ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. हातात मागण्यांचे फलक आणि घोषणा देत शेतकरी व मनसे पदाधिकारी मोचांत सहभागी झाले होते. बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल, देशमुख हॉस्पिटल, सिव्हिल लाईन, शासकीय विश्रामगृह मार्गे मोच्चों जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, जिल्ह्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांची वाढ खुंटली आहे. काही भागात पिकांना फटका बसला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच वाढता उत्पादन खर्च, महागडी खते बियाणे, मजुरी आणि मशागतीचा खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना पावसाच्या खंडामुळे संकट अधिक गडद झाले. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने केवळ पाहणी किंवा आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष मदतीची कार्यवाही करावी. जिल्ह्यातील पिकांची वस्तुनिष्ठ पाहणी करून तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, पीकविमा भरपाई मिळवून द्यावी, तसेच कर्ज वसुलीला स्थगिती द्यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. मोर्चामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ गर्दीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अन्यथा, तीव्र आंदोलन

मोर्चादरम्यान मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले, शासनाने – वाशिम जिल्ह्यातील परिस्थितीची गांभीर्यान दखल घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. आठ दिवसांच्या आत शासनाने ठोस निर्णय घेतला नाही, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मनसे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी दिला.

मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी

या मोर्चात कारंजा-मानोरा जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, रिसोड मालेगाव उपजिल्हाध्यक्ष अतीश डहाळ, वाशिम-मंगरुळपीर उपजिल्हाध्यक्ष उमेश टोलमारे, कृषी सेना जिल्हाध्यक्ष विठ्ठल भाऊ राठोड, वाशिम तालुकाध्यक्ष विठ्ठल राठोड, मंगरुळपीर तालुकाध्यक्ष लक्ष्मण जाधव, रिसोड तालुकाध्यक्ष योगेश, मानोरा तालुकाध्यक्ष संतोष घोडे, मालेगाव तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, कारंजा शहराध्यक्ष कपिल महाजन, मालेगाव कृषी सेना तालुकाध्यक्ष रवी पवार, वाशिम शहर उपाध्यक्ष गजानन इंगोले, उपशहराध्यक्ष आकाश लोलप यांच्यासह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद

Web Title: Washim mns farmer morcha drought declaration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 07:14 PM

Topics:  

  • Crisis on farmers
  • MNS
  • Protest
  • Washim news

संबंधित बातम्या

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा
1

सातारा रस्त्यावरील दुग्गड चौकातील खड्ड्यांवरून मनसे आक्रमक; प्रशासनाला दिला गंभीर इशारा

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा;  शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी
2

साताऱ्यात DJ-लेझरविरोधात ‘मूक’ मोर्चा; शहरातील २१ संस्थांचा सहभाग, निर्णायक लढ्याची तयारी

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
3

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट
4

Raju Patil: वाढदिवसाच्या शुभेच्छा डिजिटल द्या! ‘जनतेला त्रास देऊन मिळालेल्या शुभेच्छा नको’; वाढदिवसापूर्वी राजू पाटील यांची पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.