Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय?’ अमित साटम वादावरून राज ठाकरेंचं फडणवीसांना खुलं पत्र; ‘लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांवर कारवाई करा’

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या वादग्रस्त विधानावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलं पत्र लिहित तीव्र शब्दांत टीका केली. लोकांच्या मृत्यूवर हसणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री मौन का बाळगत आहेत, असा सवाल उपस्थित केला.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jul 04, 2026 | 02:59 PM
'तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय?' अमित साटम वादावरून राज ठाकरेंचं फडणवीसांना खुलं पत्र

'तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय?' अमित साटम वादावरून राज ठाकरेंचं फडणवीसांना खुलं पत्र

Follow Us
Follow Us:

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातून टीकेचा वर्षाव होत आहे. मुंबईतील पावसामुळे चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू आणि साकीनाक्यात उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू याबाबत बोलताना अमित साटम यांनी हसत हसत आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून राजकीय वर्तुळातून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे यांनी या प्रकाराबाबत आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून पोस्ट केली आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत अमित साटम यांच्यावर कारवाई करण्याबाबत मागणी केली आहे. तसेच, भाजप नेत्यांकडून सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त विधानांवरून फडणवीस यांनी मौन बाळगले असल्याचे सांगत राज्याच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडत असल्याचे अधोरेखित केले आहे.

राज ठाकरे यांचा ट्विटर पोस्टवरून घणाघात

राज ठाकरे फडणवीसांना पत्र लिहीत आपल्या पोस्टमधून म्हणाले, “भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?” असा सवाल त्यांना उपस्थित केला.

‘काल झाड, आज मॅनहोल…’ म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद

“देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !”

“तुमचा आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर…”

ते पुढे म्हणाले, “तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, ‘Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely’ पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.”

“फडणवीसांच्या संवेनशीलतेबद्दलच शंका..”

“देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.”

प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 4, 2026

“मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती,” असे त्यांनी नमूद केले.

“तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय? राज ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

राज ठाकरे पुढे म्हणाले, “आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही . ( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?”

‘मुंबईकर माफ करणार नाहीत’; अमित साटमांच्या व्हायरल व्हिडीओवर आदित्य ठाकरे यांचा घणाघात, ‘क्रूर विनोद करणाऱ्याला पदावरून हटवा’

“… तर महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील” – राज ठाकरे

“तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.”

“खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत,” असे म्हणत त्यांनी पत्राची सांगता केली.

Web Title: Raj thackeray open letter devendra fadnavis over amit satam controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • amit satam
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे शहरात रिपरिप तर घाटमाथ्यावर मुसळधार; ८ जुलैपासून पाऊस ओसरण्याचा अंदाज
1

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे शहरात रिपरिप तर घाटमाथ्यावर मुसळधार; ८ जुलैपासून पाऊस ओसरण्याचा अंदाज

उद्धव ठाकरेंना रामरक्षा नाहीतर पक्षरक्षा आंदोलनाची गरज; रामदास आठवले यांची टीका
2

उद्धव ठाकरेंना रामरक्षा नाहीतर पक्षरक्षा आंदोलनाची गरज; रामदास आठवले यांची टीका

‘मुंबईच्या महापौर आणि भाजप मुंबई अध्यक्ष दोघेही बेशरम.’ अमित साटमांच्या व्हायरल व्हिडीओवर वर्षा गायकवाड भडकल्या
3

‘मुंबईच्या महापौर आणि भाजप मुंबई अध्यक्ष दोघेही बेशरम.’ अमित साटमांच्या व्हायरल व्हिडीओवर वर्षा गायकवाड भडकल्या

‘ॲट्रॉसिटी’ कायद्यात दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस व सरकारी वकिलांना निर्देश
4

‘ॲट्रॉसिटी’ कायद्यात दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस व सरकारी वकिलांना निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.