Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: पुणे शहरात रिपरिप तर घाटमाथ्यावर मुसळधार; ८ जुलैपासून पाऊस ओसरण्याचा अंदाज

Maharashtra Monsoon Breaking भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेला हा पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार असला, तरी ८ ते १४ जुलै या कालावधीत राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 04, 2026 | 10:40 AM
LIVE
Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Follow Us
Follow Us:
  • 04 Jul 2026 10:40 AM (IST)

    04 Jul 2026 10:40 AM (IST)

    जगाचे लक्ष तेहरानकडे! खामेनेईंना अखेरचा निरोप देण्यासाठी लाखोंची गर्दी

    इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या अंत्ययात्रेला आज, ०४ जुलैपासून सुरुवात झाली आहे. देशाच्या विविध शहरांमध्ये त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा केवळ एक धार्मिक विधी नसून इराणच्या राजकीय आणि धार्मिक एकतेचे शक्ति प्रदर्शन मानला जात आहे. अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी खामेनेईंचा मृत्यू झाला होता. यानंतर चार महिन्यानंतर अंत्यविधी होत आहे.

  • 04 Jul 2026 10:30 AM (IST)

    04 Jul 2026 10:30 AM (IST)

    सिया-चेतनला मोठा दिलासा! पोलीस कोठडी वाढवण्यास कोर्टाचा नकार

    केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी वडगाव मावळ न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मोबाईलमधील डिलीट डेटा, सांकेतिक संदेश आणि संभाव्य सहआरोपींच्या तपासासाठी पोलिसांनी आणखी तीन दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले.

  • 04 Jul 2026 10:20 AM (IST)

    04 Jul 2026 10:20 AM (IST)

    CA Foundation Result मध्ये महाराष्ट्राचा डंका! देशात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या अयानचे यश

    जर मेहनत करण्याची जिद्द असेल तर यशासाठी महागड्या कोचिंगची गरज नसते. चंद्रपूरचा रहिवासी असलेल्या अयान अब्बास अली अजानी याने हे सिद्ध करून दाखवले आहे. त्याने कोणत्याही कोचिंग क्लासची मदत न घेता, केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर सीए फाउंडेशन मे २०२६ च्या परीक्षेत संपूर्ण देशात दुसरा क्रमांक (AIR 2) पटकावला आहे. अयानचे हे यश अशा लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे जे मर्यादित संसाधने असूनही मोठी स्वप्ने पाहतात.

  • 04 Jul 2026 10:10 AM (IST)

    04 Jul 2026 10:10 AM (IST)

    Mahindra XUV 3XO चे बेस व्हेरिअंट घरी आणायचा प्लॅन करताय?

    वाहन निर्माता महिंद्रा एक कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या स्वरुपात Mahindra XUV 3XO ऑफर करते. ही एसयूव्ही बाजारात विविध व्हेरिअंट्समध्ये ऑफर केली जाते. जर तुम्ही या एसयूव्हीचे बेस व्हेरिअंट खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. एक लाख रुपये डाउनपेमेंट केल्यानंतर गाडी घरी घेऊन येण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला किती ईएमआय भरावा लागेल, याचे गणित समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • 04 Jul 2026 10:00 AM (IST)

    04 Jul 2026 10:00 AM (IST)

    आंबेनळी घाट पुढील चार दिवस वाहतुकीसाठी बंद; रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधील अत्यंत संवेदनशील आणि दरडप्रवण मानल्या जाणाऱ्या पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्ग (SH-१३९) वरील ‘आंबेनळी घाट‘ ३ जुलै २०२६ ते ६ जुलै २०२६ (एकूण ४ दिवस) सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी जाहीर केला आहे.

  • 04 Jul 2026 09:35 AM (IST)

    04 Jul 2026 09:35 AM (IST)

    Modi Cabinet Reshift: दिल्लीत  नितीन नवीन आणि अमित शाह यांच्यात खलबते

    Modi Cabinet Reshift: संसदच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वीच केंद्र सरकारकडून बहुप्रतिक्षित केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची (Modi Cabinet Reshuffle) अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य फेरबदलात काही प्रस्थापित चेहऱ्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याचा मोठा धक्का बसणार असला, तरी अनेक नव्या चेहऱ्यांना थेट मोदी कॅबिनेटमध्ये संधी मिळण्याचे संकेत आहेत.

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मोठी पदोन्नती (Promotion) मिळण्याचे संकेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नितीन गडकरी यांच्या खांद्यावर अत्यंत महत्त्वाची आणि नवी जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. यासोबतच महाराष्ट्रातील काही इतर दिग्गज नेत्यांनाही थेट केंद्रात मानाचे स्थान मिळण्याची चिन्हे असून, आगामी काही दिवसांतच या संदर्भातील अंतिम चित्र स्पष्ट होईल.

  • 04 Jul 2026 09:30 AM (IST)

    04 Jul 2026 09:30 AM (IST)

    Vaibhav Suryavanshi News: वैभव सूर्यवंशीच्या पदार्पणाबाबत गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केलचे मोठे विधान

    Vaibhav Suryavanshi News:  भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना आज (४ जुलै) खेळवला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संघात संधी देण्याची मागणी जोर धरत असतानाच, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी यावर महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. संघात स्थान देण्याच्या वाढत्या मागणीवर बोलताना गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी स्पष्ट केले की, वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळण्यासाठी सध्या तरी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. भारताच्या मजबूत फलंदाजीच्या फळीमुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण झाले आहे.

  • 04 Jul 2026 09:25 AM (IST)

    04 Jul 2026 09:25 AM (IST)

    Mumbai Municipal Corporation : ठाकरे शिवसेनेकडून मुंबई आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी तर महापौरांशी वाद

    Mumbai Municipal Corporation : चेंबूर येथे स्कूल व्हॅनवर झाड कोसळून एका १० वर्षीय निष्पाप विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू आणि साकीनाका येथील खैरानी रोडवर उघड्या मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख या नागरिकाचा झालेला दुर्दैवी मृत्यू, या दोन गंभीर दुर्घटनांमुळे मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) कारभारावर प्रचंड प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या दुर्घटनांचे राजकीय पडसाद आता तीव्रतेने उमटू लागले असून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्या कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता उपमहापौर संजय घाडी यांनी थेट महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनाच या निष्काळजीपणासाठी जबाबदार धरले असून, त्यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे

  • 04 Jul 2026 09:20 AM (IST)

    04 Jul 2026 09:20 AM (IST)

    Raja Raghuvanshi Case: सोनम रघुवंशीला पुन्हा तुरुंगात पाठवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

    Raja Raghuvanshi Case: मेघालयातील बहुचर्चित राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय देत मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हिच्या जामिनाला तात्पुरती स्थगिती देण्यास नकार दिला आहे. मेघालय सरकार आणि पोलिसांनी जामीन रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत न्यायालयाने सोनमला नोटीस बजावली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, अटकेदरम्यान झालेल्या पोलिसांच्या गंभीर प्रक्रियात्मक त्रुटी, खटल्याची संथ गती आणि जामिनाबाबतच्या कायदेशीर मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सविस्तर चर्चा झाली.

  • 04 Jul 2026 09:15 AM (IST)

    04 Jul 2026 09:15 AM (IST)

    Kolhapur Rains : कोल्हापुरात मुसळधार; पंचगंगा नदी २२ फुटांवर 

    Kolhapur Rains : कोल्हापूर जिल्हा आणि धरण क्षेत्रामध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या पंचगंगा नदीची पातळी अवघ्या २४ तासांत झपाट्याने वाढून आता २२ फुटांवर पोहोचली आहे. या सततच्या पावसामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

    जिल्ह्यातील राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज आणि चंदगड या तालुक्यांमध्ये सध्या पावसाचा जोर सर्वाधिक पाहायला मिळत आहे. धरण क्षेत्रातील सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असून, स्थानिक प्रशासन परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे.

  • 04 Jul 2026 09:10 AM (IST)

    04 Jul 2026 09:10 AM (IST)

    Eknath Shinde Hospitalized: एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल 

    Eknath Shinde Hospitalized : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, या वृत्ताने राजकीय वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाच्या देखरेखीखाली आवश्यक ते उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर असून काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच, त्यांच्या प्रकृतीबाबतचे पुढील तपशील लवकरच अधिकृतपणे जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra to National And International Breaking News:

 

 Maharashtra  Weather Forecast:  पुणे शहरात रिपरिप तर घाटमाथ्यावर मुसळधार

पुणे: पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार (रिपरिप) सुरू असतानाच, जिल्ह्यातील घाट परिसरात मात्र मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, घाट परिसरातील ताम्हिणी येथे १७० मिमी आणि लोणावळा येथे १४० मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर पुणे शहरात शुक्रवारी रात्रीपर्यंत शिवाजीनगर येथे ११ मिमी, दापोडी येथे ११.५ मिमी, पाषाण येथे १३.२ मिमी आणि चिंचवड येथे ८ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.

८ जुलैपासून पावसाचा जोर कमी होणार भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेला हा पाऊस आणखी काही दिवस कायम राहणार असला, तरी ८ ते १४ जुलै या कालावधीत राज्यातील पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच, विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पड

 

Web Title: 4 july 2026 live breaking news marathi maharashtra politics national international politics crime sports monsoon alert breaking supreme court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 09:06 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

मुंबईकरांच्या जीवनात ‘एआय वैद्य’ची स्मार्ट एंट्री! प्रायोगिक तत्त्वावर प्रणाली सुरू करण्याचा निर्णय; डॉक्टरांच्या आधी घेणार माहिती
1

मुंबईकरांच्या जीवनात ‘एआय वैद्य’ची स्मार्ट एंट्री! प्रायोगिक तत्त्वावर प्रणाली सुरू करण्याचा निर्णय; डॉक्टरांच्या आधी घेणार माहिती

उद्धव ठाकरेंना रामरक्षा नाहीतर पक्षरक्षा आंदोलनाची गरज; रामदास आठवले यांची टीका
2

उद्धव ठाकरेंना रामरक्षा नाहीतर पक्षरक्षा आंदोलनाची गरज; रामदास आठवले यांची टीका

‘काल झाड, आज मॅनहोल…’ म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद
3

‘काल झाड, आज मॅनहोल…’ म्हणत मुंबईतील दुर्घटनांवर भाजप आमदाराचा हास्यविनोद, अमित साटम यांच्या व्हायरल व्हिडीओवरून नवा वाद

11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय
4

11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.