Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray: ‘मोदीजी, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा,’ राज ठाकरेंचा हल्लाबोल

मनविसेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पक्षातील नेत्यांनाही भाषेच्या मर्यादा पाळण्याचा सल्ला देत विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि ट्रोल संस्कृतीवरून सरकारवर निशाणा साधला.

  • By विवेक
Updated On: Aug 01, 2026 | 03:35 PM
Raj Thackeray: 'मोदीजी, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा,' राज ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Raj Thackeray: 'मोदीजी, दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा,' राज ठाकरेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांवरील कारवाईवरून राज ठाकरेंची मोदी सरकारवर टीका
  • “दुसऱ्यांनाही आया असतात” म्हणत ट्रोल संस्कृतीवर निशाणा
  • चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरही राज ठाकरेंचा टोला
 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (मनविसे) २०व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित भव्य कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. या कार्यक्रमाला मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे, पक्षाचे पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी संघटनेच्या सदस्य नोंदणी अभियानालाही औपचारिक सुरुवात करण्यात आली.

आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याचा उल्लेख करत, कोणत्याही व्यक्तीविरुद्ध अश्लाघ्य किंवा अपमानास्पद भाषा वापरणे चुकीचे असल्याचे मान्य केले. मात्र, त्यांनी याचवेळी भाजपच्या नेत्यांनाही आणि पक्षाच्या कथित ट्रोल यंत्रणेलाही भाषेच्या मर्यादा पाळण्याचा सल्ला द्यावा, अशी मागणी केली.

नेमकं काय म्हणाले राज ठाकरे ?

“पंतप्रधानांनी सांगितले की त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या आईबद्दल अयोग्य भाषा वापरण्यात आली. ते चुकीचेच आहे. पण दुसऱ्यांनाही आया असतात, हे तुमच्या पक्षातील लोकांनाही सांगा,” असे म्हणत राज ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. महात्मा गांधींपासून ते आजच्या विरोधी नेत्यांपर्यंत अनेकांविरोधात सोशल मीडियावर वापरल्या जाणाऱ्या भाषेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Raj Thackeray: मंदिरातही श्रद्धेची लूट? सिद्धीविनायक, राम मंदिराचा उल्लेख करत राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा

विद्यार्थी आंदोलनाचा संदर्भ देताना त्यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराचा उल्लेख केला. “ज्यांची डोकी फोडली, ज्यांच्यावर लाठ्या चालवल्या, त्या कारवाईचे आदेश देणारे कधी माफी मागणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या मते, केवळ एका परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे आंदोलन झाले नाही, तर तरुणांमध्ये निर्माण झालेल्या व्यापक असंतोषाचा तो उद्रेक होता.

राज ठाकरे यांनी पुढे म्हटले की, देशातील अनेक तरुण आणि विद्यार्थ्यांना सध्याच्या वातावरणामुळे रस्त्यावर उतरावे लागले. नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार हे आंदोलनाचे कारण असले, तरी त्यामागे तरुणांच्या मनातील नाराजी आणि व्यवस्थेबद्दलचा अविश्वास अधिक मोठा मुद्दा असल्याचे त्यांनी नमूद केले.

चंद्रकांत पाटील यांच्यावरही घणाघात

यावेळी त्यांनी राज्याचे शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्यावरही उपरोधिक टीका केली. त्यांच्या विधानामुळे तरुणांमध्ये अधिक नाराजी निर्माण होत असल्याचा दावा करत, शिक्षण क्षेत्रातील जबाबदार पदांवर असणाऱ्यांनी अधिक संवेदनशीलपणे भूमिका मांडण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Amit Thackeray Speech: ‘मी विसरलो, खरंच सुचत नाही…’, अमित ठाकरे भाषणात अचानक थांबले, सभागृहात क्षणभर शांतता

ते म्हणाले, “मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट्स बघायचे आहेत. कोल्हापूरकरांनी ज्ञान मिळावं म्हणून या माणसाला पुण्यात पाठवलं. जिकडे शिक्षणाचं माहेरघर आहे. तिथेही काही नाही झालं… आता असे शिक्षणमंत्री म्हंटल्यावर GenZ चा पारा चढणार कि नाही चढणार ? हि अशी माणसं आमच्या नशिबी आणून तुम्ही ठेवली आहेत.”

राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा विद्यार्थी प्रश्न, राजकीय भाषा आणि सत्ताधारी-विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप यावर चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Raj thackeray slams pm modi over student protest

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • MNS
  • PM Narendra Modi
  • Raj Thackeary

संबंधित बातम्या

PM Modi Birthday : पियूष गोयलांचा ‘सेवा’चा संकल्प; उत्तर मुंबईत 100 सुविधा केंद्रांसह ओपन जिमची घोषणा
1

PM Modi Birthday : पियूष गोयलांचा ‘सेवा’चा संकल्प; उत्तर मुंबईत 100 सुविधा केंद्रांसह ओपन जिमची घोषणा

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात
2

‘मोदीजींच्या कर्तृत्वाची उंची हिमालयाएवढी’; मोदींच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंचं भरभरून कौतुक, गुजरातीमधून भाषणाची सुरुवात

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…
3

PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींना वाढदिवसानिमित क्रीडा जगतातून शुभेच्छांचा महावर्षाव, Vaibhav म्हणाला…

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन
4

मानीव दिनांकापासूनची पदोन्नती प्रक्रिया रद्द करा; अन्यथा…; मनसेचे महापालिका प्रशासनाला निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.