Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uddhav Thackeray : शेतकरी संकटात, पण उद्धव ठाकरे सत्ताबदलाच्या घोषणांत व्यस्त, दसरा मेळाव्याआधी ज्योती वाघमारेंची टीका

Uddhav Thackeray : ज्योती वाघमारेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करत एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केला. दुष्काळग्रस्तांसाठी ५० ट्रक मदतसाहित्य पाठवल्याची माहितीही दिली.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 20, 2026 | 04:30 PM
Uddhav Thackeray : शेतकरी संकटात, पण उद्धव ठाकरे सत्ताबदलाच्या घोषणांत व्यस्त, दसरा मेळाव्याआधी ज्योती वाघमारेंची टीका

Uddhav Thackeray : शेतकरी संकटात, पण उद्धव ठाकरे सत्ताबदलाच्या घोषणांत व्यस्त, दसरा मेळाव्याआधी ज्योती वाघमारेंची टीका

Follow Us
Follow Us:
  • शिंदेंकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवाहन
  • संविधानाचा दाखला देत विरोधकांवर टीका
  • संविधानाचा दाखला देत विरोधकांवर टीका
 

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी संकटात असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्ताबदलाच्या घोषणा करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका शिवसेनेच्या नेत्या आणि खासदार ज्योती वाघमारे यांनी रविवारच्या दसरा मेळाव्याआधी केली आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं. बाळासाहेबांनी शिकवलेले समाजसेवेचे तत्त्व त्यांचे पुत्र विसरल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला.

मुंबईत एका वृत्तसंस्थेशी बोलताना वाघमारे म्हणाल्या की, शिवसेनेची खरी ओळख ही केवळ राजकारण किंवा मतांसाठी काम करणारी संघटना अशी नाही, तर समाजसेवा आणि गरजूंच्या मदतीसाठी काम करणारी संघटना अशी आहे.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्याचा विचार दिला होता. मात्र, दुर्दैवाने उद्धव ठाकरे हे विचार विसरले आहेत.

एका बाजूला दुष्काळग्रस्त भागांतील शेतकरी अडचणीत असून त्यांच्यावर अश्रू ढाळण्याची वेळ आली आहे, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे सत्ताबदलाच्या घोषणा देण्यात व्यस्त आहेत, असा आरोप त्यांनी केला. याउलट, एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांची विचारधारा पुढे नेत असून त्यांनी शेतकऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे, असं वाघमारे म्हणाल्या.

शिंदेंकडून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आवाहन

महाराष्ट्राच्या विविध भागांतून लाखो शिवसैनिकांना मदतीसाठी येण्याची योजना होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना आपापल्या भागात राहून शेतकऱ्यांची सेवा आणि मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवता येईल आणि इतरांना अनावश्यक त्रास होणार नाही, असं वाघमारे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त भागांत सुमारे 50 ट्रक मदतसाहित्य पाठवलं जात असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यांचे नेते नेहमी जनतेच्या पाठीशी उभे राहतात, तर विरोधक केवळ राजकारण करण्यात व्यस्त आहेत, अशी टीका त्यांनी केली.

Manoj Jarange Patil Dasara Melava : नारायणगडावरून जरांगे पाटलांचा एल्गार! शेतकऱ्यांसाठी सरकारकडे 5 मोठ्या मागण्या

संविधानाचा दाखला देत विरोधकांवर टीका

विरोधी पक्षातील नेत्यांच्या वक्तव्यांवरही ज्योती वाघमारे यांनी प्रश्न उपस्थित केले. देशाचा कारभार हा संजय राऊत, राहुल गांधी, प्रियंका गांधी किंवा सुप्रिया सुळे यांच्या भाषणांनुसार चालत नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानानुसार चालतो, असं त्या म्हणाल्या.

संविधानानुसार ठरावीक काळानंतर निवडणुका होतात आणि जनतेला मतदानाच्या माध्यमातून सरकार बदलण्याची संधी मिळते. त्यामुळे नेत्यांनी जनतेमध्ये जाऊन काम करावं आणि निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करावा, असं आवाहन त्यांनी केलं. विरोधकांचे नेते बाबासाहेब आंबेडकर, संविधान, देश आणि जनतेच्या हिताच्या विरोधात काम करत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केला. विरोधकांचं राजकारण आता जनतेच्या लक्षात येऊ लागलं आहे, असंही त्या म्हणाल्या.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रताप सरनाईकांसह तीन नेत्यांचं मोठं विधान; राजकारणात चर्चांना उधाण

आंदोलनांवरूनही विरोधकांना लक्ष्य

सीजेपी (CJP)च्या भूमिकेवर टीका करताना वाघमारे यांनी संबंधित लोक केवळ जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. आंदोलन करून काहीही साध्य होणार नसल्याचं सांगत, सर्वोच्च न्यायालय आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यामागील हेतूवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका का केली?

    Ans: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीपेक्षा उद्धव ठाकरे सत्ताबदलाच्या राजकारणाला महत्त्व देत असल्याचा आरोप ज्योती वाघमारे यांनी केला.

  • Que: एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी काय मदत केली?

    Ans: एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळग्रस्त भागांत सुमारे ५० ट्रक मदतसाहित्य पाठवलं जात असल्याचा दावा वाघमारे यांनी केला.

  • Que: ज्योती वाघमारे यांनी विरोधकांवर आणखी कोणती टीका केली?

    Ans: देशाचा कारभार संविधानानुसार चालतो आणि नेत्यांनी जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी काम केलं पाहिजे, असं सांगत त्यांनी विरोधकांच्या राजकारणावर टीका केली.

Web Title: Jyoti waghmare uddhav thackeray eknath shinde farmers aid rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Jyoti Waghmare
  • Uddhav Thakery

संबंधित बातम्या

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रताप सरनाईकांसह तीन नेत्यांचं मोठं विधान; राजकारणात चर्चांना उधाण
1

Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रताप सरनाईकांसह तीन नेत्यांचं मोठं विधान; राजकारणात चर्चांना उधाण

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी युवासेनेचा मदतीचा हात; श्रीकांत शिंदे फाउंडेशनला १० लाखांचा धनादेश सुपूर्द
2

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी युवासेनेचा मदतीचा हात; श्रीकांत शिंदे फाउंडेशनला १० लाखांचा धनादेश सुपूर्द

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार
3

Shivsena Dasara Melava : शिंदेंचा दसरा मेळावा यंदा शेतकऱ्यांसाठी; दिवाळीचा शिधा घेऊन ट्रक निघणार

Shivsena Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दसरा मेळाव्यातील ‘ते’ कार्यक्रम रद्द
4

Shivsena Dasara Melava : एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दसरा मेळाव्यातील ‘ते’ कार्यक्रम रद्द

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.