Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीत विधानपरिषदेचा तिढा कायम तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण अमित शहांच्या भेटीला, भाजपच्या १२ जागांसाठी ४८ जणांची यादी

राज्यात आता विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार असून राज्यात एकूण १७ जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची देखील सुरुवात झाली आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 26, 2026 | 09:02 PM
Ravindra Chavan meets Amit Shah for Vidhan Parishad Election candidate list, Vidhan Parishad Election, Ravindra Chavan meets Amit Shah, Vidhan Parishad Election candidate list,

Ravindra Chavan meets Amit Shah for Vidhan Parishad Election candidate list, Vidhan Parishad Election, Ravindra Chavan meets Amit Shah, Vidhan Parishad Election candidate list,

Follow Us
Follow Us:
  • राज्यात एकूण १७ जागांसाठी विधानपरिषद निवडणुकांची घोषणा
  • भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण ४८ उमेदवारांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना
  • विधान परिषदेच्या जागावाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा
राज्यात आता विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजणार असून राज्यात एकूण १७ जागांसाठी निवडणुकांची घोषणा झाली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची देखील सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपकसून तयारी करत असल्याचे दिसत येत असून महायुतीत भाजपला १७ जागांपैकी १२ जागा मिळणार असल्याचे समजत आहे. याबाबत महायुतीतील तिन्ही पक्षांचे प्रमुख एकत्र बैठक घेऊन जागावाटप अंतिम करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच भाजपने १२ जागांसाठी मोर्चेबांधणी सुरु केली असल्याचे दिसत असून उमेदवारांच्या नावांची यादीदेखील तयार करण्यात आल्याचे समजत आहे. त्यामुळेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज ४८ उमेदवारांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीला रवाना होऊन भाजप अध्यक्ष नितीन नवीन आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळेच विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये आता हालचालींना वेग आल्याचे चित्र दिसत आहे. येत्या २ ते ३ दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. विधान परिषदेसाठी भाजप १२ जागांवर ठाम असून या जागांवर उमेदवारीसाठी ४८ जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे भडकले

विधान परिषद निवडणुकांसाठी भाजप कसून तयारी करत असल्याचे दिसत असले तरी महायुती मध्ये मात्र काही आलबेल नसल्याचे चित्र दिसत आहे. विधान परिषदेच्या जागावाटपावरून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर प्रमुख नेत्यांसोबत एकनाथ शिंदेंची अनेकदा चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊनदेखील या प्रकरणी काही तोडगा निघाला नसल्याचे समजत आहे. आज माध्यमांनी त्यांना याबाबत प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदे यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. पत्रकारांनी विधान परिषदेच्या जागावाटपाबद्दल प्रश्न विचारला असता ते पत्रकारांवर प्रचंड संतापले आणि पत्रकारांनाच उलट सवाल केला. त्यामुळे बैठकीत नक्की काय घडलं असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

“दिल्लीतल्या नाकर्त्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी…” हर्षवर्धन सकपाळांच्या पंतप्रधान मोदींवरील टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर

कधी होणार मतदान? निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

विधान परिषद निवडणुकीसंदर्भात अधिसूचना २५ मे रोजी जाहीर करण्यात आली असून अर्ज भरण्याची शेवटची तारीख १ जून असेल. अर्जाची छाननी २ जून रोजी करण्यात येणार आहे. तर, अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख ४ जून असेल. विधान परिषद निवडणुकीचे मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी पार पडणार आहे.

” हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार…” पुणे जमावबंदी निर्णयावरून सुप्रिया सुळेंचा सवाल

Web Title: Ravindra chavan meets amit shah for vidhan parishad election candidate list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Eknath Shinde
  • Ravindra Chavan
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

एकनाथ शिंदेंचा नवा गेम प्लॅन? ‘Operation Tiger 3’ने ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा, 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा
1

एकनाथ शिंदेंचा नवा गेम प्लॅन? ‘Operation Tiger 3’ने ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा, 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार
2

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार

Dombivli doctor assault case: ‘एवढं मोठं प्रकरण झालं, रवींद्र चव्हाण होते कुठे?’ डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजू पाटलांचा सवाल
3

Dombivli doctor assault case: ‘एवढं मोठं प्रकरण झालं, रवींद्र चव्हाण होते कुठे?’ डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजू पाटलांचा सवाल

‘मिसिंग लिंक’वरून विधान परिषदेत राडा! खोटे आरोप करणारे महाराष्ट्राचे शत्रू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर घणाघात
4

‘मिसिंग लिंक’वरून विधान परिषदेत राडा! खोटे आरोप करणारे महाराष्ट्राचे शत्रू; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.