Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा विधीमंडळातील ठराव मागे; नेमकं कारण काय?

स्वातंत्र्यवीर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करावी, असा ठराव करण्यात आला होता. मात्र तो नियमबाबह्य असल्याने मागे घेण्यात आला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 06, 2026 | 01:15 PM
Resolution to confer Bharat Ratna award posthumously on Swatantryaveer Savarkar withdrawn

Resolution to confer Bharat Ratna award posthumously on Swatantryaveer Savarkar withdrawn

Follow Us
Close
Follow Us:
  • स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न देण्याचा ठराव मागे
  • सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता ठराव
  • नियमबाह्य असल्याचे राज्य सरकारकडून मत
Maharashtra Politics : मुंबई : सध्याचे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांना भारतरत्न देण्यासाठी ठराव मांडण्यात आला होता. स्वातंत्र्यवीर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबत केंद्र सरकारकडे शिफारस करावी, असा ठराव माजी मंत्री व भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेत मांडला होता. मात्र आता हा ठराव मागे घेण्यात आल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.

सावरकर यांच्या पुण्यतिथीदिनी पहिल्यांदाच विधीमंडळामध्ये भारतरत्न देण्याबाबत मागणी करण्यात आली. अनेकदा राजकीय भाषणांमध्ये याबाबत मागणी करण्यात आली होती. मात्र पहिल्यांदाच विधीमंडळामध्ये ठराव मांडण्यात आला होता. मात्र हा अशासकीय ठराव नियमबाह्य असल्याचे कारण सांगत हा ठराव मागे घेण्यात आला आहे. याबाबत सरकारतर्फे भूमिका मांडत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खंत व्यक्त करत हा ठराव मागे घेतला.

हे देखील वाचा : राज्यसभेवर हॅटट्रीक! उमेदवारी जाहीर होताच शरद पवारांची भावनिक पोस्ट

विधानसभा नियम 106 अंतर्गत सुधीर मुनगंटीवार यांनी हा अशासकीय ठराव सभागृहात मांडला होता. स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी मुनगंटीवार यांनी सावरकर यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना आदरांजली वाहिली होती. सभागृहातील अनेक आमदारांनी या ठरावाला पाठिंबा देखील दर्शवला. मात्र यानंतर हा ठराव नियमबाह्य असल्याचे जाहीर करण्यात आले.

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी कोणत्याही व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार देण्याची प्रक्रिया सांगितली. भारतरत्न पुरस्कार देण्याचा अधिकार हा केंद्र सरकारकडे असून पंतप्रधान राष्ट्रपतींकडे त्याबाबत शिफारस करतात. त्यामुळे राज्य सरकारकडून थेट अशी शिफारस करणे नियमांनुसार शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावे, ही राज्य सरकारची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हे देखील वाचा : “भाजपने महाराष्ट्रात निवडणुकीसाठी घोडेबाजार करू नये…; बिनविरोध राज्यसभा निवडणुकीवर संजय राऊत स्पष्ट बोलले

मंत्री जयकुमार रावल यांनी सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांना ठराव मागे घेण्याची विनंती केली. अशासकीय ठराव केंद्र सरकारकडे पाठवणे नियमबाह्य ठरेल, त्यामुळे मुनगंटीवार यांनी हा ठराव मागे घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर मुनगंटीवार यांनी यापूर्वी महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याबाबत राज्य सरकारने केंद्राकडे शिफारस केल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच हा अशासकीय ठराव शासकीय ठरावात रूपांतरित करून केंद्राकडे पाठवावा, अशीही मागणी त्यांनी केली.

यावर देखील मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, शासकीय ठराव मांडण्याची ठराविक प्रक्रिया असते. तो प्रथम मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करावा लागतो आणि त्यानंतरच तो विधानसभेत मांडता येतो. या प्रक्रियेअंतीच पुढील निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारची भूमिका लक्षात घेऊन अखेर सुधीर मुनगंटीवार यांनी खंत व्यक्त करत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबतचा आपला अशासकीय ठराव मागे घेतला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची प्रक्रिया आणखी लांबणीवर पडली आहे.

Web Title: Resolution to confer bharat ratna award posthumously on swatantryaveer savarkar withdrawn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • Sudhir Mungantiwar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.