Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tulapur Rave Party Case: पुणे पोलिसांना कोण तरी चावी देतो आहे का? तुळापूर रेव्ह पार्टीप्रकरणावरून रोहिणी खडसेंचा आक्रमक

पुण्याजवळील तुळापूर येथे एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी यावरून पुणे पोलीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 08, 2026 | 04:53 PM
तुळापूर रेव्ह पार्टीप्रकरणावरून रोहिणी खडसेंचा आक्रमक

तुळापूर रेव्ह पार्टीप्रकरणावरून रोहिणी खडसेंचा आक्रमक

Follow Us
Follow Us:
  • पुण्याजवळील तुळापूर येथे हायप्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांची धाड
  • रोहिणी खडसे यांची पुणे पोलीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका
  • पुणे पोलिसांना कोण तरी चावी देतो तसं पुणे पोलिस वागतं आहे का? – रोहिणी खडसे
पुण्याजवळील तुळापूर येथे एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या हायप्रोफाईल रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात मद्यसाठा, गांजा आणि हुक्का पॉट जप्त करण्यात आले असून तब्बल ७८ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्टीत सुमारे १५६ जण सहभागी असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यावरून आता राज्यभरातुन तीव्र प्रतिक्रिया येत असतानाच पुणे पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. अश्यातच आता राजकीय नेत्यांनाही याप्रकरणी सरकार आणि प्रशासनावर ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी यावरून पुणे पोलीस आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अखेर 11 वर्षांचा पाठलाग संपला! ऊसतोडणी घोटाळ्याचा सूत्रधार आळेफाटा पोलिसांच्या ताब्यात

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

रोहिणी खडसे यांनी आपल्या X अकाऊंटवरून पोस्ट करत यावर भाष्य केले. त्या म्हणाले, “पुण्याजवळच्या तुळापूर येथे एका पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. पार्टीत तब्बल १५६ लोक सहभागी असताना फक्त ७८ जणांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे‌. त्यातही फक्त २९ जणांची टेस्ट करण्यात आली. मला आठवतंय प्रांजल यांच्या प्रकरणात चार – पाच लोक एकत्र जमले होते. त्याला पुणे पोलिसांनी ‘रेव्ह पार्टी’चं नाव दिले होते. आता १५६ लोक सापडली त्याला ‘हाऊस पार्टी’ म्हणत आहेत. प्रांजल यांच्यासह सर्वांना ताब्यात घेण्यात आले होते व सर्वांची टेस्ट करण्यात आली होती. मग आता पुणे पोलिस १५६ लोकांपैकी इतर ७८ लोकांवर इतकी का मेहरबान झाली ? फक्त ७८ लोकांवर कारवाई केली मग इतर ७८ लोकांना का सोडण्यात आले ? फक्त २९ लोकांचीच का टेस्ट करण्यात आली? यातून पुणे पोलिसांचा दुटप्पीपणा दिसत आहे.”

पुण्याजवळच्या तुळापूर येथे एका पार्टीवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. पार्टीत तब्बल १५६ लोक सहभागी असताना फक्त ७८ जणांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे‌. त्यातही फक्त २९ जणांची टेस्ट करण्यात आली. मला आठवतंय प्रांजल यांच्या प्रकरणात चार – पाच लोक एकत्र जमले होते. त्याला पुणे… pic.twitter.com/ifzCD3R2Vc — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 8, 2026

“इतर लोकांना सोडले ते काय आमदार, खासदारांचे मुलं होती का ? की हाय प्रोफाइल लोक होती जी सरकारला मदत करतात ? पोलिस सांगत आहेत की या पार्टीची परवानगी घेण्यात आली होती पण परवानगीचा एक साधा पेपर दाखवला जात नाही. ना अद्याप कारवाईचा एखादा व्हिडिओ समोर आला आहे. प्रांजल यांच्या प्रकरणात व्हिडिओ बाहेर पाठवले जात होते. मीडियाला माहिती पुरवून मीडिया ट्रायल चालवला जात होता‌. पुणे पोलिसांना कोण तरी चावी देतो तसं पुणे पोलिस वागतं आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“सर्वात पहिले तर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस्थळ असलेल्या तुळापूरात या पार्टीची परवानगी दिलीच कशी गेली आणि तेही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी! याचा खुलासा मा. गृहमंत्र्यांनी करायला हवा,” असेदेखील त्या म्हणाल्या.

Pune Crime: तुळापूरच्या बंगल्यात रंगली हायप्रोफाईल रेव पार्टी; दारूच्या एका बॉटलची किंमत ६५ हजार! कोट्यवधींचा DJ आणि…

Web Title: Rohini khadse slams pune police over tulapur rave party case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • Drugs Case
  • Pune Police
  • Rohini Khadse

संबंधित बातम्या

‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात
1

‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात

रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल? खलील शेख आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल
2

रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल? खलील शेख आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल

क्रिकेटविश्वात खळबळ! शाहिद आफ्रिदी-शोएब अख्तरने भारतात ड्रग्स पुरवले? RVS मणी यांचा गंभीर आरोप
3

क्रिकेटविश्वात खळबळ! शाहिद आफ्रिदी-शोएब अख्तरने भारतात ड्रग्स पुरवले? RVS मणी यांचा गंभीर आरोप

Pune : पुण्यात गाड्यांची तोडफोड, 18 जणांवर गुन्हा दाखल
4

Pune : पुण्यात गाड्यांची तोडफोड, 18 जणांवर गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.