Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल? खलील शेख आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल

पुण्यातील बिल्डर खलील शेख यांच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओ आणि चिठ्ठीत काही व्यक्तींवर आरोप करण्यात आल्याने रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 19, 2026 | 05:14 PM
रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल? खलील शेख आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल

रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल? खलील शेख आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:
  • खलील शेख आत्महत्या प्रकरणात रवींद्र धंगेकरांसह पत्नीवर गुन्हा दाखल
  • अटकपूर्व जामिनासाठी अर्ज; दोघेही नॉट रिचेबल असल्याची माहिती
  • व्हिडिओ आणि चिठ्ठीच्या आधारे पोलिसांचा तपास वेगाने सुरू
 

पुण्यातील बिल्डर खलील शेख यांच्या आत्महत्येने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तयार केलेला व्हिडिओ आणि लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागल्यानंतर तपासाला वेग आला आहे. या दोन्ही पुराव्यांच्या आधारे काही व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये माजी आमदार आणि शिवसेना (शिंदे गट) नेते रवींद्र धंगेकर तसेच त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचाही समावेश आहे.

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवल्यानंतर रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार असून त्यापूर्वी दोघेही संपर्काबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून विविध ठिकाणी पथके रवाना करण्यात आली आहेत.

खलील शेख यांनी आत्महत्येपूर्वी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये आणि हस्तलिखित चिठ्ठीत काही व्यक्तींना आपल्या मृत्यूस जबाबदार धरल्याचा दावा केला आहे. या नावांमध्ये रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर, माजी नगरसेवक बाळा शेडगे, वर्षा शेडगे आणि इतर काही व्यक्तींचा उल्लेख असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.

नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी खलील शेख यांनी केवळ चिठ्ठी लिहिली नव्हती, तर ज्या इमारतीत त्यांनी टोकाचे पाऊल उचलले त्या इमारतीच्या बाहेरील भागावरही चिठ्ठ्या चिकटवल्या होत्या. याशिवाय त्यांच्या खिशातूनही एक पत्र जप्त करण्यात आले आहे. या सर्व पुराव्यांची फॉरेन्सिक आणि कायदेशीर पडताळणी सुरू आहे.

स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर संबंधित कलमांनुसार तपास सुरू आहे. न्यायालयातील सुनावणी आणि पोलिस तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्यभरातील राजकीय आणि कायदेविषयक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

‘हे तर लोकशाहीचे सीरियल रेपिस्ट’; सहा खासदारांच्या विलिनीकरणावरून संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Web Title: Khalil sheikh suicide case ravindra dhangekar anticipatory bail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 05:14 PM

Topics:  

  • Pune Crime
  • pune news
  • Pune Police
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क
1

दिल्लीत रंगणार Golf चा महासंग्राम! जगभरातील स्टार खेळाडू सहभागी होणार, बक्षिसाची रक्कम पाहून व्हाल थक्क

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
2

CJP Protest : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात इम्रान खान आणि तुषार गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा
3

‘ड्रोन’ उडवणं भोवलं! पुण्यात एमपीएससी आंदोलकांवर पोलिसांची मोठी कारवाई; 5 जणांवर गुन्हा

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?
4

एमपीएससी आंदोलनाला पोलिसांचा दणका! १५ विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल; रोहित पवारांची काय प्रतिक्रिया?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.