Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?’; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात

CJP आंदोलनावरून भाजप आमदार अतुल भातखळकर आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेत्या रोहिणी खडसे यांच्यात शाब्दिक संघर्ष रंगला आहे. मोदींच्या राजीनाम्याच्या मागणीवरून दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली.

  • By विवेक
Updated On: Jul 20, 2026 | 04:24 PM
'अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?'; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात,

'अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय बापाची जाहगीर वाटली काय ?'; रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर घणाघात,

Follow Us
Follow Us:
  • रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर जोरदार पलटवार
  • मोदींच्या राजीनाम्याच्या मागणीवरून राजकीय वाद अधिक तीव्र
  • CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू
 

देशभरातून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून दिल्लीतील जंतर नंतर पासून संसद भवनापर्यंत चाललेल्या आंदोलनाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आंदोलनाची ताकद वाढवत असल्याचे दिसत आहे. अश्यातच आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या आंदोलनावर टीका करत मुक्ताफळे उधळली आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी भातखळकरांवर सडकून टीका असून ‘अरे मोदीजींच्या चमच्या,’ म्हणत “देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय ?” असा सवाल केला आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्यावर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनामा मागणीसंदर्भात “बापाचा माल आहे का?” म्हणत टीका केली. यावरून रोहिणी खडसे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.

“बापाचा माल आहे का?” CJP आंदोलनावरून भाजप नेत्याची मुक्ताफळे, ‘दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने मोदीजी..’

काय म्हणाल्या रोहिणी खडसे?

रोहिणी खडसे यांनी भातखळकरांच्या ट्विट वर प्रत्युतर दिले असून त्यांच्यावर निशाणा साधत त्या म्हणाल्या, “अरे मोदीजींच्या चमच्या, पंतप्रधानांचा राजीनामा मागणे हा बापाचा माल नाही तर देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय ? देशातील कोट्यावधी जनतेने देशाला देशोधडीला लावण्यासाठी सत्ता नव्हती दिली. जी जनता तुम्हाला डोक्यावर उचलून घेऊ शकते ती जनता तुम्हाला उचलून आपटूही शकते. देशातील जनतेला विशेषतः तरुणांना गृहीत धरू नका.” असे म्हणत त्यांनी भातखळकरांवर सडकून टीका केली आहे.

अरे मोदीजींच्या चमच्या, पंतप्रधानांचा राजीनामा मागणे हा बापाचा माल नाही तर देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय ? देशातील कोट्यावधी जनतेने देशाला देशोधडीला लावण्यासाठी सत्ता नव्हती दिली. जी जनता तुम्हाला डोक्यावर उचलून घेऊ शकते ती जनता तुम्हाला उचलून… https://t.co/1zd3l94Kvf — Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) July 20, 2026


दिल्लीत सोनम वांगचुक यांच्यावर उपचार सुरू असताना आंदोलनाचे नेतृत्व अभिजित दीपके यांनी स्वीकारले असून विविध राज्यांतून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे. आज (सोमवार, 20 जुलै ) दिल्लीत मोठे आंदोलन होत असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही अधिक तापले असून या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

CJP Parliament March LIVE:  ‘सीजेपी’चा मोर्चा संसदेजवळ पोहोचताच पंतप्रधान मोदींनी संसद भवन सोडले

काय म्हणाले होते अतुल भातखळकर ?

अतुल भातखळकर यांनी आपल्या अधिकृत ‘X ‘ अकाऊंटवरून कॉकरोच जनता पार्टी आणि अभिजित दिपके यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “कॉकरोच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत.
बापाचा माल आहे का? देशाच्या कोट्यावधी जनतेने मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर विराजमान केलेले आहे. दिपके आणि ठिपके यांच्या कृपेने ते सत्तेवर बसलेले नाहीत. ते सत्तेवर यावेत म्हणूनच जनतेने मतदान केलेलं आहे.”

अतुल भातखळकरांच्या वक्तव्याला आता मोठा विरोध होत असून लोकशाही मार्गाने होत असलेल्या आंदोलनाला दडपण्याचे प्रयत्न होत असल्याचे तसेच लोकशाहीत प्रश्न विचारण्याचा आणि राजीनाम्याची मागणी करण्याचाही अधिकार संविधानाने दिला असल्याचे मत लोक व्यक्त करत आहेत.

Web Title: Rohini khadse replies atul bhatkhalkar cjp protest modi resignation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 04:02 PM

Topics:  

  • Abhijeet Deepke
  • CJP
  • Rohini Khadse
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा
1

Abhijeet Dipke on Saurav Das: ‘सौरव, आता तुझी वेळ येणार!’; अभिजीत दीपकेंचा सहकाऱ्याला गमतीशीर इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.